मुक्तपीठ टीम
एसटीच्या सरकारी विलिनीकरणासह इतर मागण्यांसाठी कर्मचारी कामबंद आंदोलन करत आहेत. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन सुरु आहे. विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरही या आंदोलनात सहभागी झाले होते. ऊन-वारा- पाऊसात आपल्या मागण्यासाठी कर्मचारी आंदोलन करत आहे. बुधवारी संध्याकाळी पडलेल्या अवकाळी पावसातही भाजप नेते कर्मचाऱ्यांसह भीजत आंदोलन करत होते. यावरुन विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली असून पडळकरांना यांना विशेष पोलीस संरक्षण देण्याची मागणीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
फडणवीसांची टीका
- राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे.
- मात्र, अन्य विषय पुढे आणत एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याचं काम केलं जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
- फडणवीस यांनी ट्विट करत, ‘विविध विषयांच्या धुराळ्यात एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहे तसेच कायम आहेत! ऊन, वारा आणि आज तर पावसाला तोंड देत १० दिवसांपासून एसटी कर्मचारी आस लावून आहेत! दिशाभूल, संभ्रम, खोटे आरोप,फसवाफसवी, माध्यम व्यवस्थापन इत्यादी काही काळ बाजूला ठेऊन त्यांच्या समस्यांकडे लक्ष द्याल का?’ असा सवाल फडणवीसांनी केला आहे.
विविध विषयांच्या धुराळ्यात #एसटी कर्मचार्यांचे प्रश्न आहे तसेच कायम आहेत!
ऊन, वारा आणि आज तर पावसाला तोंड देत 10 दिवसांपासून एसटी कर्मचारी आस लावून आहेत!
दिशाभूल, संभ्रम, खोटे आरोप,फसवाफसवी, माध्यम व्यवस्थापन इत्यादी काही काळ बाजूला ठेऊन त्यांच्या समस्यांकडे लक्ष द्याल का❓ #ST pic.twitter.com/TpvTFz0urM— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 17, 2021
गोपीचंद पडळकर यांच्या जीवाला धोका
- देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर यांच्या सुरक्षेबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.
- बहुजनांच्या बाजूनं उभ राहिल्यान यातून दुखावलेले लोक त्यांच्यावर सातत्यानं हल्ला करत आहेत.
- लोकशाहीत विरोधकांचा आवाज हिंसेनं दाबणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही.
- विरोधक असो वा सत्ताधारी ज्याचा जिवास धोका त्याला संरक्षण दिल पाहिजे आणि म्हणूनच विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांना तात्काळ विशेष सुरक्षा द्यावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.
- गोपीचंद पडळकर यांच्या जिवास काही बर वाईट झाल्यास ही राज्य सरकारची जबाबदारी असेल. गोपीचंद पडळकरांना तात्काळ सुरक्षा द्यावी.
- तसेच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी करण्यात आलीय.
सोलापूर आणि सांगलीत पडळकरांवर प्राणघात हल्ला
- सोलापूरमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर हल्ला केला होता.
- तर सांगलीतही पडळकरांच्या गाडीवर तुफान दगडफेक करत प्राणघातक हल्ला झाला होता.
- या घटनांच्या पार्श्वभूमीवर गोपीचंद पडळकर यांना संरक्षण देण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.