मुक्तपीठ टीम
धर्मवीर आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे हे गेल्या काही दिवसांपासून जोरदार सक्रिय झाले आहेत. आजवर फक्त धार्मिक, अध्यात्मिक भेटीगाठींमध्ये सक्रिय दिसणारे केदार दिघे हे आता थेट शिवसेना बंडखोरांवर उघडपणे हल्लाबोल करू लागले आहेत. त्यांनी निष्ठेच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह अन्य शिवसेना बंडखोरांना लक्ष्य केले आहे. शिंदे गटाने छापलेल्या जाहिरातीत धर्मवीर आनंद दिघेंचा म्हणून अभिनेते प्रसाद ओकांचा फोटा छापण्यासही त्यांनी आक्षेप घेतला आहे.
केदार दिघे हे धर्मवीर आनंद दिघेंचे पुतणे आहेत. शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर केदार दिघे हे गेल्या काही दिवसांपासून जोरदार सक्रिय झाले आहेत.आजवर त्यांची सक्रियता ही धर्मवीर आनंद दिघे यांचा आनंद मठ आणि धार्मिक ठिकाणी जास्त दिसत असे. ते राजकीय मतप्रदर्शनापासून दूर असल्याचं त्यांच्या सोशल मीडियावरून दिसते. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली बंडखोरी झाली आणि केदार दिघे आक्रमकतेने पुढे सरसावल्याचं दिसत आहे.
केदार दिघे हे एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीमुळे संकटात आली तेव्हापासून आक्रमकतेने पुढे आले आहेत. त्यांनी आज धर्मवीर आनंद दिघेंऐवजी अभिनेते प्रसाद ओक यांचा फोटा वापरण्यावर आक्षेप घेतला, तसंच ते गेले काही दिवस शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत.
एकनाथ शिंदे समर्थकांनी एका स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्यावर धर्मवीर आनंद दिघेंचा म्हणून त्यांची भूमिका करणारे अभिनेते प्रसाद ओक यांचा फोटो वापरला आहे. त्यावर आक्षेप घेत त्यांनी कडक शब्दात शिंदे समर्थकांना सुनावलं आहे, “जे करता ते तरी धड करा. दिघे साहेबांचा फोटो वापरता, तो तरी original ठेवा. प्रसाद ओक ह्यांनी चांगली भूमिका साकारण्याचा प्रयत्न केला त्या बाबतीत कौतुक पण बॅनर लावताना, लावणाऱ्यांनी आपली नजर आणि बुद्धी शाबूत ठेवावी! उतावळेपणा चांगला नसतो!
जे करता ते तरी धड करा.. दिघे साहेबांचा फोटो वापरता, तो तरी original ठेवा. प्रसाद ओक ह्यांनी चांगली भूमिका साकारण्याचा प्रयत्न केला त्या बाबतीत कौतुक पण बॅनर लावताना, लावणार्यांनी आपली नजर आणि बुद्धी शाबूत ठेवावी ! उतावळे पणा चांगला नसतो .. pic.twitter.com/QE9RIJ0VJu
— Kedar Dighe (@KedarDighe1) July 9, 2022
बंडानंतर केदार दिघे यांनी ठाणे, कल्याण, डोंबिवली, पुणे परिसरातील चांद्रसेनीय कायस्थ प्रभू म्हणजेच सीकेपी ज्ञाती समाजातील ज्येष्ठांना एकत्र केले. ते अनेक ज्येष्ठांसह वांद्र्याला मातोश्री निवास स्थानी गेले. तेथे त्यांनी सीकेपी ज्ञातीबांधव-भगिनींसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना समर्थन जाहीर केले.
#ठाणे, #कल्याण, #डोंबिवली, #पुणे परीसरातील #चांद्रसेनीय #कायस्थ #प्रभू ज्ञाती समाजातील अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ बंधू भगिनींनी “#मातोश्री” निवास स्थानी #शिवसेनेचे #पक्षप्रमुख मा. श्री. “#उद्धवजी #ठाकरे” साहेब ह्यांच्या समनार्थ भेट घेतली… @OfficeofUT @AUThackeray @ShivSena pic.twitter.com/Qpw4t5IRI1
— Kedar Dighe (@KedarDighe1) July 3, 2022
विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीच्या निकालानंतरही त्यांनी विचारलेला प्रश्न अस्वस्थ करणारा होता. त्यांनी विचारलं, “बाळासाहेबांच्या शिवसैनिकांचा त्यांनी आज पराभव केला. आम्हीच खरी शिवसेना म्हणत बाजूला गेलेल्यांनी भाजपचे राहुल नार्वेकर यांना विजयी केले. कट्टर बाळासाहेबांचे शिवसैनिक राजन साळवी यांचा या खरी शिवसेना म्हणणाऱ्यांनी पराभव केला! निष्ठावंत कोण?”
#बाळासाहेबांच्या #शिवसैनिकांचा त्यांनी आज पराभव केला..
आम्हीच खरी शिवसेना म्हणत बाजूला गेलेल्यांनी #भाजपचे #राहुल #नार्वेकर यांना विजयी केले..कट्टर बाळासाहेबांचे शिवसैनिक #राजन #साळवी यांचा या खरी शिवसेना म्हणणाऱ्यांनी पराभव केला! #निष्ठावंत कोण? @OfficeofUT @AUThackeray— Kedar Dighe (@KedarDighe1) July 4, 2022
केदार दिघे यांनी पक्षादेशाचा संदर्भ देत निष्ठेवर प्रश्न उपस्थित केले आहे. भाजपामधील मुख्यमंत्रीपदाचे दावेदार देवेंद्र फडणवीस यांनी पक्षादेश मानून उपमुख्यमंत्री पद स्वीकारले. शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपापासून शिवसेना वाचवण्यासाठी घेतलेल्या निर्णयाविरोधात पक्षादेश डावलून गेलेले काहीजण! आता यांच्यापैकी खरे निष्ठावंत कोण? असा खुपणारा प्रश्नही केदार दिघे यांनी विचारला आहे.
#पक्षादेश…आणि #निष्ठा!#मुख्यमंत्री पदाचे दावेदार #फडणवीस यांनी पक्षादेश मानून #उपमुख्यमंत्री पद स्वीकारले…पक्ष प्रमुख #उद्धव_साहेब_ठाकरे यांनी #भाजप पासून #शिवसेना वाचवण्यासाठी घेतलेल्या निर्णयाविरोधात पक्षादेश डावलून गेलेले…काहीजण!#निष्ठावंत कोण? @ANI
— Kedar Dighe (@KedarDighe1) July 1, 2022
केदार दिघे यांनी आपल्या सोशल मीडिया प्रोफाइलमध्ये फक्त राजकारणी एवढाच उल्लेख केला आहे. तसेच धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष असा उल्लेख असलेली इमेज वापरली आहे. तेथे उल्लेख नसला तरी ते आता शिवसेनेत सक्रिय झाल्याचे त्यांच्या ट्वीट्सवरून कळत आहे.