Saturday, March 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पर्यटन सर्किटची व्याप्ती वाढवणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

November 27, 2022
in सरकारी बातम्या
0
मा.उपमुख्यमत्री यांच्या हस्ते ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीट’ चे उद्घाटन 4

मुक्तपीठ टीम

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पर्यटन सर्किटच्या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन कार्य, त्यांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. या पर्यटन सर्किटची व्याप्ती वाढवून शालेय स्तरावर देखील सहलींचे आयोजन करण्याचा मानस आहे, असे उद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.            

चेंबूर येथील फाईन आर्ट सोसायटी मध्ये २६ नोव्हेंबर या संविधान दिनाचे औचित्य साधून ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पर्यटन टूर सर्किट‘च्या उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.            

यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले, पर्यटन मंत्री  मंगलप्रभात लोढा,पर्यटन सचिव सौरभ विजय, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, पर्यटन संचालक बी.एन.पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी, समाज कल्याणच्या प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे,भदंत डॉ.राहुल बोधी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता रणजीत हांडे यासह मान्यवर उपस्थित होते            

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत स्थळे व बुध्दिस्ट स्थळांचा समावेश असलेली राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणांचा या पर्यटन टूरमध्ये समावेश आहे. विभागनिहाय सर्किट मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद व नागपूर या जिल्ह्यात आहेत. या पर्यटन सर्कीटच्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात असे पर्यटन सर्किट तयार केले आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्रात पर्यटन सर्किट करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन संघर्ष  आणि त्यांनी केलेले कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी हे पर्यटन सर्किट अत्यंत मोलाची भूमिका बजावेल, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.             

महापुरुषांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या ठिकाणी भेट देणे, याचा एक वेगळाच अनुभव असतो. तो नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी देखील प्रयत्न करण्यात येणार आहे. यापुढे जाऊन शालेय स्तरावरील सहलीचा देखील या पर्यटन सर्किटमध्ये समावेश व्हावा यासाठी प्रयत्न करणार आहोत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे  इंदू मिल येथील स्मारक लवकर पूर्ण करण्यासाठी हे शासन प्रयत्नशील आहे.  समाजातील शेवटच्या घटकापर्यंत व सामाजिक न्यायाला अनुसरून आमचे शासन  काम करेल, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.

भारतरत्न डॉ.बाबासाहेबांनी दिलेले संविधान हे चिरंतन राहील – केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले            

केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले म्हणाले, बाबासाहेबांनी  जात, भाषा ,धर्म या पलीकडे जाऊन मानवतेच्या हितासाठी किंबहुना देशाच्या हितासाठी दिलेले संविधान हे सर्वांसाठीच मार्गदर्शक आहे. संविधानाचे शिल्पकार म्हणून त्यांनी बजावलेली भूमिका ही अत्यंत मोलाची आहे. पर्यटन टूर सर्किटच्या माध्यमातून हे विचार सर्वांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. भारतामध्ये बौद्ध धर्माचा झालेला उगम हा जागतिक स्तरावर जाऊन पोहोचलेला आहे. त्यामुळे बुद्ध काळापासूनच भारतात लोकशाहीतील समता हे तत्व रुजले आहे, असेही केंद्रीय राज्यमंत्री श्री.आठवले म्हणाले.

पर्यटन सर्किटमुळे बाबासाहेबांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचतील – पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा            

पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, डॉ. बाबासाहेब यांनी देशाला अत्यंत उत्कृष्ट असे संविधान दिले. ते राहत असलेली ठिकाणे तसेच बौद्ध लेणी यांची माहिती सर्वांना होण्यासाठी हे पर्यटन टूर सर्किट तयार केले आहे. मुंबई येथील मुख्य कार्यक्रमाच्या आयोजनाबरोबरच इतर चार ठिकाणी चैत्यभूमी, दादर मुंबई, चवदार तळे, महाड रायगड, काळाराम मंदिर, नाशिक ,दीक्षाभूमी, नागपूर येथे हा कार्यक्रम सुरू आहे. दि.३,४,७ व ८ डिसेंबर २०२२ रोजी संबंधित विभागांतर्गत पर्यटक  तसेच अनुयायांसाठी या पर्यटन टूर्स निःशुल्क आयोजित केल्या आहे. इतर वेळी माफक दरात या सहलींचे आयोजन करण्यात येईल. याचे बुकिंग ऑनलाइन-ऑफलाइन करता येईल, याचा लाभ पर्यटन प्रेमी व अनुयायींनी घ्याव्या, असे आवाहन यावेळी पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले     

२६/११च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद वीरांना व ज्येष्ठ  अभिनेते विक्रम गोखले यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. संविधान दिनानिमित्त  संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले. आज साजरा होत असलेला संविधान दिन ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनापर्यंत समता पर्व साजरा करण्यात येत आहे. या पर्वाचे यावेळी उद्धघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.            

पर्यटन विभागाद्वारे तयार करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत पर्यटन व बुध्दीस्ट स्थळांचा समावेश असलेल्या पर्यटन सर्किट पुढील प्रमाणे आहेत.            

मुंबई पर्यटन सर्किट मध्ये चैत्यभूमी,राजगृह, डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन, परळची बीआयटी चाळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इकॉनॉमिक्स व कॉमर्स कॉलेज, वडाळा यांचा समावेश आहे. कोंकण पर्यटन सर्किट मध्ये सत्याग्रह चवदार तळे, गांधारपाले किंवा पाल लेणी यांचा समावेश आहे.            

पुणे पर्यटन सर्किटमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्युझियम व मेमोरीयल – सिम्बॉयोसिस कॉलेज सिम्बायोसिस सोसायटीचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर निवासस्थान, तळेगाव, भीमा कोरेगाव विजयस्तंभ याचा समावेश आहे.            

नागपूर पर्यटन सर्किटमध्ये दीक्षाभूमी, शांतीवन डॉ.बाबासाहेब आंबेडकर वस्तू संग्रहालय, नागलोक हे बौद्धतीर्थ क्षेत्र,ड्रॅगन पॅलेस, कामठी याचा समावेश आहे.            

औरंगाबाद पर्यटन सर्किटमध्ये मिलिंद कॉलेज ऑफ ऑर्टस्, औरंगाबाद, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांचा समावेश आहे.            

नाशिक पर्यटन सर्किटमध्ये नाशिकच्या पांडव लेणी, त्रिरश्मी बौद्ध लेणी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारक, काळाराम मंदिर यांचा समावेश आहे.


Tags: MaharashtraTourism Circuitउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्र
Previous Post

डॉ. कांता नलावडे यांच्या “भरारी” कवितासंग्रहाचे सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रकाशन

Next Post

युक्रेनशी लढण्यासाठी आता रशियन कैद्यांची फौज!

Next Post
russia ukrain war And Putin

युक्रेनशी लढण्यासाठी आता रशियन कैद्यांची फौज!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!