मुक्तपीठ टीम
ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचं वयाच्या ७८व्या वर्षी निधन झालं आहे. पुण्यातील पत्रकारनगर येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.दीर्घ आजाराने त्यांचं निधन झालं.आज दुपारी २ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अनिल अवचट यांचं बहुआयामी व्यक्तिमत्त्व
- अनिल अवचट यांचा जन्म पुण्यातील ओतूरमध्ये झाला.
- त्यांनी एम.बी.बी.एस ची पदवीही पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमधून घेतली.
- आपल्या महाविद्यालयीन जीवनातही त्यांनी अनेक चळवळींमध्ये भाग घेतला.
- अनिल अवचट हे केवळ एक साहित्यिक नसून त्यांच्या अनेक ओळखी आहेत, त्यांचं बहुआयामी व्यक्तिमत्त्व त्यांनी केलेल्या विविध प्रकारच्या कामांमधून दिसून येतं.
- अनिल अवचट यांनी मजूर, दलित, भटक्या जमाती, वेश्या यांच्या प्रश्नांविषयी अनेक पुस्तकं लिहिली.
- १९६९ मध्ये त्यांनी आपले पहिले पुस्तक ‘पूर्णिया’ हे प्रसिद्ध केलं होतं, तेव्हापासून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर लिखाण केलं. त्यांची ३८ हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली.
अवचटांची पत्रकारिता
- पत्रकार म्हणून समाजाशी अनिल अवचट यांची जवळीक आणखी वाढली, ते स्वतः पत्रकार असले तरी त्यांनी पत्रकारितेतील व्यावसायिकतेला नेहमीच नकार दिला.
- त्यांनी आपल्या पत्रकारितेने समाजातील दुर्बल घटकांना मदत होईल असे कायम प्रयत्न केले.
- गरिबी, अन्याय आणि भ्रष्टाचाराचे बळी असलेल्या असहाय्य जनतेच्या हितासाठी त्यांनी कार्य केलं.
मुक्तांगण व्यसनमुक्तीमध्ये मोठे योगदान
- अनिल अवचट हे पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक आहेत.
- त्यांनी पत्नी डॉ. सुनंदा अवचट यांच्या सहकार्याने व्यसनमुक्तीची एक अनोखी पद्धत शोधली.
- जगभरातील अनेक व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये त्यांची ही तकनिक वापरली जाते. मुक्तांगण परिवारातर्फे दरवर्षी डॉ. अनिता अवचट स्मृती संघर्ष सन्मान पुरस्कार दिला जातो.
- मुक्तांगण या व्यसनमुक्ती केंद्राची सुरुवात त्यांनी केली. व्यसनींना भरकटलेल्या मार्गावरून व्यसनमुक्त करत पूर्वायुष्यात आणण्याचं काम त्यांनी केलं.
- मुक्तांगण या संस्थेनं अनेक आयुष्य उध्वस्त होण्यापासून रोखली.
- अनिल अवचट हे एक डॉक्टर होतेच मात्र त्यांनी समाज परिवर्तनाचाही विडा उचलला होता.
अवचटांना मिळालेले पुरस्कार
- व्यसनमुक्ती क्षेत्रातील त्यांच्या कार्यासाठी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार अनिल यांना सन्मानित करण्यात आलं.
- अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार त्यांना दिला गेला.
- सामाजिक अडचणींसोबत बालसाहित्यावरही डॉ. अनिल अवचट यांनी मोठ्या प्रमाणात लिखाण केलं.
- “सृष्टीत.. गोष्टीत” या त्यांच्या पुस्तकाला साहित्य अकादमीतर्फे उत्कृष्ट बालसाहित्याचा पुरस्कार देण्यात आला.
- अनिल अवचट यांची पुस्तकं सलग तीन वर्षे महाराष्ट्र शासनाने “सर्वोत्कृष्ट पुस्तके” म्हणून जाहीर केली.
- पुढे महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कार, फर्ग्युसन गौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं.
- सातारा येथील न्या. रामशास्त्री प्रभुणे प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा सामाजिक न्याय पुरस्कार साहित्य अकादमी तर्फे प्रथम बाल-साहित्य पुरस्कार महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार डॉ. अनिल अवचट यांच्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राला १२व्या पुलोत्सव सोहळ्यात पुल कृतज्ञता सन्मान प्रदान करण्यात आला.
- अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशन या संस्थेकडून साहित्य जीवन गौरव पुरस्कार