Tuesday, June 3, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोयना परिसरातील तापोळा-बामणोलीचं पर्यटन महत्व वाढणार, एकात्मिक पर्यटनासाठी विकास आराखड्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंचे निर्देश

March 6, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
Koyna

मुक्तपीठ टीम

सातारा जिल्ह्यातील कोयना धरण क्षेत्रातील तापोळा, बामणोली, मुनावळे, वाघोळी परिसर मुबलक पाणी आणि वन क्षेत्राने समृद्ध असल्याने तेथे पर्यटन विकासासाठी मोठा वाव आहे. येथे पर्यावरणपूरक योजना आखून एकात्मिक पर्यटन साखळी निर्माण करण्यासाठी विकास आराखडा तयार करावा, असे निर्देश पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले.

 

महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा पर्यटनक्षेत्राचा विकास करण्याबाबत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज, पर्यटन संचालक मिलिंद बोरीकर, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदी उपस्थित होते.

 

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर येथे पर्यटक मोठ्या संख्येने येतात. या पर्यटकांना कोयना धरण परिसरात पर्यटन सुविधा उपलब्ध करून देण्यास मोठा वाव आहे. यादृष्टीने पहिल्या टप्प्यात नाशिक, गणपतीपुळेच्या धर्तीवर बोट क्लब विकसित करता येईल. पर्यटकांना सुविधा आणि स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देता येईल. यासाठी एमटीडीसीने व्यवहार्यता तपासून विकास आराखडा तयार करावा. पुढील टप्प्यात कॅराव्हॅन, तंबू, स्कुबा डायव्हिंग आदींचाही विचार करता येईल, असे त्यांनी सांगितले.

 

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, महाबळेश्वर आणि कास पठार येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी तापोळा, बामणोली, मुनावळेच्या रूपाने पर्यटनाची एकात्मिक साखळी तयार करता येईल. यामुळे पर्यटनाच्या नवीन संधी उपलब्ध होऊन महाबळेश्वर आणि कास पठारावर येणारा पर्यटक या परिसराचाही आनंद घेऊ शकेल. यासाठी महाबळेश्वर ते तापोळा रस्ता रूंदीकरण करण्यात येणार असून पाण्यात केबल स्टेड पूल आणि दर्शक गॅलरी देखील तयार करता येईल. काही ठिकाणी रोप वे उभारून निसर्गाचे नयनरम्य दर्शन घेता येईल.

 

पर्यटन राज्यमंत्री कु.आदिती तटकरे म्हणाल्या, निसर्गाने नटलेल्या या परिसराचा विकास करताना पर्यटकांसाठी पायाभूत सुविधांचा विकास करावा. बोट क्लबच्या माध्यमातून स्थानिकांना प्रशिक्षण आणि रोजगार उपलब्ध होईल, यावर भर द्यावा. स्थानिक बोटींबरोबरच आधुनिक सुविधांचा मेळ साधावा. जल पर्यटन बरोबरच साहसी पर्यटन, स्कुबा डायव्हिंग यामध्ये नाविन्यता आणावी.
एमटीडीसीच्या जल पर्यटन विभागाचे श्री.सारंग यांनी यावेळी सादरीकरणाद्वारे या परिसरात विकसित करता येणाऱ्या संभाव्य पर्यटन सुविधांबाबत माहिती दिली.


Tags: koynaMahabaleshwar TalukaSatara DistrictTapola Tourist AreaTapola-Bamnoli TourismTourism Development PlansTourism Minister Aditya Thackerayकोयनातापोळा पर्यटनक्षेत्रतापोळा-बामणोली पर्यटनपर्यटन मंत्री आदित्य ठाकरेपर्यटन विकास आराखडेमहाबळेश्वर तालुकासातारा जिल्हा
Previous Post

ट्विटरचं वर्क फ्रॉम होम बंद! जगभरातील सर्व कार्यालयं येत्या १५ मार्चपासून सुरु होणार!

Next Post

नवी मुंबईतील पारसिक हिल्सच्या पायथ्याशी पहिलं हॉटेल, इंडियन हॉटेल्सचे नवी मुंबईत आलिशान ‘विवांता’

Next Post
Vivanta Hotel

नवी मुंबईतील पारसिक हिल्सच्या पायथ्याशी पहिलं हॉटेल, इंडियन हॉटेल्सचे नवी मुंबईत आलिशान 'विवांता'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!