Thursday, June 5, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

देवेंद्र फडणवीसांकडील ६.३ जीबी महापुराव्यात दडलंय काय?

पोलीस बदल्यांचे रॅकेट, राजकारणी-अधिकारी सामील असल्याचा आरोप

March 23, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
devendra fadnavis 6.3gb data

मुक्तपीठ टीम

 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद आज महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजवणारी ठरली. त्यांनी पत्रकार परिषदेत शरद पवारांनी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या समर्थनार्थ केलेली चुकीची असल्याचा दावा केला. त्यापेक्षाही मोठी बाब म्हणजे राज्यात पोलीस बदल्यांचे रॅकेट चालवले जात असल्याचा आरोप केला. त्यात राजकारणी, पोलीस अधिकारी सामील असल्याचा आरोप त्यांनी केला. ६.३ जीबी डेटा आपल्याकडे असल्याचा दावाही त्यांनी केला. केंद्रीय गृहसचिवांना ते देणार असलेल्या या ६.३ जीबी डेटामध्ये काय दडलंय अशी चर्चा राजकीय, प्रशासकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

 

परबीर सिंग यांच्या पत्रावरून राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांचे वादळ घोंघावते आहे. भाजपा आणि परमबीर यांच्याकडून झालेले आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि सर्वेसर्वा शरद पवार यांनी फेटाळून लावले होते. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेत वेगवेगळी कागदपत्रे दाखवत शरद पवारांना योग्य ती माहिती दिली गेली नसल्याचा दावा केला आहे. तसेच त्याच्याही पुढे जात त्यांनी महाराष्ट्राच्या पोलीस दलात बदल्यांसाठी मोठे रॅकेट सक्रिय असल्याचा गंभीर आरोप केला. तत्कालीन अतिरिक्त महासंचालक रश्मी शुक्ला यांनी पुराव्यांसह एक गोपनीय अहवाल सादर केला होता, असा महागौप्यस्फोटही त्यांनी केला. याप्रकरणी आपण ६.३ जीबीचा डेटा असलेला पुरावा केंद्रीय गृह सचिवांची भेट घेऊन सादर करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. फडणवीस या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करणार आहेत.

 

फडणवीसांचे पवारांना टोमणे

फडणवीस आज काय मोठा गौप्यस्फोट करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आपण नेहमी मराठीत आणि हिंदीत बोलतो. पण पवारांनी हा विषय राष्ट्रीय केला आहे. त्यामुळे मी हिंदीत सुरुवातीला बोलेल त्यानंतर मराठीत बोलेले. पवारांइतके माझं इंग्रजी चांगलं नाही. त्यामुळे मी हिंदीत बोलतो, अशी सुरुवात करत फडणवीस यांनी आपली पत्रकार परिषद सुरू केली.

 

फडणवीसांचे पवारांच्या क्लिनचीटला आव्हान

  • १५ तारखेचा गृहमंत्र्यांची ही कार्यक्रम पत्रिका आहे. १५ तारखेला ते एका खासगी विमानाने आले होते. १५ तारखेला ते आपल्या घरी होते.
  • पोलीस विभागाच्या दैनंदिन कामाचा माझ्याकडे एक कागद आहे. त्यात १७ फेब्रुवारीची एक तारीख आहे. त्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईतला राहतील. तर अनिल देशमुख हे दुपारी ३ वाजता सह्याद्रीला येतील. त्यानंतर २४ तारखेला पुन्हा अनिल देशमुख हे ११ वाजता मोटारीने निवासस्थानी जाणार असल्याचं पोलिसांची नोंद आहे.
  • अर्थात त्या कार्यक्रमानुसार ते गेले असतीलच असा माझा दावा नाही.
  • सिंग यांनी जे पत्र लिहिलं आहे, त्यात मेसेजचा पुरावा दिला आहे. त्यात त्यांनी पाटील यांना बैठकीबद्दल विचारलेलं होतं. मला वाटतं शरद पवार यांना योग्य माहिती दिली गेली नाही. त्यांच्या तोंडून चुकीची माहिती बोलवून घेतली गेली. हे आता उघड झालं आहे.

 

पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटचा पर्दाफाश

  • देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांसमोर पोलीस दलात बदल्यांसाठी सुरु असलेल्या रॅकेटचा तपशील मांडला.
  • फडणवीस यांनी बदल्यांचे रॅकेट असल्याचा आरोप करत ऑडिओ सीडी आणि माजी एसआयडी प्रमुख रश्मी शुक्ला यांचा अहवाल पत्रकार परिषदेत जाहीर केला.
  • त्यात राजकारणी, पोलीस अधिकारी सामील असल्याचा आरोप त्यांनी केला.
  • ६.३ जीबी डेटा आपल्याकडे असल्याचा दावाही त्यांनी केला.
  • बदल्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्यामुळे आपण केंद्रीय गृहसचिवांना भेटून मागणी करणार आहे की या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे असं फडणवीस म्हणाले.
  • बदल्यांचं रॅकेट बाहेर आणणाऱ्या रश्मी शुक्लांना साईडपोस्टिंगला टाकलं.
  • सुबोध जयस्वाल यांनीही कारवाईची मागणी केली तीही झाली नाही. त्यामुळे ते प्रतिनियुक्तीवर गेले.
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कारवाई का केली नाही? असा सवालही देवेंद्र फडणवीसांनी विचारला. सत्ता वाचवण्यासाठी त्यांनी तसे केले का, असेही ते म्हणाले.

Tags: devendra fadanvisdevendra fadnavis 6.3gb dataदेवेंद्र फडणवीसदेवेंद्र फडणवीस ६.३ जीबी डेटा
Previous Post

गुन्हे महत्वाचे : 1) मुंबईत विविध ठिकाणी बनावट शाईचा पुरवठा करणाऱ्यांची आर्थिक गुन्हे नियंत्रण शाखेच्या पथकाने पोलखोल केली आहे. पोलिसांनी अँटॉप हिल येथील एका खोलीमध्ये छापा टाकून सुमारे २३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. ॲपसॉन, कॅनन यांसारख्या नामांकित कंपन्यांची लेबल्स लावून ही बनावट शाई झेरॉक्स, स्टेशनरी तसेच इतर दुकाने आणि कार्यालयांना पुरवली जात होती. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली. 2)पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकील पतीला ठाणे न्यायालयाने १० वर्षांचा कारावास आणि पाच लाखांचा दंड ठोठावला. दंडाच्या रकमेपैकी चार लाख रुपये भरपाई म्हणून पीडित महिलेस देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. हा प्रकार ११ वर्षांपूर्वी भिवंडीमध्ये घडला. 3)नोकरी लावण्याच्या बहाण्याने नालासोपारा पश्चिमेकडील हनुमान नगर भागात दोन तरुणांनी एका महिलेवर सामूहिक बलात्कार केला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील दोन्ही तरुणांना अटक करण्यात आली. 4)मोबाईलची स्क्रिन तुटल्यानंतर विमा कंपनीकडून पैसे मिळावे यासाठी महिलेने प्रचंड शक्कल लढवली. मात्र, विमा कंपनीच्या निकषात ते बसत नसल्याने विमा कंपनीकडून मोबाईलची भरपाई मिळाली नाही. त्यामुळे नाराज झालेल्या महिलेने विमा कंपनीकडून नवा मोबाईल मिळावा यासाठी विचित्र कट आखला. काही लोकांनी तिच्या हातून मोबाईल हिसकावून नेला, अशी तक्रार तिने पोलिसात दिली. मात्र, पोलिसांनी तिचा कट उधळून लावला. हा सर्व प्रकार नेमका कसा झाला, त्याचा संपूर्ण घटनाक्रम आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 5)विरारमध्ये गेल्या काही दिसांपासून सोनसाखळी चोरांनी हैदोस घातला आहे. त्या अनुषंगाने विरार पोलिसांनी तपास केला असता या सोनसाखळी चोरांना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. या आरोपींनी एकट्या विरार हद्दीत १४ गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून तब्बल ५ लाख ७४ हजार ९५०,रुपये किंमतीचा मुद्देमाल विरार पोलिसांनी आरोपीकडून हस्तगत केला आहे.

Next Post

#मुक्तपीठ मंगळवारचे व्हायरल बातमीपत्र

Next Post
muktpeeth Top 10

#मुक्तपीठ मंगळवारचे व्हायरल बातमीपत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!