मुक्तपीठ टीम
घरोघरी लसीकरणाचा मुद्दा सध्या न्यायालयात गाजत आहे. मुंबई मनपालाही अद्याप घरोघरी लसीकरण शक्य झालेले नाही. पण पालघर नगर परिषदेने मात्र दिव्यांग आणि ज्येष्ठांसाठी घरोघरी लसीकरण सुरु केले आहे. पालघर नगर परिषदेची ही अभिनव लसीकरण योजना गुरुवारपासून सुरु झाली आहे.
पालघर शहरातील ज्या व्यक्ती दिव्यांग आहेत किंवा जे ज्येष्ठ नागरिक लसीकरण केंद्रावर येऊन लस घेऊ शकत नाहीत, अशा नागरिकांसाठी घरोघरी लसीकरण करण्यात येत आहे. अशा नागरिकांनी पालघर नगर परिषदेने 9766246429 हा नंबर दिला आहे. ह्या नंबरवर फोन करून त्या व्यक्तीची माहिती व नोंदणी पालघर नगर परिषदेकडे करावी. त्यानंतर पालघर नगर परिषदेतर्फे त्या व्यक्तीच्या घरी जाऊन त्यांना करोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे.
या घरोघरी लसीकरणाच्या शुभारंभास पालघरच्या नगराध्यक्ष डॉक्टर उज्ज्वला केदार काळे, पालघर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत खंडारे, नगरसेवक राजेंद्र पाटील, नगरसेविका शिल्पा बाजपेयी, नगरसेविका अलका राजपूत, डॉक्टर, नर्सेस उपस्थित होत्या. त्याप्रसंगी नगराध्यक्ष डॉक्टर उज्ज्वला काळे यांनी आवाहन केले की, “जनतेने पालघर नगरपालिकेच्या ह्या उपक्रमाचा लाभ घ्यावा. ज्यांच्या घरात दिव्यांग आहेत व अंथरुणाला खिळलेले ज्येष्ठ नागरिक आहेत, अशांनी आपली माहिती वर दिलेल्या फोनवर नगर परिषदेला कळवावी. त्यांना घरी येऊन कोरोना प्रतिबंधक लस दिली जाईल.