मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. दरम्यान आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आणि कोरोनाच्या पहिल्या लाटेत हॉटस्पॉट असलेल्या धारावी परिसरातून दिलासादायक बाब समोर आली आहे. धारावीत बुधवारी एकही नाही, तर गुरुवारी कोरोनाचा एका रुग्णाची नोंद झाली आहे. धारावीत सध्या कोरोनाचे एकूण १९ सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे धारावीची वाटचाल कोरोनामुक्तीकडे होत आहे. हे देशात गौरव झालेल्या कोरोना नियंत्रणाच्या मुंबई मॉडेलचं यश मानलं जात आहे.
चार महिन्यांत पहिल्यांदाच गुरुवारी मुंबईच्या धारावीमध्ये कोरोनाचा फक्त एक नवीन रुग्ण आढळला आहे. मुंबई मनपाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, शहरातील सर्वात दाट लोकवस्तीच्या या मोठ्या झोपडपट्टी भागात बुधवारी एकही रुग्ण आढळलेला नव्हता. गुरुवारी एक नवा रुग्ण आढळल्याने ४८ तासात एकच रुग्ण सापडला आहे.
कोरोनामुक्तीकडे धारावी…
- धारावीतील एकूण रुग्णांची संख्या ६८२९ वर पोचली आहे.
- त्यापैकी ६,४५१ रूग्ण बरेही झाले आहेत.
- १९ जणांवर उपचार सुरू आहेत.
- ८ एप्रिलला धारावीत ९९ प्रकरणांची नोंद करण्यात आली होती.