मुक्तपीठ टीम
भारताच्या ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीच्या राजपथावर एका भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी इंडिया गेटवर राष्ट्रध्वज फडकावला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७३ व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी उत्तराखंडमध्ये वापरत असलेली पारंपारिक टोपी परिधान केली आहे. याशिवाय पंतप्रधान मोदी यांनी गळ्यात मणिपूरमध्ये वापरत असलेला गमछा घातला आहे. यासोबतच त्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंग्याला खास सलामीही दिली.
पंतप्रधान मोदी खास अंदाजात
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तराखंडची टोपी घातली होती.
- या टोपीवर ब्रह्मकमळ होते.
- यासोबत त्यांनी मणिपूरचा गमछा घातला होता.
- प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी ज्या पद्धतीने तिरंग्याला वंदन केले ते नौदलाला समर्पित करण्यात आले.
मोदींच्या टोपीचं वैशिष्ट्य
- मोदी यांनी प्रजासत्ताक दिनी उत्तराखंडची टोपी आणि मणिपूरचा गमछा परिधान केला होता.
- टोपीवर ब्रह्म कमळ आहे, जे उत्तराखंडचे राज्य फूल आहे आणि एक शुभ प्रतीक मानलं जातं.
- याशिवाय त्यामध्ये चार रंगांची एक पट्टी बनवण्यात आली आहे, जी जीवसृष्टी, निसर्ग, पृथ्वी, आकाश यांचं प्रतिक आहे.
- टोपी उत्तराखंडमधील स्थानिक कारागिरांनी बनवली आहे.
पंतप्रधान मोंदींची विशेष सलामी
- लष्कराच्या तिन्ही विंगचे सॅल्युट वेगळे आहेत.
- ७३ व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात तिरंगा फडकावताना पंतप्रधान मोदींनी नौदलाच्या शैलीत सलामी दिली.
- नौदलात नेहमी उजव्या हाताचा पंजा किंचित पुढे टेकवून सलामी दिली जाते.
- यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राजपथावर तिरंगा फडकवल्यानंतर राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट दिली.
- तेथे त्यांनी लष्कराच्या जवानांना सलामी दिली.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पांजली वाहिली.
दरवर्षी वेगवेगळ्या पगडी किंवा फेटा परिधान करतात मोदी
- प्रजासत्ताक दिनाच्या हा शानदार सोहळा सुरु असताना सर्वाचं लक्ष वेधून घेतलं ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टोपी आणि गमछाने.
- मोदी दरवर्षी प्रजासत्ताक दिनाला वेगवेगळ्या पगडी किंवा फेटा परिधान केल्याचे दिसतात.
- गेल्यावर्षी नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या जामनगरची खास पगडी परिधान केली होती. जामनगरच्या राजघराण्याकडून त्यांना ही पगडी भेट म्हणून दिली होती.