मुक्तपीठ टीम
विविध राज्यांमध्ये म्युकरमायकोसिसच्या वाढत्या रुग्णसंख्येचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर अॅम्फोटेरिसिन बी औषधाच्या एकूण २३ हजार ६८० अतिरिक्त कुप्या आज सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना वितरित करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्राच्या वाट्याला ५ हजार २९० कुप्या आल्या आहेत. केंद्रीय रसायन व खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी जाहीर केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशभरात म्युकरमायकोसिस उर्फ काळी बुरशी या आजाराचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. त्यांच्यावर उपाचारासाठी आवश्यक अॅम्फोटेरिसिन बी या औषधाचा महाराष्ट्रासह देशभरात तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातच राज्य सरकारने बाजारात होती ती अॅम्फोटेरिसिन बीच्या सर्व कुप्या ताब्यात घेतल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना ते मिळणे अशक्यच झाले होते. त्यामुळे रुग्णांचे नातेवाईकच नाही तर डॉक्टरही सरकारविरोधात संताप व्यक्त करु लागले होते.
After a detailed review of rising no. of cases of #Mucormycosis in various states, a total of 23680 additional vials of #Amphotericin– B have been allocated to all States/UTs today.
The Allocation has been made based on total no. of patients which is approx. 8848 across country. pic.twitter.com/JPsdEHuz0W
— Sadananda Gowda (@DVSadanandGowda) May 22, 2021
मुंबईसारख्या महानगरांमध्येही हे औषध मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची हतबलता वाढत होती. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही आम्ही रुग्णसंख्येच्या प्रमाणात औषध खरेदी करण्यास तयार असल्याचे सांगत केंद्राला विनंती केल्याचे जाहीर केले होते. आज अखेर केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी अॅम्फोटेरिसिन बीच्या वाटपाची घोषणा केली आहे. त्यात महाराष्ट्राच्या वाट्याला ५ हजार २९० कुप्या आल्या आहेत.
आजच काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींनीही अॅम्फोटेरिसिन बी औषधाचा पुरवठा वाढवण्याची पत्र लिहून मागणी केली आहे.
“I understand that Liposomal Amphotericin-B is absolutely essential for treatment of Mucormycosis. However there are reports of its acute scarcity in market. I would request you to kindly take immediate action in this matter”
Congress President Smt. Sonia Gandhi writes to PM Modi pic.twitter.com/cn9IrUcm4U— Congress (@INCIndia) May 22, 2021