Wednesday, May 28, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दिलीप सोनिगरा रॉयल्स ‘पुणे ज्वेलर्स प्रीमियर लीग’चे विजेतेपद

November 24, 2022
in घडलं-बिघडलं
0
Dilip Sonigara Royals

मुक्तपीठ टीम

पहिल्या ‘पुणे ज्वेलर्स प्रीमियर लीग २०२२’ क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद दिलीप सोनिगरा रॉयल्सने पटकावले. नगरकर सुपरकिंग्सवर ८ गडी राखून  रॉयल्सने दणदणीत विजय मिळवला आणि सुवर्ण करंडकावर आपले नाव कोरले. सलामीवीर वीरेन पालेशाची २३ चेंडूत नाबाद ३५ धावांची धडाकेबाज खेळी आणि कर्णधार केतन परमारची १३ चेंडूत १६ धावांची मिळालेली साथ दिलीप सोनिगरा रॉयल्सच्या विजयात महत्वाची ठरली. सामनावीर व मालिकावीराचा किताब केतन परमारने पटकावला. विजेत्यांना १ लाख ५१ हजार, तर उपविजेत्याना ७५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक मिळाले.

महिला गटात दर्शना शाँडच्या नेतृत्वाखाली गांधी रॉयल एंजेल्सने पुष्पम पलटन्सवर ३१ धावांनी मात करीत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. विजेत्यांना प्रथम फलंदाजी करताना एंजेल्सने ६ षटकांत ४ गडी गमावून ७८ धावा केल्या. ७९ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या पलटन्सला केवळ ४७ धावा करता आल्या. ३९ धावा करणारी साक्षी पुनमीया सामनावीर ठरली. महिला गटात विजेत्यांना २१ हजार, तर उपविजेत्याना ११ हजारांचे रोख पारितोषिक मिळाले.

नगरकर सुपरकिंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, पहिल्याच षटकात सलामीवीर भाविक लोढा अवघ्या दोन धावा काढून झेलबाद झाला. यश सोनिगरा १४ (१० चेंडूत), निखिल लुंकड १६ (२० चेंडूत) आणि यश सोनिग्रा १८ (१६ चेंडूत) यांचा अपवाद वगळता इतर खेळाडूंना चांगली फलंदाजी करता आली. कर्णधार चेतन परमार अवघी एक धाव काढून बाद झाला. निर्धारित १० षटकांत सुपरकिंग्जला ६ गडी गमावत ६१ धावा करता आल्या. रॉयल्सकडून मनोज मेहता व केतन परमार यांनी प्रत्येकी दोन, तर वेतन शहा याने एक बळी घेतला.

विजयासाठी ६२ धावांचे लक्ष्य घेऊन आत्मविश्वासाने मैदानात उतरलेल्या रॉयल्सची सुरुवातही चांगली झाली नाही. सलामीवीर परेश ६ चेंडू खेळून शून्यावर बाद झाला. वीरेन पालेशा नाबाद ३५ (२३ चेंडू) व केतन परमारने १६ (१३ चेंडूत) सुपरकिंग्जच्या गोलंदाजांवर तुटून पडत जोरदार फटकेबाजी केली. पालेशाने तीन चौकार व एक षटकार लगावला. सुपरकिंग्जकडून केवळ यश सोनिगराने दोन बळी मिळवले.

पुणे सराफ असोसिएशनच्या ९८ व्या वर्धापन दिनानिमित्त सहकारनगर येथील शिंदे हायस्कुलच्या क्रिकेट मैदानावर आयोजिलेल्या क्रिकेट स्पर्धेचे पारितोषिक वितरण माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाले. यावेळी स्थानिक नगरसेवक महेश वाबळे, असोसिएशनचे अध्यक्ष फतेचंद रांका, सचिव अमृत सोलंकी, खजिनदार कुमारपाल सोळंकी, उपसचिव राजेंद्र वायकर, स्पर्धेचे संयोजक अंकित शाँड, अभिषेक मुथा, कुणाल सिरोया, विपुल अष्टेकर आदी उपस्थित होते.

मुरलीधर मोहोळ म्हणाले, “क्रिकेटसारख्या खेळामुळे परस्परांतील नातेबंध अधिक दृढ होतात. आपल्यातील एकी वाढते. सराफ असोसिएशनने आयोजिलेल्या या स्पर्धेमुळे पुण्यातील सर्व सराफ व्यावसायिक एकत्र येऊन खेळले. खेळामुळे आपले आरोग्य व सामाजिक भान चांगले होते.”

फतेचंद रांका म्हणाले, “पहिल्यांदाच अशी स्पर्धा घेतली. तरुणांचा उत्साह प्रेरक होता. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ३४ सामने झाले. सराफांची मुले व मुली यामध्ये खेळल्या. खेळाचे महत्व मुलांमध्ये रुजले असून, असोसिएशन शतकाकडे वाटचाल करत असल्याने यापुढे आणखी मोठ्या प्रमाणात स्पर्धेचे आयोजन करू.”


Tags: Maharashtraदिलीप सोनिगरा रॉयल्सपुणे ज्वेलर्स प्रीमियर लीगमहाराष्ट्र
Previous Post

श्रीधर फडके यांच्या ‘बाबूजी आणि मी’ सांगीतिक मैफलीची विद्यार्थी साहाय्यक समितीतर्फे आयोजन

Next Post

नवचैतन्य हास्ययोग परिवारातर्फे पुण्यात महाराष्ट्र हास्ययोग परिषद

Next Post
Maharashtra Hasyayod parishad

नवचैतन्य हास्ययोग परिवारातर्फे पुण्यात महाराष्ट्र हास्ययोग परिषद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!
featured

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

by Tulsidas Bhoite
May 27, 2025
0

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!