मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रानंतर आता इतर राज्यातही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अपात्र ठरवण्यात आल्यानं त्यांचं पद गेल्यात जमा आहे, त्याचवेळी भाजपा तिथंही आमदारांना आपल्याकडे वळवून सत्ता ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. यूपीएने आपली एकजूट दाखवली आहे, तरीही मुख्यमंत्री सोरने यांची आमदारकी गेल्याने त्यांची सत्ता गेल्यात जमा आहे. तरीही ते मात्र मजेत आहेत. ते आपल्या समर्थक शनिवारी सकाळी ११ वाजल्यापासून युतीचे आमदार मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जमू लागले आहेत. ते यूपीए आमदारांना तीन व्होल्वो बसमध्ये घेऊन एका धरणावर सहलीसाठी गेलेत.
आमदारांची धरणाच्या काठावर मजा…
- ४२ आमदारांचा ताफा धरणाच्या काठावर धावला.
- त्यांच्या मौजमजेने यूपीएत सोरेन सरकारबाबत तणाव नसल्याचा संदेश दिला.
- मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे भाऊ आणि दुमकाचे आमदार बसंत सोरेन यांनी दिल्लीहून झारखंड गाठले आणि बैठकीला हजेरी लावली.
- चमरा लिंडा सध्या या बैठकीपासून दूर आहेत.
- झामुमोच्या आमदार सबिता महतो आणि काँग्रेसच्या आमदार ममता देवी आजारी आहेत.
- दोन्ही आमदारांनी ही माहिती पक्षश्रेष्ठींना दिली आहे.
- यूपीएमध्ये समाविष्ट असलेल्या झामुमो, काँग्रेस आणि आरजेडीला ४९ आमदारांचा पाठिंबा आहे.
काँग्रेसचे तीन आमदार कोलकात्यात!
- कॅश घोटाळ्यात अडकल्यामुळे काँग्रेसचे तीन आमदार डॉ. इरफान अन्सारी, विक्सल नमन कोंगडी आणि राजेश कछाप कोलकाता येथे आहेत.
- येथे काँग्रेस हायकमांड संपूर्ण राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवून आहे.
- सायंकाळी उशिरा काँग्रेसचे प्रभारी अविनाश पांडे यांनी राजधानीत पोहोचून काँग्रेस आमदारांशी रणनीतीबाबत चर्चा केली.
मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानी राजकीय बैठकांऐवजी सहलीचं नियोजन…
- सकाळी ११ वाजल्यापासून युतीचे आमदार मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानी जमू लागले.
- दुपारी १ वाजेपर्यंत आमदारांचे आंदोलन सुरूच होते.
- एक वाजेपर्यंत ४२ आमदार मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जमले होते.
- मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या दुसऱ्या दरवाजातून तीन व्होल्वो बस आल्या.
- मुख्यमंत्री देखील आमदारांसोबत होते, ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापासून १.५० वाजता यूपीए आमदारांच्या बसने लातरातू धरणाकडे रवाना झाले.
- खुंटी डीसी-एसपी लातरातू धरणावर पोहोचले.
- येथे सोफा-खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली होती.
- धरणात मुख्यमंत्र्यांनी आमदारांसोबत रिफ्रेशमेंट पार्टी केली, बोटिंगही झाली व सेल्फीही काढल्या.
- यूपीएचे आमदार संध्याकाळी ५:४५ वाजता व्होल्वो बसमधून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासाठी रवाना झाले आणि संध्याकाळी ७.३० च्या सुमारास पोहोचले.
‘हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एकत्र आहोत, आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न केला जात आहे’ : अविनाश पांडे
- हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली सर्व आमदार एकत्र आले आहेत.
- राज्य सरकारला कोणताही धोका नाही.
- आपण घाबरून जाऊ, अशी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. काँग्रेसचे प्रभारी अविनाश पांडे यांनी रांचीला पोहोचल्यानंतर ही माहिती दिली.
- अविनाश पांडे यांनी सांगितले की मी आमदारांशी बोलण्यासाठी आलो आहे.
- तीन आमदारांवर पक्षांतर प्रकरणी कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले.
- पक्षाच्या विधिमंडळ पक्षाचे नेते सर्व काही पाहत आहेत.
- फ्लोअर टेस्ट झाल्यावर तिन्ही आमदारांना आणले जाईल असेही ते म्हणाले.