मुक्तपीठ टीम
अपरिचित गडकिल्ल्यांवर ट्रेकिंगचे आयोजन करणाऱ्या ‘कोल्हापूर हायकर्स’ या ग्रुपच्या वतीने मंगळवारी (दि. ०२) संध्याकाळी ‘एक सांज पन्हाळगडावर’ या उपक्रमांतर्गत अनोखा दीपोत्सव साजरा करण्यात आला. या उपक्रमाचे हे आठवे वर्ष होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या शिवप्रेमींच्या उपस्थितीत नियमांचे पालन करून यंदाचा दीपोत्सव साजरा झाला. या दीपोत्सवाने संपूर्ण गडपरिसर उजळून निघाला होता.
बदलत्या काळात आजच्या तरुणाईला इतिहासाचे भान व्हावे आणि किल्ल्यांचे महत्त्व प्रत्येक तरुणापर्यंत पोहोचावे यासाठी हा ग्रुप नेहमी प्रयत्नशील असतो. प्रत्येक वर्षी वेगवेगळे उपक्रम साजरे करण्यात ‘कोल्हापूर हायकर्स’चे सदस्य पुढे असतात.
आपण आपली दिवाळी कायम घरातच साजरी करत असतो, ज्या शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करून संपूर्ण महाराष्ट्र उजळून टाकला, त्याच महाराजांनी घडविलेले अनेक किल्ले दीपावलीच्या काळात अंधारातच असतात, ही बाब लक्षात घेऊन या वर्षी मंगळवारी धनत्रयोदशीदिवशी संध्याकाळी पन्हाळगडावर दीपोत्सव आयोजित करण्यात आला होता. प्रतिवर्षी या दीपोत्सवाचे स्वरूप व्यापक होत असले तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मात्र कमी शिवप्रेमींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला
कोल्हापूर हायकर्स तर्फे गेल्या ८ वर्षापासुन पन्हाळा गडावर धनत्रयोदशीच्या दिवशी दीपोत्सव साजरा केला जातो. यंदाचे हे नववे वर्ष आहे. आज शिवमंदिराचे पूजन करून या दीपोत्सवाची सुरुवात झाली. दुर्ग अभ्यासक डॉ. अमर आडके यांनी उपस्थित शिवप्रेमींना पन्हाळगडाचा इतिहास सांगितला. यावेळी पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा रूपाली रवींद्र धडेल, उपनगराध्यक्ष…. पन्हाळ्याचे तहसीलदार… ……. यांच्या हस्ते शिवमूर्तीचे पूजन होऊन दीपोत्सवास प्रारंभ झाला. दरम्यान,. .. यांची मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. यावेळी कोल्हापूर हायकर्स चे सागर पाटील, अक्षय पाटील, तेजश्री भस्मे, योगेश पाटील, वृषाली मगदूम, सोनाली जाधव, विजय ससे, इंद्रजीत मोर, मुकुंद हावळ, अतुल पाटील, तेजस मजगांवकर, अमरसिंग शिंदे, शुभम, अंजली उपस्थित होते.