मुक्तपीठ टीम
गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकामध्ये हिजाब प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. हिजाब प्रकरणाचे पडसाद आता देशभरात उमटाना दिसत आहेत. अनेक ठिकाणी आंदोलने, घोषणा दिल्या जात आहे. महाराष्ट्रातही याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी राजकिय पक्षांना इशारा दिला आहे. राज्यात वातावरण बिघडवू नका, शांतता राखा, असे यावेळी आवाहन त्यांनी केले.
…तर समाजात एक दुही तयार होते
- जाती-जातीमध्ये किंवा धर्मा-धर्मामध्ये आपण अनावश्यक संघर्ष करायला लागलो, तर समाजात एक दुही तयार होते.
- त्यामुळे हे आंदोलन शक्यतो करु नये.
- माझी सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी शांतता पाळण्यासाठी सहकार्य करावे.
राजकीय पक्षांनाही आवाहन
- यावेळी त्यांनी राजकीय पक्षांना आंदोलनाबाबत तंबी दिली.
- जे मी सामान्य नागरिकांना सांगितले तेच राजकीय पक्षांनाही सांगत आहे.
- त्यांनी विनाकारण राज्यात या विषयावरून शांतता बिघडवू नका आणि पोलीस विभागाचं काम वाढवू नये.
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांचे आदेश
- हिजाबवरून राज्यातील वेगवेगळ्या भागात जे आंदोलन सुरू आहे त्याबाबत गृहविभागाने पूर्ण तयारी केली आहे.
- सर्व प्रमुख अधिकार्यांना सूचना दिल्या आहेत.
- आंदोलन होऊ नये यासाठी प्रयत्न करा, असे स्पष्ट आदेश गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले आहेत.
- त्याचवेळी जर आंदोलन झाले तर ते शांततेत पार पाडा, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
रोष वाढवणारे वक्तव्य करू नये
- शुक्रवारी जुम्मेच्या दिवशी ठिकठिकाणी नमाज पडला जाईल आणि या नमाजानंतर ठिकठिकाणी आंदोलन करण्याचा प्रयत्न असून, यासंदर्भामध्ये स्थानिक पोलिसांना सूचना दिल्या आहेत.
- आम्ही याबाबत सातत्याने त्यांना मॉनेटरिंग करत आहोत.
- कोणालाही प्रक्षोब्ध करणारे आणि रोष वाढवणारे वक्तव्य याठीकाणी कोणीही करु नये.