मुक्तपीठ टीम
तामिळनाडूमध्ये विधानसभेच्या एकूण २३४ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सत्तांतर होताना दिसत आहे. सत्ताधारी अण्णा द्रमुक आघाडीला सत्तेवरुन खाली खेचून द्रमुक आघाडीने मुसंडी मारली आहे. पोस्टल बॅटलनंतर पुढेही अटीतटीची लढत पाहायला मिळाली. या निवडणुकीत दक्षिणेतले सुपरस्टार कमल हसन यांचा मक्कल निधी मय्यम (एमकेएम) या नव्या पक्षाला जनतेने नाकारल्याचं दिसलं. त्यामुळे स्टार कमल हसन यांना निवणुकीत जनतेनं अस्मान दाखवलं.
स्टालिन यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या द्रमुक आघाडीने १४० जागांवर आघाडी मिळवली आहे. त्यात द्रमुकने एकट्याने बहुमताचा ११८चा आकडा पार करून १२२ जागा मिळवल्या आहेत. काँग्रेसला आतापर्यंत १८, इतर डाव्या आणि अन्य पक्षांना मिळाल्या आहेत.
तामिळनाडू विधानसभेचे निकाल- सुरुवातीचे कल
- बहुमताचा आकडा – ११८
- द्रमुक-काँग्रेस आघाडी – १४०
- अण्णाद्रमुक-भाजपा आघाडी – ९१
- मक्कल निधी मय्यम – १
- एएमएमके आघाडी – ०
- इतर – २
- एकूण जागा – २३४
तामिळनाडूमध्ये एक्झिट पोलचे अंदाज काय होते?
तामिळनाडू
• तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलनुसार राज्यात सत्ता बदलाचे चित्र दिसत होते.
• जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये द्रमुक-काँग्रेसच्या मोठ्या विजयाचा अंदाज वर्तविला गेला होता.
• न्यूज २४-टुडेज चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार द्रमुक-काँग्रेसला १७५ जागा, अण्णाद्रमुक-भाजपाला ५७ जागा आणि इतर २ जागा.
• एबापी-सी वोटरच्या एक्झिट पोलनुसार द्रमुक-काँग्रेसला १६०-१७२ जागा, अण्णाद्रमुक-भाजपाला ५८-७० जागा आणि इतर ७ जागा.
• इंडिया टुडे- एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार द्रमुक-काँग्रेसला १७५-१९५ जागा, अण्णाद्रमुक-भाजपाला ३८-५४ जागा आणि इतर १-२ जागा
• रिपब्लिक-सीएनएक्सच्या एक्झिट पोलनुसार द्रमुक-काँग्रेसला १५०-१७० जागा, अण्णाद्रमुक-भाजपाला ५८-६८ जागा आणि इतर ४ – ६ जागा.
• पोल ऑफ पोल्सच्या एक्झिट पोलनुसार द्रमुक-काँग्रेसला १७२ जागा, अण्णाद्रमुक-भाजपाला ५८ जागा आणि इतर ३ जागा