Saturday, June 7, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रयत्न”: डॉ. भारती पवार

August 20, 2021
in घडलं-बिघडलं
0
dr bharati pawar

मुक्तपीठ टीम

आदिवासी समाजाला विकास कामांच्या माध्यमातून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्रात ८ आदिवासी खासदारांना नरेंद्र मोदींनी मंत्री केले असे प्रतिपादन आरोग्य व परिवार कल्याण राज्य मंत्री भारती पवार यांनी केले. नंदूरबार येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

 

या वेळी भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या खा. डॉ. हिना गावित, आदिवासी मोर्चा प्रदेश अध्यक्ष आ. डॉ अशोक उईके, जिल्हा अध्यक्ष विजय चौधरी, किशोर काळकर, लक्ष्मण सावजी,बबन चौधरी, शिरीष चौधरी , प्रकाश गेडाम आदी उपस्थित होते

 

त्या पुढे म्हणाल्या की नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू. केंद्राकडून आलेल्या निधीचा राज्य सरकार तर्फे योग्य वापर होत नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली केंद्राने ५६ कोटीहून अधिक नागरिकांचे लसीकरण करून जागतिक विक्रम केला. केंद्राकडून लसीचा सर्वाधिक पुरवठा महाराष्ट्राला होऊनही लस मिळत नसल्याची खोटी माहिती राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून जनतेला दिली जात आहे, असेही त्या म्हणाल्या.

 

यात्रेचे प्रमुख आ. डॉ अशोक उईके यांनी यात्रेच्या पालघर ते नंदूरबार या प्रवासाचा आढावा घेतला. आंतरराष्ट्रीय छायाचित्रकार दिन असल्याने डॉ. पवार यांनी छायाचित्रकार व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.

 

शेलदारी, पिंपळनेर, साक्री, निजामपूर मार्गे नंदूरबार येथे ही यात्रा आल्यानंतर आदिवासी नृत्य व ढोल ताशांच्या गजरात फटाके फोडून या यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले. शहराच्या प्रवेशद्वारावर खा. डॉ. हीना गावित, जिल्हा अध्यक्ष विजय गावित यांनी स्वागत केले. डॉ . पवार यांनी हुतात्मा शिरीषकुमार यांच्या स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. महात्मा गांधी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांनाही डॉ. पवार यांनी पुष्पहार अर्पण केला. त्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयास भेट देऊन समस्या जाणून घेतल्या.

 

 


Tags: BJPDr. bharati pawarhina gavitPalgharprime minister narendra modiआदिवासी समाजडॉ. हिना गावितनंदूरबार
Previous Post

“आदिवासी संस्कृती व परंपरांचे जतन करुन पालघर जिल्ह्यातील विकासकामे करावीत”: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post

“कोरोनाच्या दुसर्‍या लाटेला आणि आता तिसर्‍या लाटेलाही भाजप कारणीभूत ठरणार आहे!”

Next Post
nawab malik

"कोरोनाच्या दुसर्‍या लाटेला आणि आता तिसर्‍या लाटेलाही भाजप कारणीभूत ठरणार आहे!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!