मुक्तपीठ टीम
उत्तर प्रदेश पर्यटन विभागाच्या वतीने, यावेळी अयोध्येत दीपावलीचा सण जागतिक स्तरावर आणखी भव्य आणि अविस्मरणीय बनवला जात आहे. यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर २०२१ च्या दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वात विशेष म्हणजे अयोध्येत साजरा होणारा हा पाच दिवसीय दीपोत्सव २०२१ आहे.
संपूर्ण अयोध्येत १२ लाख दिवे लावले जाणार आहेत. यामध्ये राम की पौडी येथे दहा लाख दिवे लावून विश्वविक्रम केला जाणार आहे. त्याचबरोबर अयोध्यानगर परिसरात तीन लाख दिवे लावले जाणार आहेत. अयोध्येच्या किनारी रामायणाची कथाही अजरामर होणार आहे. तसेच लेझर लाइटमध्ये भव्य रामायण हेरिटेज लूकमध्ये दाखवण्यात येणार आहे. पाच दिवसीय दीपोत्सव जागतिक स्तरावर अविस्मरणीय ठरावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
३ नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या दीपोत्सव सोहळ्यादरम्यान उत्तर प्रदेशातील प्रत्येक गावातील पाच मातीचे दिवे अयोध्येला प्रकाशमान करण्यास मदत करतील. १ नोव्हेंबरपासून दीपोत्सव सुरू होत आहे. मुख्य कार्यक्रम ३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या दिवशी माता सरयूला नऊ लाख दिव्यांनी सजवले जाईल. यासाठी, उत्तर प्रदेशातील सर्व ७५ जिल्ह्यांच्या संबंधित जिल्हा दंडाधिकाऱ्यांना राज्यातील ९० हजारांहून अधिक गावांतील प्रत्येकी पाच मातीचे दिवे अयोध्येत वेळेवर पोहोचतील याची खात्री करण्याचे काम देण्यात आले आहे.
राम की पौडीवर दहा लाख दोन हजार दिवे
- रामकी पौडीवर आता दहा लाख दोन हजार दीवे लावण्याची तयारी सुरू आहे.
- त्यासाठी दोन कालव्यावरही दिव्यांची सजावट करण्यात येणार आहे.
- प्रत्येक घाटावरील दिव्यांची संख्या पाच-पाच टक्क्यांनी वाढली आहे.
- गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नऊ लाख दिव्यांची नोंद व्हावी यासाठीही प्रयत्न केले जातील.
- आतापर्यंत ३२ घाटांवर सात लाख ५१ हजार दिवे लावून विश्वविक्रम करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.
- त्याचवेळी रामनगरीत आता दीपोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत आहे.
- लेझर शो आणि लायटिंगच्या सहाय्याने राम की पौडी हा देखावा साकारण्यात येणार आहे.
- दीपोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली. सायंकाळी मोठ्या संख्येने लोक पौडी येथे पोहोचून रोषणाईचा आनंद घेतील. शहरातील उर्वरित भागही दिवाळीनिमित्त सजवण्यात येणार आहे.
कसा असणार अयोध्येतील दीपोत्सव?
- यावर्षी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत दीपोत्सवानिमित्त १२ लाख मातीचे दिवे प्रज्वलित करण्याची घोषणा केली आहे.
- तसेच, उत्तर प्रदेशच्या शहरी भागात, पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या गृहनिर्माण योजनांचे नऊ लाख लाभार्थी त्यांच्या घराबाहेर दिवा लावतील.
- या दीपोत्सवात किमान नऊ लाख दिव्यांची रोषणाई करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पर्यटन विभाग किमान १२ लाख मातीचे दिवे लावण्याचे नियोजन करत आहे.
- १२ लाख मातीच्या दिव्यांमुळे २०२२ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच्या शेवटच्या दीपोत्सवात नवा विश्वविक्रम प्रस्थापित करता येईल.
- २०१७ पासून योगी आदित्यनाथ सरकार अयोध्येत दीपोत्सव सोहळ्याचे आयोजन करत आहे.
- २०१९ मध्ये ५१ हजार दिव्यांपासून ४ लाख ४ हजार २२६ मातीचे दिवे, २०२० मध्ये ६ लाख ६ हजार ५६९ मातीच्या दिव्यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदणी झाली.
- दीपोत्सव सोहळ्यासाठी राज्यातील प्रत्येक गावात मातीचे पाच दिवे मागवण्याचा निर्णय राज्य स्तरावर लखनौ येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.
- या उपक्रमासाठी नोडल अधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- राज्यातील सर्व गावे आणि जिल्हे अयोध्येतील उत्सवाचा भाग असतील हे उत्तम पाऊल आहे.
- जिल्हा पर्यटन विभागाचे अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली, ४ लाखाहून अधिक दिवे मिळवण्यासाटी गावप्रमुख आणि ग्राम कुंभारांशी संपर्कात होते.