मुक्तपीठ टीम
डिजिटल इंडिया, आत्मनिर्भर भारत आणि पीएम ई-विद्या प्रोग्राम अंतर्गत भारत सरकारने दिक्षा अॅप तयार केले आहे. हे अॅप म्हणजे शालेय शिक्षणाचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. कोरोनाच्या संकटकाळात या माध्यमातून घर बसल्या शिक्षण शक्य झाले आहे. या अॅपमार्फत विद्यार्थी एनसीईआरटी, सीबीएसई आणि राज्य मंडळांचा कोणताही अभ्यासक्रम कोणतेही शुल्क न भरता शिकू शकतात.
दिक्षा (Diksha) अॅप आहे तरी काय?
• दिक्षा अॅप नॅशनल काउंसिल फॉर टीचर्स एज्युकेशनने घडवलेलं अँड्रॉइड अॅप्लिकेशन आहे, जे मोबाइलवर इंस्टॉल करताच घर बसल्या त्यावरुन अभ्यास करु शकतो.
• या अॅपवरुन पहिले ते दहावीपर्यंतचा ऑनलाइन अभ्यास करता येऊ शकतो.
• येणाऱ्या काळात उच्च माध्यमिक शिक्षणाचा अभ्यासक्रमही असण्याची शक्यता आहे.
• हे अॅप कोणत्या एका राज्यासाठी मर्यादित नसून भारतातील कोणत्याही राज्यातील विद्यार्थी याचा सुलभतेने वापर करु शकतात.
• हे अॅप मराठी, इंग्रजी, हिंदी, तामिळ आणि तेलगू या भाषांमध्ये उपलब्ध आहे.
• अॅपच्या माध्यमातून स्टडी मटेरिअल सुद्धा डाऊनलोड करु शकतो.
• जागतिक बँकेनेही दिक्षाचा वापर आफ्रिकेसारख्या दुसऱ्या खंडातही होत असल्याबद्दल कौतुक केले आहे.
#DIKSHA is a unified digital platform for education👨🎓👩🎓 is bringing together countries across continents.
cc @EduMinOfIndia @GoI_MeitY @WBG_Education @WorldBank @WorldBankAfrica @NandanNilekani @JUNAIDWBG
Watch to learn more about India-Africa knowledge exchange. pic.twitter.com/UD8bvXwaG0— World Bank India (@WorldBankIndia) December 18, 2020
असे वापरा दिक्षा (Diksha) अॅप
• या अॅपचा वापर करायचे असल्यास सर्वप्रथन गुगल प्ले स्टोरवरुन अॅपला डाऊनलोड करा.
• अॅप डाऊनलोड केल्यानंतर भाषा निवडा.
• त्यानंतर विद्यार्थी, शिक्षक आणि इतर असे तीन पर्याय दिसतील.
• वरील पर्याय निवडल्यानंतर अॅपच्या परवानगीसाठी एक पॉप-अप दिसेल, त्याला allow करा.
• आपला बोर्ड आणि राज्य निवडा.
• त्यानंतर भाषा आणि वर्ग निवडा.
• एवढे केल्यानंतर आपण निवडेल्या वर्गासंबंधितील सर्व स्टडी मटेरिअल पाहाण्यास मिळेल.
• त्यानंतर या अॅपच्या माध्यमातून मोफत शिक्षण घेऊ शकता.