Monday, June 2, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

इराणच्या महिला संसद सदस्यांचा विधिमंडळात उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते सन्मान

September 16, 2022
in सरकारी बातम्या
0
मा.उपसभापती नीलम ताई गोऱ्हे यांची इराण शिष्टमंडळाने घेतली भेट 1

मुक्तपीठ टीम

भारत आणि इराण या दोन देशांमध्ये पूर्वापार मैत्रीसंबंध आहेत. दोन्ही देशांमध्ये कृषी, व्यापार, सुक्ष्म तंत्रज्ञान, औषधनिर्मिती, खनिकर्म या क्षेत्रामध्ये व्यापारवृध्दीसाठी अपार संधी आहेत. दोन्ही देशांच्या कायदेमंडळांनी यासंदर्भात पुढाकार घेऊन हे संबंध आणखी दृढ करावेत अशी अपेक्षा इराण संसदेच्या सदस्या डॉ. फातेमा घसेमपूर आणि डॉ. मोसूमेह बहराम यांनी व्यक्त केली. इराण संसदेच्या शिष्टमंडळाने आज  विधानमंडळाला सदिच्छा भेट दिली.             

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांचा पुष्पगुच्छ, भेटवस्तू आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा इंग्रजी भाषेतील चरित्रग्रंथ भेट देऊन सन्मान केला. या महिला सदस्यांसमवेत इराणचे भारतातील राजदूत डॉ. अली चेगेनी, मुंबईतील इराणचे उच्चायुक्त ए. एम. अलिखानी, इराणचे मुंबईतील व्यापार व वाणिज्य विभागाचे उच्चायुक्त सय्यद मोहम्मद मिराई आणि महाराष्ट्र विधानमंडळाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत हे देखील यावेळी उपस्थित होते.

यावेळी उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भारतीय लोकशाहीच्या वाटचालीत महाराष्ट्र विधानमंडळाच्या गौरवशाली योगदानाची माहिती दिली. महिला सबलीकरण आणि विकासासंदर्भात महाराष्ट्रामध्ये राबविण्यात येत असलेल्या योजना, स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिला प्रतिनिधींसाठी ठेवण्यात आलेले आरक्षण, महिलांचा राजकीय सहभाग, महाराष्ट्राचा सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा यांना उजाळा देत त्यांनी दोन्हीकडील लोकप्रतिनिधींचा समावेश असलेल्या अभ्यासगटांच्या भेटी आयोजित केल्या जाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली.

इराणमध्ये महिलांना आम्ही केवळ कुटुंबातील महत्वाचा नव्हे तर अर्थकारणातील महत्वाचा घटक मानत आहोत. व्यापारउदीमामध्ये इराणमध्ये महिलांनी मोठी आघाडी घेतली आहे. दोन्ही देशातील महिलांच्या यशोगाथा प्रत्यक्ष भेटीगाठीद्वारे तसेच समाजमाध्यमांद्वारे मांडल्या जाव्यात ज्यातून अनेकांना प्रेरणा मिळेल, दोन्हीकडील कायदेमंडळांनी यासंदर्भात पुढाकार घ्यावा असे मत इराणच्या महिला संसद सदस्या तसेच वाणिज्यदूतांनी यावेळी व्यक्त केले.


Tags: Dr.Neelam GorheIndiaIranइराण महिला संसद सदस्यविधिमंडळ उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे
Previous Post

शिंदे गटासोबत बाहेरील राज्यांचे शिवसेना पदाधिकारी! पण आयोगाने शिवसेनेच्या संविधानानुसार निर्णय दिला तर काय होणार?

Next Post

शिंदे गटासोबत बाहेरील सेना राज्यप्रमुख! पण आयोगाने शिवसेनेच्या संविधानानुसार निर्णय दिला तर काय?

Next Post
शिंदे गटासोबत बाहेरील सेना राज्यप्रमुख! पण आयोगाने शिवसेनेच्या संविधानानुसार निर्णय दिला तर काय?

शिंदे गटासोबत बाहेरील सेना राज्यप्रमुख! पण आयोगाने शिवसेनेच्या संविधानानुसार निर्णय दिला तर काय?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!