मुक्तपीठ टीम
महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीआधी जाहीर केल्याप्रमाणे दिवाळी संपताच आरोप स्फोट घडवला आहे. त्यांनी कागदपत्रांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिकांवर खळबळजनक आरोप केला आहे. अंडरवर्ल्डमध्ये सक्रिय असणारे आणि मुंबईतील १२ मार्च १९९३च्या बॉम्बस्फोटातील दोन आरोपींकडून नवाब मलिकांच्या परिवाराच्या सॉलिडस कंपनीने जमीन घेतल्याचा आरोप केला आहे. ही खरेदीही अगदी २० रुपये वर्गफुट भावात अगदी स्वस्तात झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. हा खरेदी व्यवहार सुरु झाला तेव्हा २००३मध्ये नवाब मलिक राज्यात मंत्री होते, असेही ते म्हणाले. आरोपाच्या समर्थनार्थ असलेली कागदपत्रे संबंधित यंत्रणा, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना देणार असल्याते सांगितले.
देवेंद्र फडणवीसांचे धक्कादायक आरोप
- राज्याचे मंत्री नवाब मलिक यांच्या परिवाराच्या सॉलिडस कंपनीने मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी आणि दाऊद इब्राहिमची बहिण हसिना आपासाठी ड्रायव्हर, बॉडीगार्ड आणि मालमत्ता हडपण्याचे काम करणारा सलीम पटेल यांच्याकडून बाजारभावापेक्षा अगदी स्वस्तात जमीन खरेदी केली आहे.
- कुर्ल्याच्या लाल बहादुर शास्त्री मार्गावर त्यावेळी दोन हजार वर्ग फुटाचा भाव असताना मलिक कुटुंबाच्या कंपनीने वीस रुपये वर्गफुटाने ही जमीन खरेदी केली आहे.
- याच भागात पाइपलाइन मार्गावर मलिक कुटुंबाने २००५मध्ये घेतली होती ती ४१५ रुपये वर्गफुटाने घेतली होती. तसेच त्याच भागातील मॉलमध्ये २०५० रुपये वर्गफुटाचा भाव होता, असे फडणवीस यांनी सांगितले.
- सध्या फक्त एकाच जमीन व्यवहाराची माहिती देत आहे. लवकरच आणखी काही व्यवहार उघड करणार आहे.
- हा जमीन खरेदी व्यवहार सुरु झाला तेव्हा नवाब मलिक राज्यात मंत्रीपदी होते. पुढे व्यवहार पूर्ण होण्याआधी त्यांच्या न्या. सावंत आयोगाने आक्षेप ठेवल्याने त्यांचा राजीनामा झाला.
मलिकांनी खरेदी केलेली जमीन विकणारे अंडरवर्ल्डवाले कोण, त्यांची माहितीही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सरदार शहाबअली खान
- सरदार शहाबअली खान १९९३ बॉम्बस्फोटमधील आरोपी
- सध्या त्या प्रकरणात जन्मठेप भोगतो आहे.
- टायगर मेमनच्या नेतृत्त्वात फायर ट्रेनिंग, स्टॉक एक्स्चेंज, मुंबई मनपा मुख्यालयात बॉम्बहल्ल्याची रेकी, टायगर मेमनच्या घरी कटाच्या बैठकीत सहभाग, अलहुसैनी या टायगरच्या घरी गाडीत आरडीएक्स भरण्यात, बॉम्ब कुठे ठेवायची याची रेकी झाली होती, त्यात तो होता.
सलिम पटेल
- दुसरा विक्री करणारा सलिम अली खान हा दाऊदची बहीण हसीना पारकर यांचा ड्रायव्हर आणि बॉडीगार्ड.
- सलिम पटेल हा एका इफ्तार पार्टीत सोबत फोटोत दिसल्याने दिवंगत आर आर पाटील हे वादात सापडले होते, त्यांचा दोष नव्हता.
- त्यावेळी दाऊदचा साथीदार असा उल्लेख झाला तो हाच सलिम पटेल.
- २००७मध्ये हसीना पारकरसोबत सलिमला अटक झाली होती.
- हसीना पारकरच्या नावाने मालमत्ता जमा होत होत्या, तो करणारा सलिम पटेल होता.
- जमीन हडपण्याच्या बिझनेसमध्ये प्रमुख सलिम पटेल होता.