मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांमधील मोठ्या हॉस्पिटलमध्ये न होणाऱ्या अस्थिरोगावरील अत्यंत अवघड शस्त्रक्रिया सोलापुरातील अस्थिरोग तज्ञ डॉक्टर संदीप आडके यांनी नुकत्याच यशस्वी करून दाखवल्या आहेत. दिनांक २४ डिसेंबर २०१९ रोजी २८ वर्षाच्या गुंडप्पा याचा पुण्यामध्ये मोटरसायकलला टेम्पोने धडक दिल्याने एक्सीडेंट होऊन त्याच्या उजव्या मांडीचे व उजव्या नडगीचे हाड तुटून मोठ्या जखमा होऊन हाड बाहेर आले होते. हा युवक तालुका चडचण जिल्हा विजयपूर येथून पुण्यामध्ये नुकत्याच लागलेल्या नोकरीत कार्यरत होता .एक्सीडेंट नंतर पुण्यातील बऱ्याच मोठ्या हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले. परंतु त्यावर फक्त प्राथमिक उपचार करण्यात आले व त्याच्या वर उपचार करण्यात तेथील हॉस्पिटल्सने असमर्थता दर्शवली. त्यानंतर त्यास सांगली येथील एका अस्थीरोग तज्ञांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले परंतु तेथे सुद्धा त्याच्यावर उपचार न झाल्याने त्याला पुढे बेळगाव मधील एका मोठ्या मेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये पाठवण्यात आले. बेळगाव मध्ये फक्त प्राथमिक स्वरूपाचे ऑपरेशन करून पुढील उपचारासाठी त्याला सोलापूर मध्ये डॉक्टर संदीप आडके यांच्या आडके हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला देण्यात आला.
सोलापूरात रुग्णाच्या उजव्या पायावर डॉक्टर संदीप आडके यांनी रशियन एलिझारोव पद्धतीने बाहेरूनच बारीक तारा व रिगांची फ्रेम लावून शस्त्रक्रिया केली. त्यानंतर २४ तासातच हा रुग्ण आपल्या पायावर वाकरच्या साह्याने चालू लागला. आज जवळपास १३ महिन्याच्या कालावधीनंतर त्याची ट्रीटमेंट संपूर्ण होऊन रंगाची फ्रेम काढून टाकण्यात आली आहे. त्याची सर्व हाडे जुळलेली आहेत, त्याचा पाय वाचवण्यात डॉक्टर संदीप आडके यांना यश आले आहे. त्यामुळे गुंडप्पाच्या एका नवीन आयुष्यात सुरुवात झाली आहे. नुकतेच विजयपूर येथील एका छोट्या गावात एका तीस वर्षाच्या युवतीवर तलवारीने हल्ला झाला त्यात तिचा एक हात कापला गेला तसेच डोक्यावर , हनुवटीवर व दुसऱ्या हातात जखमा, फ्रॅक्चरस झाली. तिला विजयापुरातील दोन मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले परंतु तेथील चार दिवसाच्या कालावधीत तिच्यावर कोणतीही पुढील शस्त्रक्रिया ते करू शकले शकले नाहीत, त्यामुळे तिला सोलापूरच्या आडके हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले. येथे आल्यावर तिच्यावर दोनच दिवसांमध्ये चार बाटल्या रक्त चढवून उजव्या हातावर रशियन पद्धतीने ट्रीटमेंट करण्यात आली व बाकीच्या सर्व जखमावर शस्त्रक्रिया करण्यात आली .त्यामुळे तिचा उजवा हात वाचला आहे व नंतर डाव्या हाताला कृत्रिम हात बसवण्याचे डॉक्टरांनी ठरवले आहे .
अशा पद्धतीच्या अतिशय अवघड व गुंतागुंतीच्या अस्थीरोगावरील शस्त्रक्रियांसाठी सोलापुरातील आडके हॉस्पिटल हे भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे आज सोलापुरात विमानसेवा उपलब्ध नसतानासुद्धा नेहमी येथे अस्थीरोग ,नेत्ररोग ,बाल रोग सुपर स्पेशालिटी ट्रीटमेंटसाठी रुग्ण रेफर होत असतात. जर येथील विमानसेवा लवकरच सुरू झाली तर अशा दुरून येणाऱ्या रुग्णांची गैरसोय टळून येथील आर्थिक प्रगतीला अधिक चालना मिळेल असे डॉक्टर संदीप आडके यांनी सांगितले.