मुक्तपीठ टीम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनच्या मुद्द्यावरुन शुक्रवारी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. त्यानंतर विरोधी पक्षेनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनच्या समर्थनार्थ उदाहरण दिलेल्या युरोपियन देशांची नावे घेत त्यांनी नागरिकांना दिलेल्या मदत पॅकेजेसची माहिती दिली आहे. तसे करत फडणवीसांनी “युके,जर्मनी कुठेही जा,सर्वांनीच काही ना काही दिलंय…
तुलना केवळ परिस्थितीशी नको,सरकारच्या कृतीशीही व्हावी,एवढीच महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा!” असा मुख्यमंत्री ठाकरेंना टोलाही मारला आहे. मात्र, त्यांनी दिलेली पॅकेजेसची उदाहरणे त्या-त्या देशांच्या सरकारने दिलेल्या मदतीची असल्याने तुम्ही अशा पॅकेजेससाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना का विचारत नाही. विसरलात का, महाराष्ट्र भारत देशातच आहे, असे त्यांच्या ट्विट मालिकेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना ट्विटरकरांनी त्यांना सुनावले आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या युरोपियन देशांच्या पॅकेजेसची उदाहरणे देत टोला मारणाऱ्या ट्विट्सनंतर त्यांना आलेली काही उत्तरे:
- pravin wakchaure
@Wakchaureprav
मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी अशी मेख मारली की मोदींनी जाहीर केलेले फसवे पॅकेज आणि इतर देशांच्या प्रमुखांनी जाहीर केलेले खरेखुरे पॅकेज यातील फरक फडणवीसांच्याच तोंडून वदवून घेतला.
- BHARAT PARBHANE
@parbhane
आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होता त्यामुळे महाराष्ट्र हे राज्य आहे आणि युके जर्मनी हे देश आहेत आणि त्या त्या देशाच्या प्रमुखांनी भरीव मदत जाहीर करून खरोखर दिली सुध्दा. हा आता तुम्हाला आडून आडून जर
@narendramodi
यांच्यावर टिका करायची असेल तर तुमचे ट्विट बरोबर आहे.
आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होता त्यामुळे महाराष्ट्र हे राज्य आहे आणि युके जर्मनी हे देश आहेत आणि त्या त्या देशाच्या प्रमुखांनी भरीव मदत जाहीर करून खरोखर दिली सुध्दा. हा आता तुम्हाला आडून आडून जर @narendramodi यांच्यावर टिका करायची असेल तर तुमचे ट्विट बरोबर आहे.
— BHARAT PARBHANE🏹🚜 (@parbhane) April 3, 2021
- Vinod Nigde
@nigde_vinod
२० लाख करोड वर फडणवीसने पारायणे ठोकली…आज कोणत्या गोडाऊनमध्ये कोंबून ठेवलेत तेवढं एकदा सांगावे…
२० लाख करोड वर फडणवीसने पारायणे ठोकली…
आज कोणत्या गोडाऊनमध्ये कोंबून ठेवलेत तेवढं एकदा सांगावे…
— Vinod Nigde (@nigde_vinod) April 2, 2021
- Forest Gump
@bibrale
हेच तुम्ही बहुमत असलेल्या केंद्र सरकारला जाऊन सांगा. कुंभ मेळा, रमजान च्या दरम्यान कलम १४४ लागू करा
_ देशात वर्षभर निवडणुका चालणार आहेत या न त्या राज्यात तिकडे तुमचे मंत्री तोंड वर करून मोकाट रॅली काढताय त्याचे काय?
पक्षाच्या पलीकडे जाऊन ऑनलाईन नाही घेऊ शकत तुम्ही?
हेच तुम्ही बहुमत असलेल्या केंद्र सरकारला जाऊन सांगा
_ कुंभ मेळा, रमजान च्या दरम्यान कलम १४४ लागू करा
_ देशात वर्षभर निवडणुका चालणार आहेत या न त्या राज्यात तिकडे तुमचे मंत्री तोंड वर करून मोकाट रॅली काढताय त्याचे काय?
पक्षाच्या पलीकडे जाऊन ऑनलाईन नाही घेऊ शकत तुम्ही?— Forest Gump (@bibrale) April 2, 2021
- nilesh
@NK19854
तेच तर आम्ही विचारात आहोत केंद्र सरकार ने जे लाखो कोटी चे कर्ज घेतले ते गेले कुठे काय केले त्याचे की बंगाल जिंकण्यासाठी देशावर कर्जाचा बोजा वाढवला कुठे गेले २० लाख कोटी फकीर बेफकिर राहिला म्हणून आज देशावर ही वेळ आली आहे नाहीतर आज ही वेळच आली नसती

— nilesh (@NK19854) April 2, 2021
- Sunil Mayekar
@SunilMayekar9
साहेब खरचं तुम्ही परमबीर सिंग, वाजे इकडं लक्ष द्या! ! सत्ता पाहिजे ना? मग असे अनेक वाजे, परमबीर सिंग तयार करा! तुमची इमेज उजळेल! कोरोना, लोकांबद्दल तळमळ हा आपला प्रांत नाही. तो मा. मुख्यमंत्री सांभाळतील! तुम्ही राजकारण करा! शुभेच्छा!

— Sunil Mayekar (@SunilMayekar9) April 3, 2021
- मनोज चंद्रकांत गांवकर
@MANOJCGAONKAR
लोक मरुदे किवा जगुदे तुम्हाला त्याचाशी काही देने घेण नसतं तुम्हाला फक्त सत्ता हवी आहे. जरा विचार करा जर एखादा घरातील करती व्यक्तीच गेली तर काय होईल त्या कुटुंबाच. एक वेळ चार दिवस उपाशी राहयला लागल तरी चालले पण जिवित हानी नकोच.

— मनोज चंद्रकांत गांवकर (@MANOJCGAONKAR) April 2, 2021
- Shrikant
@Shrikan80225153
20 लाख कोटींच्या घोषणा, पिएम केअर फंड केंद्रातल्या महाज्ञानी शेठणे कुठे गायब केला याचा शोध घ्या…केंद्राने काहीतरी कृती करावी हीच अपेक्षा आहे….
20 लाख कोटींच्या घोषणा, पिएम केअर फंड केंद्रातल्या महाज्ञानी शेठणे कुठे गायब केला याचा शोध घ्या…केंद्राने काहीतरी कृती करावी हीच अपेक्षा आहे…. pic.twitter.com/Z8M8erSeWm
— Shrikant (@Shrikan80225153) April 3, 2021
- @marathiiq
साहेब ते देश आहेत महाराष्ट्र हे एका देशाच घटक राज्य आहे. मला आवटतं शाळेत जाऊन तुम्ही पुन्हा राज्यशास्त्र ह्या विषयाचा अभ्यास करावा. किमबहुना जर अभ्यास झालाच असेल तुमचा तर हे केंद्राला समजुन सांगावे. आम्ही तुम्हाला भावी केंद्रीय अर्थमंत्री म्हणुन पाहतोय.
- महाकाळ हेमंत
@hemant_thunder
हा सल्ला, तुम्ही उद्भवजींना देताय का मोदींजींना? कारण युके,जर्मनी हे देश आहेत आणि महाराष्ट्र हे राज्य आहे. आपल्याला देशपातळीवर वर घेतलेला निर्णय आणि राज्यपातळी वर घेतलेला निर्णय ह्यातला फरक ही कळत नाही, विरोधीपक्ष नेते?

— महाकाळ हेमंत (@hemant_thunder) April 2, 2021
- Hindu
@hinduRashtra99
साहेब ती निधी राज्याची नावे तर देशाला दिली आहे भारत हा देश आहे भारत देश सेंट्रल गव्हर्नमेंट च्या हाती येतो लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यावर पैसे पुरवण्याची वेळ प्रधानमंत्री ची आहे हे ना की राज्यांच्या मुख्यमंत्री ची कृपया करून प्रधानमंत्री ला ट्रॅग करा
@PMOIndia
#BOYCOTTBJP #EVM_theft
साहेब ती निधी राज्याची नावे तर देशाला दिली आहे भारत हा देश आहे भारत देश सेंट्रल गव्हर्नमेंट च्या हाती येतो लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यावर पैसे पुरवण्याची वेळ प्रधानमंत्री ची आहे हे ना की राज्यांच्या मुख्यमंत्री ची कृपया करून प्रधानमंत्री ला ट्रॅग करा @PMOIndia #BOYCOTTBJP #EVM_theft
— Hindu (@hinduRashtra99) April 2, 2021
- Datta jumde
@dj10188
तुम्ही मोठे तज्ञ समजतात स्वताला तर मुख्यमंत्री यांनी विचारल्या प्रमाणे कोरोना साठी काय नियोजन होऊ शकते अस सांगू शकतात…नसेल जमत तर निदान शांत बसा उगाच तुमच्या राजकारणात सामान्य जनतेचा बळी देणे बंद करा..

— Datta jumde (@dj10188) April 3, 2021
- @mukta_anu
महाराष्ट्र सरकार फक्त स्वतःच्या मंत्र्यांच्या खिशात पैसे टाकते. लोक उपासमारीची बळी ठरतील लाॅकडाऊन मुळे. आणि 1 महिन्यापासून शनिवार रविवार बाज़ार पेठ बंद ठेवून कोरोना कमी झालेला नाहीत.
महाराष्ट्र सरकार फक्त स्वतःच्या मंत्र्यांच्या खिशात पैसे टाकते. लोक उपासमारीची बळी ठरतील लाॅकडाऊन मुळे. आणि 1 महिन्यापासून शनिवार रविवार बाज़ार पेठ बंद ठेवून कोरोना कमी झालेला नाहीत.
— मुक्ता…….. (@mukta_anu) April 3, 2021
- Panks Constant Bow and arrow
@KGF_2020
तेव्हा तुमच्या धन्याला सांगून १५ लाख रुपये रक्कम द्यायला सांगा ना!
२०१४ मध्ये कबूल केलेले, आता महामारी मध्ये फायदा होईल!
तेव्हा तुमच्या धन्याला सांगून १५ लाख रुपये रक्कम द्यायला सांगा ना!
२०१४ मध्ये कबूल केलेले, आता महामारी मध्ये फायदा होईल!— Panks Constant 🏹 (@KGF_2020) April 2, 2021
- Manohar Pawar
@manoharp451
तुम्ही नेमका सल्ला कोणाला देताय केंद्र सरकारला का? राज्य सरकारला?
तुम्ही नेमका सल्ला कोणाला देताय केंद्र सरकारला का? राज्य सरकारला?
देवेंद्रजी…..! असे प्रत्येक वेळेला मुर्खासारखे वागणे बंद करा.— Manohar Pawar (@manoharp451) April 3, 2021
ट्विटरकरांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटलेली फडणवीसांची ‘ती’ ट्विट्स
१. फ्रान्सने तिसर्यांदा लॉकडाऊन लावला…
पण, 120 अब्ज डॉलर्सचे विविध उपाय हाती घेतले…
२. हंगेरीत ‘वर्क फ्रॉम होम’…
पण, युरोपियन युनियनमध्ये भांडून हक्काचा निधी पदरी पाडून घेतला…
३. डेन्मार्कमध्येही तीच परिस्थिती…
पण, एप्रिल 2020 मध्येच सर्वच घटकांना पॅकेज…
४. ग्रीसमध्ये हळूहळू निर्बंध उठण्यास मदत…
पण, 2,20,000 उद्योग आणि 6 लाखांवर कर्मचार्यांना मदत
एवढेच नाही तर वेतन न मिळणार्यांना 800 युरोंपर्यंत मदत !
५. बेल्जियमने परत लॉकडाऊन केलाय…
पण, 20 बिलियन युरोचे पॅकेज जाहीर केलंय…
६. पोर्तुगाल सरकारने नागरिकांची ये-जा थांबविली आहे…
पण, 13 बिलियन युरोचे पॅकेज मार्च 2020 मध्येच जाहीर केले…
७. आयर्लंडमध्ये डिसेंबरपासून कडक निर्बंध आहेत…
पण, 7.4 बिलियन युरोंचे पॅकेज ऑक्टोबरमध्येच दिलंय…
८. फिलिपाईन्समध्ये कडक निर्बंध आहेत…
पण, 3.4 बिलियन डॉलर्सचे पॅकेज सप्टेंबरमध्येच दिलंय…
९. युके,जर्मनी कुठेही जा,सर्वांनीच काही ना काही दिलंय…
तुलना केवळ परिस्थितीशी नको,सरकारच्या कृतीशीही व्हावी,एवढीच महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा!
विरोधक वा तज्ञांचा दु:स्वास करून नाही,तर आपण प्रत्यक्ष काय करतो,याचे प्रबोधनात्मक विवेचन कोरोना थांबविण्यात अधिक मदत करेल.
१०. होय, आम्ही तर गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरच आहोत…
आणि आमची पुन्हा तयारी आहे, रस्त्यावर उतरून पुन्हा लोकांना समजून सांगण्याची, त्यांच्या मदतीला धावून जाण्याची…
मुख्यमंत्री नेमकं काय बोललेले?
मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या, राज्यात लॉकडाऊन लावला तर आम्ही रस्त्यावर उतरु, या इशाऱ्याला उत्तर दिलं होतं, “मी म्हणतो आता रस्त्यावर उतराच. आता सगळ्यांनीच रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. पण रस्त्यावर उतरायचं ते आंदोलन, मोर्चांसाठी नाही. तर लोकांच्या सेवेसाठी. टेस्टिंग, ट्रेसिंग आणि ट्रिटमेंटसाठी जे जिवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत, तसेच ज्या घरात सर्वच कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत, त्यांच्या मदतीसाठी, जे आरोग्य कर्मचारी लसीकरणासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहे. अशा आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आणि जनतेच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरा असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी विरोधकांना केलं.