Sunday, May 18, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

तेलुगू महिलेला हिंदी-इंग्रजी येत नसल्यानं विमानात सीट बदलली! तेलुगू मंत्र्यांनी दाखवला बाणा!!

September 19, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
indigo

मुक्तपीठ टीम

इंडिगो एअरलाईनच्या आपत्कालीन एक्झिट रांगेत बसलेल्या एका तेलगू महिलेला इंग्रजी आणि हिंदी बोलता येत नसल्यामुळे तिची सीट बदलण्यास भाग पाडण्यात आले. दोन दिवसांपूर्वी विजयवाडा-हैदराबाद मार्गावरील (6E7297 फ्लाइट) फ्लाईटमध्ये ही घटना घडली. या प्रकरणानंतर तेलंगणाचे मंत्री केटी रामाराव यांनी विमान कंपनीला स्थानिक भाषांचा आदर करण्याची विनंती केली आहे. या निमित्तानं तेलंगणाच्या तेलुगू मंत्र्यांनी दाखवलेला बाणा आणि महाराष्ट्रातील अनेक राजकारण्यांच्या मुळुमुळू वागण्याचा मुद्दा चर्चेत आला आहे.

केटी रामाराव यांनी ट्वीट करत म्हणाले की, “प्रिय @IndiGo6E व्यवस्थापन, मी तुम्हाला स्थानिक भाषा आणि प्रवाशांचा आदर करण्याची विनंती करतो. ज्यांना इंग्रजी किंवा हिंदी भाषेचे चांगले ज्ञान नाही, त्यांचाही आदर करा,

प्रादेशिक फ्लाईटसाठी अधिक कर्मचारी नियुक्त करा जे तेलुगु, तामिळ, कन्नड इत्यादी स्थानिक भाषा बोलू शकतात. हा एक परिपूर्ण उपाय असेल’. इंडिगोने अद्याप मंत्री किंवा त्यांच्यावरील आरोपांना उत्तर दिलेले नाही.

संबंधित घटना कशी उघडकीस आली?

  • आयआयएम अहमदाबाद येथील सहाय्यक प्राध्यापिका देवस्मिता चक्रवर्ती यांनी ही घटना उघडकीस आणली.
  • त्यांनी सांगितले की, फ्लाईट अटेंडन्टने इंग्रजी आणि हिंदी समजत नसलेल्या महिलेला सुरक्षेच्या कारणावरून जागा बदलण्यास भाग पाडलं.
  • देवस्मिता चक्रवर्ती यांनी एक फोटो पोस्ट करत म्हटले आहे की, ”हिरव्या रंगाची साडी परिधान केलेली महिला 2A (XL सीट, एक्झिट रो) मध्ये बसलेली होती.
  • मात्र तिला 3C सीटवर बसण्यास भाग पाडले गेले, कारण तिला इंग्रजी/हिंदी नव्हे तर फक्त तेलुगू समजते.
  • हा सुरक्षेचा प्रश्न असल्याचे फ्लाईट अटेंडन्टने म्हटले.
  • मात्र केवळ भाषा येत नाही, हा कसकाय सुरक्षेचा मुद्दा होऊ शकतो? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

 

Indigo 6E 7297. Vijayawada (AP) to Hyderabad (Telangana), Sept 16-2022. The woman in green originally sitting in 2A (XL seat, exit row) was forced to seat 3C because she understood only Telugu, not English/Hindi. The attendant said it’s a security issue. #discrimination @IndiGo6E pic.twitter.com/bHa8hQj5vz

— Devasmita Chakraverty, PhD, MPH (@DevasmitaTweets) September 17, 2022


Tags: englishHindiIndigoK T RamraoTelguइंग्रजीइंडिगो एअरलाईनकेटी रामारावतेलगूहिंदी
Previous Post

ज्ञानलक्षी, प्रवासवर्णनपर साहित्याला वाचकांची मोठी मागणी

Next Post

फॉक्सकॉनप्रकरणी मुख्यमंत्री हे दिल्लीश्वरांच्या इच्छेपुढे नमले!- जयंत पाटील

Next Post
Jayantrao Patil

फॉक्सकॉनप्रकरणी मुख्यमंत्री हे दिल्लीश्वरांच्या इच्छेपुढे नमले!- जयंत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!