मुक्तपीठ टीम
आरे जंगलातच कार शेड लादण्याच्या शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयाविरोधात काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. काँग्रेस पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष समीर सुभाष वर्तक यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातच धडक दिली. खरंतर या पर्यावरणप्रेमींना त्यांच्या घरासमोरच संताप व्यक्त करायचा होता, पण पोलिसांनी त्यांना अडवलं. तरीही जंगलाचा बळी घेऊन कारशेड नको, हा पर्यावरणप्रेमींचा आवाज मात्र ठाण्यात घुमवण्यात त्यांना यश आलं.
मुंबईकरांची ऑक्सिजनची गरज भागवणाऱ्या आरे जंगलाचा बळी घेतल्यामुळे मुंबईचं भविष्य काळकुट्ट होईल, असा आरोप करत काँग्रेसच्या नेतृत्वाखाली पर्यावरणप्रेमींनी ठाणे दणाण…
पालघरमधील झडपोलीच्या जिजाऊ कोकण वर्षा मॅरेथॉनमध्ये दिनकर गुलाब महालेने पटकावला पहिला क्रमांक! खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले विक्रमगडमधील विकास कार्यांचंही उद्घाटन
पालघर जिल्ह्याची क्रीडा क्षेत्रातील गौरवास्पद आयोजन असणारी कोकण वर्षा मॅरेथॉन स्पर्धा आज थाटात पार पडली. जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या मॅरेथॉनला साडे आठ हजारांपेक्षाही जास्त स्पर्धकांनी प्रतिसाद दिला. स्पर्धेच्या पुरस्कार वितरणासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र फाटक, श्रीनिवास वणगा, शांताराम मोरे हे सर्व मान्यवर विक्रमगडमध्ये एकत्र आले. तसेच त्यांनी झडपोलीतील जिजाऊ नगरीतील संस्थेच्या सर्व जनोपयोगी उपक्रमांना भेट दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांनी मिळालेल्या निधीतून विक्रमगड नगरपंचायचतीने साकारलेल्या विकासकार्यांचं उद्घाटन करताना, खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना सामान्यातील सामान्य माणसाचा विकास अभिप्रेत आहे. तो विकास घडवण्यात निलशे सांबरे यांच्या नेतृत्वाखालील जिजाऊ कार्यरत आहे. विक्रमगडमध्ये साहेबांनी फंड दिला, पण तिथं प्रत्यक्षात जिजाऊनं नगरपंचायतीच्या माध्यमातून कार्य उभं केलं. आताही राहणार आहे. जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी ग्रामीण भागात भलं मोठं कार्य करण्यात येत आहे. तर संपादक कैलास म्हापदी यांनी आपले मनोगत व्यक्त करते वेळी, प्रत्येक कार्यक्रमाच्या बाहेर लाखो चपलांचे ढीग पडलेले असतात. मात्र कुणाच्यातरी पायाला हात लावावा असे अलीकडे पाय नाही. रायगड जिल्हा असो वा ठाणे जिल्हा असो. ठाणे जिल्ह्याने धर्मवीर दिला तर आज या पालघर जिल्ह्याच्या निमित्ताने एक कर्मवीर या गोरगरीब मातीला मिळाला आहे. असे बोलून निलेश सांबरे यांच्या कार्याचे कौतुक केले.
कोकण वर्षा मॅरेथॉनमध्ये चमकदार कामगिरी!
विक्रमगड वर्षा मॅरेथॉनच्या मुख्य स्पर्धेत दिनकर गुलाब महाले यांनी बाजी मारली. त्यांच्या मागोमाग दयाराम गणेश गायकवाड हे दुसऱ्या आणि विजय वसंत मोरघा हे तिसऱ्या क्रमांकावर होते.तसेच इतर दोन टप्प्यांवरही आबालवृद्धांचा उत्साही प्रतिसाद होता.
कोकणातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ही स्पर्धा सात वर्षांपूर्वी सुरु झाली. कोरोनामुळे दोन वर्षे होऊ न शकलेल्या या स्पर्धेच्या आजच्या आयोजनात त्यामुळे मोठा उत्साह दिसत होता.आजच्या स्पर्धेत किमान ८ हजार ५०० स्पर्धक सहभागी झाले. त्यांच्यात स्थानिक गावांमधील तरुण-तरुणींबरोबरच बाहेरील जिल्ह्यांमधील स्पर्धकांचाही भरणा होता.
१० वर्षीय वयोगटात मुलांमध्ये प्रशांत विकल गुजड या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक व रोणीत रंजीत पालवा याने द्वितीय क्रमांक पटकावला. तर मुलींमध्ये गौरी मनोज चौधरी हिने प्रथम क्रमांक व प्रियंका वनशा हादळ हिने द्वितीय क्रमांक पटकावला.१७ वर्ष वयोगटात मुलांमध्ये दिपक देवीचरण रावत याने प्रथम क्रमांक व निकेश नवशा डोंगरकर याने द्वितीय क्रमांक पटकावला. तर मुलींमध्ये साधना नरेंद्र यादव हिने प्रथम क्रमांक व अदिती संदीप पाटील हिने द्वितीय क्रमांक पटकावला. १९ वर्षीय वयोगटात मुलांमध्ये रोहन रवींद्र चौधरी याने प्रथम क्रमांक व रोहन रामा वाघ याने द्वितीय क्रमांक पटकावला. तर मुलींमध्ये दिव्या दिनेश पिंगळे हिने प्रथम व कविता शिवराम दांगटे हिने द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच खुल्या गटात पुरुषांमध्ये दिनकर गुलाब महाले यांनी २१ कि.मी अंतर पार करून प्रथम क्रमांक व दयाराम गणेश गायकवाड यांनी द्वितीय क्रमांक पटकावला तर महिलांमध्ये प्रमिला पांडुरंग पाटील यांनी प्रथम क्रमांक व मेहक मंगलदास वसावे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.
खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते दिनकर गुलाब महाले यांना पारितोषिक देऊन त्यांना गौरविण्यात आले. तसेच आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांच्या हस्ते मुलींच्या गटाला पारितोषिक देण्यात आले.
विक्रमगडमधील विकास कार्यांचं भूमिपूजन आणि उद्घाटन
जिजाऊचे संस्थापक, अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या विनंतीवरून सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विक्रमगडसाठी खास निधी मिळवून दिला. नगरपंचायतीत सत्तेत असलेल्या जिजाऊने ती विकास कार्य साकारली आहेत. यशवंतनगर तलाव सुशोभीकरण भूमिपूजन, मुस्लिम कब्रस्तान , रोहिदासनगर समाज मंदिराचे आणि वातानुकुलित व्यायाम शाळेचे लोकार्पण भूमिपूजन खासदार श्रीकांत शिंदे आणि देहर्जे नदीवरील नागझरी (संगमनगर) पुलाचे भूमिपूजन दहिसर विधानसभेच्या आमदार मनीषा चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. आजच्या या भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळ्यामुळे मुख्यमंत्री वडिलांच्या प्रयत्नांनी साकारलेल्या विकासकार्यांचं खासदार सुपुत्रांच्या हस्ते उद्घाटन, असा अभूतपूर्व योग जुळून आला.
याचबरोबर पालघर, डहाणू या तालुक्यांसाठी जिजाऊने दिलेल्या २ रुग्णवाहिकांचे उद्घाटनही खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
आजच्या या कार्यक्रमांना मा.श्री.रविंद्र फाटक साहेब (आमदार तथा संपर्क प्रमुख पालघर जिल्हा), मा.श्री.श्रीनिवास वनगा साहेब (आमदार), मा.श्री.शांताराम मोरे साहेब (आमदार भिवंडी ग्रामीण) हे मान्यवर उपस्थित होते. तसेच आंतरराष्ट्रीय धावपट्टू कविता राऊत यादेखील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.
विक्रमगड नगरपंचायत विकास कार्य संक्षिप्त माहिती
1) यशवंतनगर तलाव सुशोभीकरण भूमिपूजन
- विक्रमगडमधील यशवंतनगर तलाव हा शहरातील एक पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न आहे.
- त्यासाठी या तलावाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे.
2) मुस्लिम कब्रस्तान भूमिपूजन
- विक्रमगडमधील मुस्लिम समाजाची कब्रस्तानाची जागा योग्य सुविधायुक्त नाही.
- दफनाच्यावेळी स्थानिक मुस्लिम बांधवांना त्रास होत असे, अशा तक्रारी येत होत्या.
- त्या तक्रारींची दखल घेत या कब्रस्तानाच्या कामाला हात घालण्यात आला आहे.
- सर्व धर्मांना समानतेनं वागवण्याच्या धोरणानुसार या कब्रस्तानातीस सुविधा कार्याचे नियोजन करण्यात आले आहे.
- त्यामुळे स्थानिक मुस्लिम समाजातील सर्वच थरातील नागरिकांनी धन्यवाद दिले आहेत.
3) देहर्जे नदीवरील नागझरी (संगमनगर) पुलाचे भूमिपूजन
- विक्रमगड परिसरातून वाहणाऱ्या देहर्जे नदीला ओलांडण्यासाठी योग्य सुविधा नाही.
- त्यामुळे परिसरातील अनेक गाव पाडे आहेत. त्यातील रहिवाशांना खूप त्रास होत असतो.
- नागझरी (संगम नगर) भागात फक्त एक छोटा बंधारा आहे.
- त्यावरून नदी ओलांडताना अनेकांना दुखापत झाली आहे.
- अशा अनेक तक्रारी आणि पुलाच्या मागणीची दखल घेत तेथे पूल उभारणीचे काम करण्यात येणार आहे.
- नदीवरील पुलाच्या कामाचे भूमिपूजन आज करण्यात येणार आहे.
- या पुलामुळे परिसरातील हजारो स्थानिक गावकऱ्यांना आता अवघ्या काही मिनिटात विक्रमगडात शहरात पोहचणे शक्य होणार आहे.
4) रोहिदासनगर समाज मंदिर आणि वातानुकुलित व्यायाम शाळा लोकार्पण सोहळा
- रोहिदासनगर परिसरातील लोकांच्या मागणीनुसार तेथे कार्यक्रमांसाठी वास्तूची आवश्यकता होती.
- लोकांच्या मागणीची दखल घेत काम करण्यात आले.
- त्यानुसार रोहिदासनगर समाज मंदिराची वास्तू उभारण्यात आली आहे.
- तसेच तेथे व्यायामासाठी एका वातानुकुलित व्यायामशाळेची उभारणी करण्यात आली आहे.
- त्यामुळे आता कार्यक्रमासाठी आणि व्यायामासाठी सोय झाली आहे.
विक्रमगड नगरपंचायत मधील यशवंत नगर येथील तलाव सुशोभीकरण भूमिपूजन, कब्रस्तान भूमिपूजन व रोहिदास नगर येथील समाज हॉल व व्यायाम शाळेचा लोकार्पण सोहळा खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी श्रीकांत शिंदे म्हणाले की, पैसे तर सगळेच कमवतात पण ती देण्याची दानत आणि हिंमत पाहिजे ती दानत आणि हिंमत निलेश सांबरे यांच्याकडे आहे.