मुक्तपीठ टीम
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर मात करुन देशातील काही राज्यात अनलॉक प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. याच दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी पुन्हा एकदा नागरिकांना सल्ला वजा इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, “महामारीकडे दुर्लक्ष करणे नागरिकांसाठी घातक ठरु शकते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या आता कमी कमी होत चालली आहेत. यामुळे नक्कीच दिलासा मिळाला आहे. परंतु संसर्ग थांबेल याची हमी देऊ शकत नाही. त्यामुळे अनलॉक होत असला तरी हलगर्जीपणा टाळून सावधगिरी बाळगणे गरजेचे आाहे”.
सावध राहा, कोरोना टाळा!
- अनलॉकचा अर्थ कोरोना संपला असे नाही.
- अनलॉकनंतर अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.
- खास करुन मास्क योग्यरित्या परिधान करणे तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.
- योग्य शारीरिक अंतर या नियमांचे काटेकोरपणे पालन करा.
हे सर्व करणे फारच महत्त्वाचे आहे.
जलद लसीकरण
- जलद लसीकरणावर जोर दिलाच पाहिजे.
- अनलॉक होत असल्याने आता लसीकरण अधिक जलद गतीने करणे गरजेचे आहे.
- केंद्र सरकारने प्रौढांसाठी लसीकरण विनामूल्य केले आहे.
- त्यामुळे कोणीही लसीपासून वंचित राहणार नाही.