अनिता बाफना
कोरोनाच्या काळात सर्वत्र नकारात्मक आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. कोरोना संकटात जगभरातील डॉक्टर, नर्स रुग्णांची मनापासून सेवा करत आहेतच. पण कोरोनाशी बाधितांना एकाकी लढावं लागतं. रुग्णांच्याजवळ त्यांचे कोणीही नसतं यामुळे रुग्ण अजून घाबरतात. अशावेळी जेव्हा डॉक्टर्स आणि रुग्णालयातील कर्मचारी रुग्णांना बरं वाटाव असं काही करतात, तेव्हा खरी उर्जा मिळते. सोशल मीडियात व्हायरल झालेला एक व्हिडीओ अशाच डॉक्टरांचा आहे जे नाचत, गात रुग्णांना उभारी देत आहेत.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरलं होत आहे. हा पूर्वीही व्हायरल झाला होता. त्यात डॉक्टर्स हे कोरोना रुग्णांसोबत नाचत आहेत. या व्हिडीओतून आयुष्याचं कसं जगावं हे सांगण्यात आलं आहे. आयुष्य म्हणजे काय? जीवन म्हणजे प्रवास. जीवन जगायचं म्हणजे प्रत्येक क्षण साजरा करायचा. जीवन प्रवासात चढ-उतार येणारच मग काय रडत बसायचे? बिलकुल नाही. हाच संदेश देणारा हा व्हिडीओ आहे.
या व्हाट्सअप द्वारे आलेला हा व्हिडिओ आणि त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये वाजणारे संगीत या रुग्णालयातील रुग्णांनाच नव्हे तर आपल्यालाही ऊर्जा देते. जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन देते.
मला इथे आणखी एक मराठी गाणे आठवते. झाले-गेले विसरून जावे, पुढे-पुढे चालावे जीवन गाणे गातच राहावे. मित्रांनो मैत्रिणींनो, कोरोना तात्पुरता आहे जीवन हे कायम आहे. आपलं आहे. कोरोनाला न घाबरता सामना करत आपल्याला पुढे जायचे आहे. जीवनात तेच यशस्वी असतात, जे प्रतिकुलतेच्या अडथळ्यांमधून मार्ग शोधतात. संकटातून संधी शोधत पुढे सरसावतात.
अशा वेळी मला घरी आलेल्या एका सुताराचे वाक्य आठवते, “आमचं कसं असतं. आम्ही जेथे काम करतो. त्या घरात कुणी आपुलकीन चहा पाजतं. त्या दिवसासाठी तेच आमचं कुटुंब.” त्या व्हायरल व्हिडीओतील नाचणारे गाणारे डॉक्टर नर्स आणि रुग्ण हे आपुलकीच्या तशाच भावनेतून संकटात आनंदाची संधी शोधत आहेत…संटकटावर मात करण्याची शक्तीही मिळवत आहेत. ते यशस्वी होणारच! काही शंका हवीच कशाला?
पाहा व्हिडीओ: