Sunday, May 11, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

उद्धव ठाकरेंच्या टिकेला फडणवीसांचं प्रत्युत्तर: “हिंदुत्व फक्त बोलण्यासाठी नाही, करूनही दाखवायचं!”

January 24, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
uddhav thackeray

मुक्तपीठ टीम

रविवारी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९६ व्या जयंती साजरी करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख म्हणून केलेल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधत २५ वर्ष आम्ही भाजपसोबत युतीत सडलो या टिकेचा पुनरुच्चार केला. तसेच राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपवर घणाघाती हल्ला केला होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांच्या रविवारच्या पत्रकार परिषदेतील सर्व मुद्द्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

 

शिवसेनेचं हिंदुत्व केवळ बोलण्यापुरतं..

  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शिवसैनिकांशी संबोधित करताना राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपवर घणाघाती हल्ला केला होता.
  • यावर देवेंद्र फडणवीसांनी खोचक टीका केली.
  • राम मंदिराच्या आंदोलनात भाजप आणि संघाचे कारसेवक होते. राम मंदिरांच्या आंदोलनात तुम्ही कुठे होता? लाठ्याकाठ्या आम्ही खाल्ल्या. तुम्ही तोंडाची वाफ दडवत होता. कुठे होते तुम्ही?
  • राम मंदिर-बाबरी सोडून द्या.
  • मोदींनी करून दाखवलं.
  • त्यांच्या नेतृत्वात अयोध्येत राम मंदिर तयार होत आहे.
  • तुम्ही साधा दुर्गाडी किल्ल्याचा आणि मलंगगडाचा प्रश्न सोडवला नाही.
  • तुमचा हिंदुत्वाशी संबंध काय?शिवसेनेचं हिंदुत्व केवळ बोलण्यापुरतं आहे.
  • आनंद दिघेंनी संघर्ष केला.
  • तुमचा मुख्यमंत्री असताना तुम्ही मलंगगडाचा प्रश्न सोडवला नाही.
  • आताही सोडवत नाही.
  • तुमचं हिंदुत्व कागदावर आहे.
  • औरंगाबादचं संभाजी नगरही केलं नाही.
  • आम्ही प्रयागराज करून दाखवलं.
  • हिंदुत्व हे बोलून दाखवायचं नसतं करून दाखवायचं असंत.
  • काशी विश्वनाथाचं काम मोदींनी केलं, असंही त्यांनी सांगितलं.

 

एक ट्विट करून दाखवा

  • आम्ही बाळासाहेबांबद्दल नेहमी बोलतो त्यांना अभिवादन करतो. आमच्यासाठी ते वंदनीय आहेत.
  • मात्र, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी त्यांना अभिवादन करणारं साधं ट्विटही केलं नाही.
  • आधी त्यांच्याकडून ट्विट करून दाखवा. ते ट्विटही करत नाहीत.
  • तरीही तुम्ही त्यांच्या मांडिला मांडी लावून बसत आहात.
  • किती लाचार आहात तुम्ही.
  • ज्यांना बाळासाहेबांना अभिवानद करायला लाज वाटते, त्यांच्यासोबत तुम्ही आहात अन् वर आम्हाला ज्ञान पाजळता?

 

कुणाकडे सडले ते पाहावे…

  • भाजपसोबत युतीत सडलो असं ते सांगत आहेत.
  • पण भाजपसोबत असताना ते पहिल्या क्रमांकावर गेले.
  • भाजपला सोडल्यावर चौथ्या क्रमांकावर गेले याचाही विचार त्यांनी केला पाहिजे.
  • कुणाकडे सडले ते पाहावे.
  • नगरपंचायत निवडणुकीत चौथ्या क्रमांकावर गेले, त्याचं शल्य ते बोलून दाखवत आहेत.
  • तेच तेच मुद्दे त्यांच्या भाषणात असतात.
  • कदाचित शिवसैनिकांनाही तेच तेच भाषण पाठ झालं असेल.

 

भाजपा स्वत:च्या भरवश्यावर आपलं सरकार बनवेल

  • मुख्यमंत्र्यांनी आता महाराष्ट्रातील गव्हर्नन्सवर फोकस केला पाहिजे.
  • महाराष्ट्राची अवस्था या पूर्वी कधीही पाहिली नव्हती इतकी वाईट आहे.
  • इतकं बेशिस्त आणि भ्रष्ट सरकार महाराष्ट्राने कधीही अनुभवलं नव्हतं.
  • तुम्हाला चौथ्या क्रमांकावर गेल्याची निराशा असू शकते पण त्याचा राग असा काढू नका
  • भाजप स्वत:च्या भरवश्यावर आपलं सरकार बनवेल.
  • वेगळं लढूनही भाजपच नंबर एकचा पक्ष आहे.
  • हे आम्ही दाखवून दिलं आ़हे.

 

बाळासाहेबांच्या निर्णयावर तुम्ही बोट दाखवत आहात का?

  • सोयीचा इतिहास आणि सिलेक्टिव्ह विसर त्यांच्या भाषणात पाहायला मिळाला.
  • २५ वर्ष युतीत सडलो असो ते म्हणत आहेत.
  • २०१२ पर्यंत बाळासाहेब ठाकरे युतीचे नेते होते.
  • या युतीचा निर्णय त्यांनी केला होता.
  • त्यांच्या हयातीत त्यांनी ही युती कायम ठेवली.
  • याचा अर्थ बाळासाहेबांच्या निर्णयावर तुम्ही बोट दाखवत आहात का?
  • भाजपसोबत शिवसेना सडत असताना बाळासाहेबांनी शिवसेनेला सडत ठेवलं असं तुमचं म्हणणं आहे का? असा सवाल आमच्या मनात येतो.
  • मुख्यमंत्र्यांना सिलेक्टिव्ह विसरण्याची सवय आहे.
  • तुमचा पक्ष जन्माला येण्यापूर्वी मुंबईत आमचे नगरसेवक आणि आमदार होते.
  • १९८४मध्ये तुम्ही भाजपच्या चिन्हावर लोकसभेची निवडणूक लढवली. शिवसेनेच्या नाही.
  • मनोहर जोशी हे भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढले होते.

 

हिंदुत्व जगावं लागतं, भाषणापुरतं मर्यादित नव्हतं…

  • तुम्ही साधं औरंगाबादचं संभाजीनगर केलं नाही. उस्मानाबादचं धाराशिव करू शकले नाहीत. तुमच्याच घोषणा होत्या ना?
  • तिकडे भाजपने प्रयागराज करून दाखवलं. त्यांनी करून दाखवलं तुम्ही बोलत राहिलात.
  • हिंदुत्व जगावं लागतं, भाषणापुरतं मर्यादित नव्हतं.
  • मोदींनी ते करुन दाखवलं.

Tags: Bala Saheb ThackerayBJPcm uddhav thackeraydevendra fadanvisRam MandirShivsenaदेवेंद्र फडणवीसबाळासाहेब ठाकरेभाजपामुख्यमंत्री उद्धव ठाकरेशिवसेना
Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोना लागण

Next Post

राज्यात २८ हजार २८६ नवे रुग्ण, २१ हजार ९४१ रुग्ण बरे होऊन घरी! कोणत्या जिल्ह्यात, महानगरात किती…

Next Post
maharashtra corona report

राज्यात २८ हजार २८६ नवे रुग्ण, २१ हजार ९४१ रुग्ण बरे होऊन घरी! कोणत्या जिल्ह्यात, महानगरात किती...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!