Thursday, May 29, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

झिरो-कार्बन भविष्य : भारतातील कमिन्स ग्रुपचा प्रयत्न! जाणून घ्या हायड्रोजन, नॅचरल गॅस इंजिनविषयी…

December 27, 2022
in featured, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Cummins Group in India

मुक्तपीठ टीम

एक अग्रगण्य पॉवर सोल्युशन्स तंत्रज्ञान पुरवठादार कमिन्स ग्रुप इन इंडियाने, ते पुढील महिन्यात भारताची राजधानी नवी दिल्ली येथे होणाऱ्या १६ व्या ऑटो एक्स्पो-मध्ये “डेस्टिनेशन झिरो” डीकार्बोनायझेशन धोरण आणि उत्पादन श्रेणी सादर करणार असल्याचे सांगितले.

डेस्टिनेशन झिरो™ हे आपल्या उत्पादनांचे हरितगृह वायू (GHG) आणि हवेच्या गुणवत्तेवर होणारे परिणाम कमी करण्यासाठी आणि २०५० पर्यंत निव्वळ-झीरो एमीशनपर्यंत पोहोचण्यासाठी अधिक आणि जलद गतीने जाण्याचे कमिन्सचे धोरण आहे. यासाठी कमिन्स समूह दुहेरी मार्गाचा अवलंब करत आहे – इंटर्नल कंबशन इंजिनमधून उत्सर्जन कमी करण्यासाठी आज कार्यरत आहे तर त्याच वेळी नवीन, झिरो एमीशन उत्पादनांमध्ये एकाच वेळी गुंतवणूकही करत आहे.

 झिरो-कार्बन भविष्यात संक्रमण करणे ही इतकी सहज घडून येणारी गोष्ट नाही. म्हणूनच, कमिन्सला हे माहीत आहे की वर्तमानात विविध तंत्रज्ञानाची प्रगती आणि एकत्रीकरण उद्याच्या हरित  भविष्यासाठी योगदान देईल.

 कमिन्स ग्रुप इन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक श्री अश्वथ राम म्हणाले, “हवामान बदल हे आजच्या काळातील अस्तित्वाचे संकट आहे आणि ते कमी करण्यासाठी आपण तातडीने कृती करणे आवश्यक आहे. भारताने २०७० पर्यंत निव्वळ झिरोवर पोहोचण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे. देशाला हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात मदत करण्यासाठी व्यावसायिक वाहतूक क्षेत्राची मोठी भूमिका आहे. भारतातील कमिन्स ग्रुप उद्योगक्षेत्रात हे डीकार्बोनायझेशन चालविण्यास सक्षम आहे. आम्हाला याची जाणीव आहे की शाश्वत भविष्यासाठी आज कार्य करणे ही आमची जबाबदारी आहे. पुढील महिन्यातील ऑटो एक्स्पोमध्ये सादर होणारे तंत्रज्ञान आमच्या नाविन्यपूर्ण आणि विश्वासार्हतेच्या ब्रँड वचनासह स्वच्छ आणि हरित जग निर्माण करण्याच्या इच्छेची पूर्ति करेल.”

 कमिन्स ग्रुप इन इंडियाच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर सुश्री अंजली पांडे म्हणाल्या, “भारतातील कमिन्स ग्रुपने आपल्या ग्राहकांच्या यशासाठी नेहमीच योग्य तंत्रज्ञान, योग्य वेळी आणण्यावर विश्वास ठेवला आहे. शेवटी जेव्हा आमचे ग्राहक जिंकतात तेव्हाच आम्ही जिंकतो. भारतात तयार झालेले तसेच भारतासाठी आणि जगासाठी तयार करण्यात आलेले बाजारपेठेसाठी योग्य, ग्रीन पॉवरट्रेन सोल्यूशन्स सादर करण्यासाठी आम्ही महत्त्वपूर्ण गुंतवणूक करत आहोत. आमच्या धोरणात व्यापक प्रमाणात अंगीकार आणि टीसीओ कमी करण्यास मदत करत पायाभूत सुविधांच्या तयारीसह तंत्रज्ञानाच्या तयारीशी जुळवून घेऊन ‘वेल-टू-व्हील्स‘ उत्सर्जन कमी करण्याच्या दृष्टिकोनाचा समावेश आहे.” ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये कमिन्स ग्रुप इन इंडियाच्या डेस्टिनेशन झिरो प्रोडक्ट रेंज सादरीकरणासह कंपनी डिकार्बोनायझेशन तंत्रज्ञानाची विस्तृत श्रेणी प्रदर्शित करेल. त्यामध्ये हे समाविष्ट आहे:

 उद्योगक्षेत्रातील-प्रथम इंधन-अॅग्नॉस्टिक प्लॅटफॉर्म

एक इंधन- अॅग्नॉस्टिक प्लॅटफॉर्म EXPO मध्ये सादर केला जाईल. OEM, फ्लीट मॅनेजर्स आणि ऑपरेटरना परिचित असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून उत्सर्जन कमी करण्याचा एक व्यावहारिक मार्ग त्यातून दर्शवला जाईल.

 जसे आपण डीकार्बोनायझेशनकडे वाटचाल करत आहोत, तसतसे कमी आणि झिरो-कार्बन इंधनाच्या सध्या उपलब्ध पर्यायांचा फायदा घेऊन आपल्याला अनेक तंत्रज्ञानावर काम करावे लागेल. यातून अंतिम वापरकर्त्यांना पर्याय पुरविले जातील आणि पायाभूत सुविधांची उपलब्धता, वाहतूक कामकाजाच्या गरजा आणि त्याबरहुकूम वाहतुकीचे अर्थशास्त्र अनुकूल करत त्यावर आधारित अंगीकार करता येऊ शकेल.

 इंधन- अॅग्नॉस्टिक आर्किटेक्चरमध्ये सिलेंडर हेड्स आणि इंधन प्रणाली विशेषत: डिझेल, नैसर्गिक वायू, पुन्हा वापर करण्यायोग्य नैसर्गिक वायू आणि हायड्रोजन यासारख्या इंधनासाठी तयार केलेल्या सर्वसाधारण बेस इंजिनचा वापर केला जातो. अनेक भागांमध्ये सामाईकता दर्शवत हा प्लॅटफॉर्म विविध प्रकारच्या इंधन प्रकारांमध्ये ओईएम साठी इंजिन आर्किटेक्चर सादर करतो.

 ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये, कमिन्सची इंधन- अॅग्नॉस्टिक प्लॅटफॉर्म संकल्पना याद्वारे प्रदर्शित केली जाईल:

 हायड्रोजन इंटर्नल कंबशन इंजिन

इंधन अॅग्नॉस्टिक प्लॅटफॉर्मचा एक भाग जो मध्यम- आणि हेवी-ड्युटी ट्रक उत्पादकांसाठी झिरो-कार्बन उत्सर्जन साध्य करण्यासाठी सर्वात व्यावहारिक उपाय बनू शकतो तो म्हणजे कमिन्सचे हायड्रोजन इंटर्नल कंबशन इंजिन. हरित हायड्रोजनसह जोडलेले असताना, हे इंजिन झिरो वेल-टू-व्हील CO2 उत्सर्जन करते. बहुविध ड्यूटी सायकल्समध्ये डीकार्बोनायझेशनला पाठबळ देण्यासाठी तंत्रज्ञानाच्या क्षमतेवर प्रकाश टाकत मध्यम आणि हेवी-ड्युटी ट्रक आणि बसेससाठीच्या उपाय सुविधा सादर होतील.

 नॅचरल गॅस इंजिन

नॅचरल गॅस इंजिन उत्सर्जन कमी करण्यास मदत करतात आणि काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक कामगिरीत तडजोड न करता वाहनाचा एकूण पर्यावरणीय प्रभाव कमी करतात. नॅचरल गॅस इंजिन

देखील आज उपलब्ध असलेले सर्वात परिपक्व, सिद्ध आणि कमीत कमी नुकसान करणारे पर्यायी उर्जा तंत्रज्ञान आहे. नैसर्गिक वायूची पायाभूत सुविधा उपलब्ध असून २०३० पर्यंत ऊर्जा मिश्रणात नैसर्गिक वायूचा वाटा ६% वरून १५%पर्यंत वाढवण्याच्या भारत सरकारच्या दृष्टीकोनाला गती देईल. सीएनजी आणि एलएनजी वर पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आधीपासूनच् लक्षणीय गुंतवणूक करण्याचे नियोजित असून हे तंत्रज्ञान सरकारचा दृष्टीकोन साध्य करण्यात मदत करेल.

 अत्याधुनिक-प्रगत डिझेल इंजिन

जवळजवळ ७००,००० युरो VI च्या कमी-उत्सर्जन इंजिन पुरवठ्यासह कमिन्सने त्यांचा अत्याधुनिक  प्रगत डिझेल प्लॅटफॉर्म प्रदर्शित करण्याची योजना आखली आहे. कमिन्सचे प्रगत डिझेल इंजिन ग्राहकांना उत्सर्जन कमी करण्यास आणि पॉवर आणि टॉर्कमध्ये लक्षणीय सुधारणा करण्यास अनुमती देतात.

 इलेक्ट्रोलायझर (हरित हायड्रोजन निर्मितीसाठी)

इलेक्ट्रोलायझर पाणी इनपुट घेते आणि आउटपुट म्हणून हायड्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये विभाजित करते. नवीकरणीय ऊर्जेचा पुरवठा केल्यावर तयार झालेल्या हायड्रोजनला हरित हायड्रोजन म्हणतात कारण या प्रक्रियेमध्ये कार्बन फूटप्रिंट म्हणजेच कर्बठसा नसतो. कमिन्सने जागतिक स्तरावर PEM आणि अल्कलाइन तंत्रज्ञानासह जगभरात ६०० हून अधिक इलेक्ट्रोलायझर्सचा पुरवठा आणि कमिशन केले आहे. अत्याधुनिक इलेक्ट्रोलायझर-स्टॅक तंत्रज्ञानाचा मॉड्यूलर प्रकार प्रदर्शनात असेल.

 हायड्रोजन इंधन सेल झिरो एमीशन तंत्रज्ञान

Cummins Inc. चे नवीनतम इंधन सेल इंजिन आमच्या झिरो एमीशन तंत्रज्ञानाच्या जलद प्रगतीचे प्रदर्शन करेल. ज्या ग्राहकांना आज झिरो हरितगृह वायू उत्सर्जनाची गरज आहे आणि ते गाठायचे आहे त्यांच्यासाठी इंधन म्हणून हरित हायड्रोजन पुरवल्यास हायड्रोजन इंधन सेल हा एक योग्य उपाय ठरू शकेल. बस, ट्रक, स्टेशनरी पॉवर आणि रेल्वे यासह विविध अॅप्लिकेशन्ससाठी जागतिक स्तरावर २,००० हून अधिक इंधन सेलच्या उपयोजनावर आधारित हे अत्याधुनिक उत्पादन सुधारित उर्जा घनता, कार्यक्षमता आणि टिकाऊपणा पुरविते आणि मध्यम आणि अवजड दोन्ही वाहनांसाठी एकल आणि दुहेरी मॉड्यूल इंजिनमध्ये उपलब्ध आहे.

 भविष्यातील तंत्रज्ञान म्हणून ओळखले जाणारे कमिन्स ग्रुप इन इंडिया झिरो एमीशन उर्जा उपायांची श्रेणी देखील प्रदर्शित करेल. ऊर्जा क्षेत्रातील जागतिक अग्रणी म्हणून शतकाहून अधिक अनुभवांसह, संस्था याद्वारे सर्वसमावेशक झिरो एमीशन तंत्रज्ञान प्रदान करण्याची आपली वचनबद्धता दृढ करत आहे:

 इलेक्ट्रिक पॉवरट्रेन तंत्रज्ञान

कमिन्स इंक. ने अलीकडेच ड्राईव्हट्रेन, मोबिलिटी, ब्रेकिंग आणि इलेक्ट्रिक पॉवरट्रेन तंत्रज्ञानाचा एक अग्रगण्य जागतिक पुरवठादार मेरिटरचे संपादन करण्याची घोषणा केली. “मेरिटर कमिन्सच्या” पॉवरट्रेन घटकांची उद्योग-अग्रणी श्रेणी मजबूत होईल आणि विद्युतीकृत पॉवर सोल्यूशन्सचा वेगवान विकास सक्षम होईल. कमिन्स इंक. आणि मेरिटर एकत्रितपणे डेस्टिनेशन झिरो धोरण पुढे नेणारे आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य डीकार्बोनाइज्ड पॉवरट्रेन सोल्यूशन्स विकसित करण्यासाठी आणखी आणि वेगाने पुढे जातील. ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये मेरिटर उत्पादने देखील प्रदर्शित केली जातील. ‘इलेक्ट्रिक पॉवरट्रेन‘ च्या कक्षेत दाखवल्या जाणार्‍या तंत्रज्ञानामध्ये हे समाविष्ट आहे:

 बॅटरी-इलेक्ट्रिक तंत्रज्ञान

Cummins Inc. ने सखोल ड्यूटी सायकल आणि अनुप्रयोग अनुभवावर आधारित अत्याधुनिक बॅटरी पॅक सुविधा विकसित केली आहे. ग्राहकांना आज झिरो उत्सर्जनापर्यंत पोहोचण्यास मदत करणाऱ्या अनेक बॅटरी सादर केल्या जातील. या बॅटर्‍यांमध्ये वेगवेगळी रसायने असून बाजारातील विविध अॅप्लिकेशन्सच्या गरजा पूर्ण करण्यासाठीचे घटक आहेत. या बॅटरीज विविध महत्वाचे बॅटरी मापदंड परीक्षण करण्यासाठी आणि बॅटरीचे आयुष्य आणि कामगिरी ओळखून सुधारणा करण्यासाठी प्रगत बॅटरी व्यवस्थापन प्रणाली (BMS) सह सुसज्ज आहेत.

 


Tags: Cummins Group in IndiaDestination Zero Decarbonizationgood newsHydrogenIndiamuktpeethNatural gasZero-Carbon Futureकमिन्स ग्रुप इन इंडियाघडलं-बिघडलंचांगली बातमीझिरो-कार्बन भविष्यडेस्टिनेशन झिरो डीकार्बोनायझेशननॅचरल गॅसभारतमुक्तपीठहायड्रोजन
Previous Post

देशभरात BF.7 चे ३,४२८ सक्रिय प्रकरणांची नोंद! निम्म्यापेक्षा जास्त कर्नाटक, केरळमध्ये!

Next Post

ग्लेनमार्कची भारतात टाईप २ मधुमेह आणि अधिक इन्सुलिन प्रतिरोध असलेल्या प्रौढांसाठी गोळी

Next Post
Type 2 Diabetes

ग्लेनमार्कची भारतात टाईप २ मधुमेह आणि अधिक इन्सुलिन प्रतिरोध असलेल्या प्रौढांसाठी गोळी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!