Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

‘सुजाण’ होण्यापासून रोखणारी कुटिलता ओळखा…’सुजाण व्हा!’

डॉ. गिरीश जाखोटिया यांच्या नव्या पुस्तकाचा परिचय त्यांच्याच शब्दात

August 7, 2021
in featured, घडलं-बिघडलं, व्हा अभिव्यक्त!
0
sujan vha

डॉ. गिरीश जाखोटिया

नमस्कार मित्रांनो !
” सुजाण व्हा ” हा माझा ग्रंथ मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस तर्फे येत्या १० ऑगस्टला प्रकाशित होतोय. या ग्रंथातील माझं मनोदय इथे मांडताना मला विशेष आनंद होतोय.

“सुजाण व्हा!”

कोणताही देश सक्षम, सुसंपन्न व सुसंस्कृत तेव्हाच होतो जेव्हा त्या देशाची जनता ही “सुजाण” होते. आमच्या भारत देशाला हे विशेषकरून लागू होतं. गेली कित्येक शतके येथील जनता “सुजाण” होऊ नये म्हणून इथल्या व्यवस्थेने कुटील रचना आखल्या नि त्या निर्दयीपणे राबविल्या. आजही बहुजनांना भावनिकरित्या भडकवत वा गोंजारत आर्थिक विपन्नावस्थेत ठेवलं जातं. गरीबांना कळूच दिलं जात नाही की त्यांच्या विकासाची व्याख्या काय असली पाहिजे व म्हणून त्यांनी कोणत्या प्राधान्यांवर काम करायला हवं. दुर्दैवी बाब म्हणजे धार्मिक – सांस्कृतिक कार्यक्रमांत बहुजनांना अडकवत त्यांचं आर्थिक – भौतिक उत्थापन नाकारणारे स्वतःच्या पुढील पिढ्यांसाठी मात्र मोठी तजवीज करीत रहातात. ही दुष्ट आणि स्वार्थी मंडळी सातत्याने अंधश्रद्धांचा व चुकीच्या परंपरांचा वापर करीत बहुजनांना, निरागसांना, दुर्बलांना व महिलांना ओरबाडत रहातात. या साऱ्या शोषणाच्या प्रक्रियेत आजची संपूर्ण युवा पिढी भरडली जाते आहे. चातुर्वर्ण्यव्यवस्थेचा वाढता बोलबाला, वंशवादाचं छुपं पुनरूज्जीवन, भ्रष्ट भांडवलशाहीतून वाढणारं लोभी खाजगीकरण, राजकारण्यांची वाढती कपट – कारस्थाने, प्रशासकीय व्यवस्थेतला वाढता कामचुकारपणा व संवेदनहीनता, नैसर्गिक साधनांना ओरबाडून खाण्याची वाढती ओंगळवाणी वृत्ती, लोकशाही प्रक्रियांचा व संस्थांचा वाढता ह्रास इत्यादी अनेक जंजाळांमध्ये आमची युवापिढी आज अडकली आहे.

 

लोकांना कळलं पाहिजे की आर्थिक संपन्नता, बौद्धिक विकास, सांस्कृतिक आनंद व सामाजिक समता, या चारही गोष्टींत संतुलन ठेवायला हवं. उदाहरणार्थ, मुंबईतले उच्चभ्रू लोक आपापल्या घरातला गणेशोत्सव दीड दिवस साजरा करीत पुन्हा कामाला लागतात. कोकणातील चाकरमाने मात्र तब्बल दहा दिवसांची रजा काढून आपल्या गावी हा उत्सव साजरा करायला जातात. उत्सव महत्त्वाचाच, पण तो आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार व बदलत्या वातावरणानुसार साजरा करण्याचे तारतम्य जनतेकडे असायला हवे. गरीब शेतकरी स्वतःच्या तथाकथित उच्च जातीतील मोठेपणा जपण्यासाठी कर्ज काढून, जमीन गहाण ठेवून मुलीचं लग्न थाटात करतो. हे असं करताना तो भविष्याचा विचार करीत नाही. बहुसंख्य सुशिक्षितांना स्वतःच्या चौकटीपलिकडचं जग माहीत नसतं. यातले बरेचजण व्हॉट्सअॅप किंवा फेसबुकवर आलेल्या अर्धवट वा बोगस नोंदी वाचून आपली मते बनवत असतात. बरेचजण आपापल्या लाडक्या राजकीय पुढाऱ्याची आरती ओवाळण्यात इतके मग्न असतात की देशाचं “आर्थिक व सामाजिक वास्तव” यांना माहीत नसतं. “आमचीच संस्कृती महान, आम्ही लवकरच जागतिक महासत्ता होऊ” असा अहंकारी धोशा लावणारी गुंगीची गोळी या मंडळींनी खाल्लेली असल्याने यांच्याकडून फारसा विकासाचा पराक्रम होत नाहीच. बहुजनांना उल्लू बनविणे आणि जगभरातील अन्य देशांच्या प्रगतीकडे हेतूपुरस्सरपणे डोळेझाक करणे, या दोन कलमी कार्यक्रमावरच ही मंडळी लबाडीने व कपटाने काम करीत असतात. देशाचं डबकं करण्यामध्ये हीच मंडळी बहुतांशी आघाडीवर असतात.

 

जागतिकीकरणाने नवी आव्हाने उभी केलीत नि विकासाच्या नव्या वाटा सुद्धा खुल्या केल्यात. जागतिकीकरणावर स्वार होण्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येत नवी संस्थात्मक उभारणी करायला हवी. कष्टकऱ्यांनी, खेडुतांनी, शहरातील चाकरमान्यांनी स्वतःला “आर्थिक साक्षर” बनवीत नि एकत्र येत आपल्या हक्कांबाबत ठोस पावले उचलायला हवीत. अर्थात यासाठी मेंदू आणि ह्रदय या दोहोंत चांगला समन्वय साधायला हवा. उदाहरणार्थ, लबाडांना ठोकायला मेंदूचा वापर मात्र निरागसांना आधार द्यायला ह्रदयातल्या संवेदना उपयोगात आणायला हव्यात. कपटावर गनिमी काव्याने मात करायला हवी. यासाठी महापुरुषांच्या गुणांना आत्मसात करायला हवे. नेमके हेच होऊ नये म्हणून उच्चभ्रू लबाड लोक या महापुरुषांना ‘देव’ बनवून टाकतात. असं झालं की निरागस बहुजन या देवांची फक्त पूजा करु लागतात. महापुरुषांच्या गुणांकडे मग दुर्लक्ष होऊ लागतं. स्वतःला सामर्थ्यशाली बनविण्यासाठी लबाडांच्या भाकड कथांना नाकारलं पाहिजे, स्वतःच्या मूळ आणि उत्तम वारशाला शोधून तो ऊर्जास्रोत म्हणून वापरला पाहिजे, विज्ञान व विवेकाची समतोल सांगड घातली पाहिजे आणि तसूभरही लक्ष विचलित न होऊ देता स्वतःला सुजाण करीत ठरलेल्या ध्येयावर काम केले पाहिजे.

 

स्वतःचा व कुटुंबियांचा, स्वतःच्या समाजाचा आणि सोबतीने देशाचा चौफेर विकास साधण्यासाठी सामान्यजनांनी आता पूर्णपणे सुजाण व सजग व्हायला हवं. यासाठी सुजाण होण्याच्या प्रक्रिया, संकल्पना, विविध विषय आणि चौफेर नि वास्तव अशा विकासाचा तपशील सामान्यजनांनी नीटपणे समजून घ्यायला हवा. हे करण्यासाठी स्वतःच्या मनाची व मेंदूची धुरसट झालेली पाटी आधी कोरी करता आली पाहिजे. चुकीच्या परंपरांचं अन्यायी जोखड डोक्यावरून उतरवलं पाहिजे. हजारो वर्षांचा मुरलेला बौद्धिक, जातीय व सांस्कृतिक न्यूनगंड भिरकावून दिला पाहिजे. तथाकथित उच्चभ्रूंपेक्षा आपण कुठेही कमी नाही आहोत, हा आत्मविश्वास जागविला पाहिजे. वंशवाद्यांची, सत्तेने मुजोर झालेल्यांची व भ्रष्ट श्रीमंतांची कपटकारस्थाने ओळखता आली पाहिजेत. “एकीची ताकद” प्रचंड असते हे समजून समतेच्या, पारदर्शकतेच्या व न्यायाच्या तत्वावर एकत्र येत अन्यायी आणि बोगस व्यवस्थेला चातुर्याने व वेगाने बदललं पाहिजे. अर्थात हे सारं करण्यासाठी “सुजाण” व्हायला हवं.

 

प्रस्तुत ग्रंथातील “सुजाणपणा”वरील छोट्या लेखांची मांडणी मी गेली चार वर्षे सोशल मेडियातून करीत आलोय. या सर्व लेखांना फेसबुक आणि व्हाट्सएप वर प्रचंड प्रतिसाद मिळाला. बहुतेकांनी सुचवलं की हे सारे उपयोगी लेख एकाच ग्रंथाद्वारे उपलब्ध व्हायला हवेत. बऱ्याच वाचकांना हे लेख त्यांच्या कुटुंबियांसोबत, सहकाऱ्यांसोबत व मित्रांसोबत पुनःपुन्हा वाचायचे आहेत. मॅजेस्टिक प्रकाशनचे अशोक कोठावळेंनी या ग्रंथाच्या प्रकाशनाची जबाबदारी घेतल्याने ते नेटक्या स्वरूपात आपणांस उपलब्ध होत आहे. मॅजेस्टिकने प्रकाशित केलेल्या यापूर्वीच्या माझ्या दोन ग्रंथांना वाचकांनी मोठा प्रतिसाद दिला होता व मान्यवर संस्थांनीही पुरस्कार देऊन गौरविले होते. सामान्यजनांना, विशेषतः युवकांना अधिक सजग व सुजाण होण्यासाठी हा ग्रंथ उपयोगी पडावा, हीच हार्दिक इच्छा आहे!

 

girish jakhotiya

(डॉ. गिरीश जाखोटिया हे उद्योजकीय, वित्तीय व व्यवस्थापन सल्लागार आहेत. तसेच ते ज्येष्ठ लेखक, विचारवंत असून समकालिन घटनांवर ते अभ्यासपूर्ण विश्लेषणात्मक भाष्य करतात.)

Copyright © jakhotiya.com
Right to change/reproduce withheld, IPC copyright Act 1957. The article can be forwarded with author’s name for public awareness.


Tags: Dr. Girish Jakhotiyasujan vha bookडॉ. गिरीश जाखोटियामाझा ग्रंथ मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊससुजाण व्हा
Previous Post

पुण्याच्या टाटा मोटर्समध्ये दहावी उत्तीर्णांसाठी अॅप्रेंटिसशिपची संधी

Next Post

महाराष्ट्रातील शेतीला महाधोका! केंद्रीय संस्थांच्या अभ्यासातून रेड अलर्ट!

Next Post
Climate

महाराष्ट्रातील शेतीला महाधोका! केंद्रीय संस्थांच्या अभ्यासातून रेड अलर्ट!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!