मुक्तपीठ टीम
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या गाडीचं गूढ भलतंच वाढत आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईचे पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे नाव घेऊन गंभीर आरोप केले. वाझे सर्वात आधी घटनास्थळी कसे पोहचले? ते क्रॉफर्ड मार्केटला कोणाला भेटले? अशा स्फोटक आरोपांचा फडणवीसांनी भडिमार केला आहे. त्याचवेळी स्फोटकं ठेवलेल्या गाडीचा मालकाचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर भागात सापडला आहे. त्यामुळे स्फोटकांच्या गाडीचं प्रकरण खूपच रहस्यमय आणि स्फोटक होत चालले आहे.
मुकेश अंबानींच्या बंगल्याजवळ जिलेटिनच्या स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी २५ फेब्रुवारीला सापडली होती. २४ फेब्रुवारीच्या मध्यरात्री १ वाजता अंबानी यांच्या घराजवळ ही कार ठेवण्यात आली होती. तर दुसऱ्या दिवशी गुरुवारी ही कार पोलिसांच्या निदर्शास आली होती. ही घटना उघडकीस येताच या घटनेचा तपास क्राईम ब्रांचच्या सीआययु युनिट कडे देण्यात आला होता.
अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकं प्रकरणी फडणवीसांचे गंभीर आरोप-
“मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एक गाडी सापडली. गाडी सापडल्यावर टेलीग्रामवर एक ग्रुप तयार झाला आणि त्यावर एक पत्र आले ‘जैश उल हिंद‘ नावाने. एक क्रिप्टो करंसी अकाऊंट दिले होते. पण तसे कुठले खातेच नव्हते,”
त्या ठिकाणी एक नाही तर दोन गाड्या.
गाडी ओळखल्याबरोबर श्री सचिन वझे पहिल्यांदा पोहोचले.
तीन दिवसांपूर्वी सचिन वझे यांना काढले.
ज्यांची गाडी चोरीला गेली, त्याच्याशी एका क्रमांकावर अनेक वेळा संवाद.
वझे ठाण्यातील, गाड्या ठाण्यातील आणि या दोघांचे आधीपासून संवाद: @Dev_Fadnavis— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) March 5, 2021
विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी धमकीचं पत्र वाचून दाखवत सांगितलं की, “यामधून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. तसेच घटनेच्या ठिकाणी एक नाही तर दोन गाड्या होत्या. या दोन्ही गाड्या एकाच मार्गाने आल्या असून ठाण्यातूनच आल्या आहेत. गाडी ओळखल्याबरोबर पोलीस अधिकारी सचिन वाझे पहिल्यांदा पोहोचले. कोणीही पोहोचण्याआधी ते पोहोचले नंतर क्राइमचे, स्थानिक पोलीस ठाण्याचे आणि इतर लोक आले. नंतर सचिन वाझे यांनी तपास अधिकारी म्हणून नेमण्यात आलं. तीन दिवसांपूर्वी एका एसीपीला तपास अधिकारी म्हणून नेमलं असून, सचिन वझेंना का काढलं? हे समजलं नाही”.
पुढे ते म्हणाले की,ज्यांची गाडी चोरीला गेली, त्याच्याशी एका क्रमांकावर अनेक वेळा संवाद चालू होता. वाझे आणि गाड्या ठाण्यातील असून या दोघांचे आधीपासून संवाद असल्याचंही फडणवीसांनी सांगितलं आहे. सचिन वाझे यांचा तो नंबर असल्याचं समोर आलं आहे. ज्या दिवशी गाडी ठाण्याला बंद पडली, त्यानंतर ओला घेऊन तो कॉफर्ड मार्केटला गेला. तिथे तो एका व्यक्तीला भेटला. ती व्यक्ती कोण हा माझा प्रश्न आहे. कोणाला तो भेटला, हे जर काढलं तर अनेक गोष्टी स्पष्ट होतील”.
शंकेला वाव देणारे बरेच पुरावे आहेत.
ही संपूर्ण चौकशी NIA ला द्यावी, अशी आमची मागणी आहे: देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) March 5, 2021
अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या गाडी मालकाचा मृतदेह सापडला
मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जी स्कॉर्पिओ सापडली होती, तिच्या मालकाचा मृतदेह मुंब्र्यातल्या खाडीत सापडला आहे. मनसुख हिरेन असं गाडीमालकाचं नाव आहे. गाडीचा शोध लागल्यानंतर मनसुख हिरेन हे मुंबई पोलीसांसमोर हजरही झाले होते. गाडी चोरीला गेल्याचं त्यावेळेस त्यांनी पत्रकारांना सांगितलं होतं. क्राईम ब्रँचनं त्यांची चौकशी केली होती. त्यानंतर आज मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाचा गुंता आणखी वाढला आहे. मनसुख हिरेन यांचा खून केला गेला की आत्महत्या की आणखी काही कारण आहे याचा तपास सुरु आहे.