दिलीप नारायणराव डाळीमकर
माझा मुलगा Tolerance चा मराठीत अर्थ विचारत होता..
त्याला मी Tolerance चा *सहनशीलता असा अर्थ सांगितला.
त्याने “सहनशीलता”
म्हणजे काय असे पुन्हा विचारले.
त्याला सहनशीलता शब्दाचा अर्थ सांगत असतांना सहनशीलता म्हणजे काय?
एकच शब्द मनात आला
स्त्री”.
सहनशीलता शब्दाचा अर्थ म्हणजे “स्त्री
ज्याप्रमाणे एखादी मेणबत्ती इतरांना प्रकाश देण्यासाठी जळत असते त्याचप्रमाणे एक स्त्री इतरांच्या जीवनाला प्रकाश देण्यासाठी स्वतःला समर्पित करते. स्त्री – आई, पत्नी, बहीण किंवा मुलगी कुठल्याही प्रकारची असू शकते. मेणबत्तीच्या मेणाप्रमाणे स्त्रीचे आयुष्य वितळतच राहत असते.स्त्रिया आयुष्यभर कष्ट सहन करत असतात.
स्त्री एक मुलगी म्हणून एखाद्याच्या अंगणात प्रकाश टाकण्याची, आई-वडिलांचे नाव उज्ज्वल करण्याची जबाबदारी घेते.
जगातील लोकं जेंव्हा “मुलगा आणि मुलगी” असा भेदभाव करत असतात, तो भेदभाव मुलगी सहन करत असते.
एक बहीण म्हणून, एक स्त्री तिच्या भावंडांकडे स्वप्ने सांगायला शिकते. आपल्या प्रत्येक इच्छा दडपवते, जेव्हा कुटुंबात मुलाचा दर्जा मिळत नाही तेव्हा तिला किती त्रास सहन करावा लागतो.
आपल्या पतीच्या जीवनात आनंद भरण्यासाठी ही स्त्री एक पत्नी म्हणून आपले कुटुंब, बालपणाच्या आठवणी, सर्व आनंद सोडून देते. प्रत्येक गोष्ट सहन करते, सर्व आशा आकांक्षा सोडून देते आणि आयुष्य आपल्या कुटुंबासाठी समर्पित करते.
आई म्हणून एक स्त्री…? आई म्हणून स्त्रीच्या सहनशीलतेला मर्यादा नाही. आई हा एक अपरिभाषित, सुप्त वेगळा प्रकार आहे.आई शब्दाची व्याख्या करण्यासाठी शब्द अपुरे पडतात.आई कितीतरी दु: ख सहन करत असते.आईस संयम व प्रेमाची मुर्ति म्हटले जाते.
प्रत्येक स्वरूपात ही मेणबत्ती वितळते, जीवनातील अगदी गडद अंधार देखील दूर करते.एका स्त्रीची शक्ती अग्नीप्रमाणे “वेगवान” असते, ती स्वतःला विसरते आणि इतरांना प्रकाश देते.
स्त्री जात ही जगातील सर्वात सहनशील जात आहे..आपल्या जीवनात आई पत्नी मुलगी बहिण अश्या विविध भूमिका समर्थपणे निभावणाऱ्या स्त्री जातीचा आदर करा सन्मान करा..
शेतकरी पुत्र ; लेखक- सामाजिक राजकीय विषयावर लेखन
ग्रामीण जीवनावर आधारित कविता लेखन