मुक्तपीठ टीम
दिल्ली उच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान एक धक्कादायक प्रकरण समोर आले. दिल्ली उच्च न्यायालयाच्या व्हर्च्युअल सुनावणीदरम्यान एक पक्षकार बनियानमध्ये होता. ते पाहून संतप्त झालेल्या उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी याचिकाकर्त्याला फटकारले आणि १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचे आदेश दिले.
न्यायालयीन सुनावणी, बनियान आणि दहा हजार!
- न्यायमूर्ती रजनीश भटनागर यांच्यासमोर खटल्याची सुनावणी व्हर्च्युअल पद्धतीने सुरु होती.
- त्यांनी आपल्या टिपणीत असे निरीक्षण नोंदवले की पक्षकार क्र. ५ चे न्यायालयासमोर हजर राहण्याचे वर्तन पूर्णपणे अस्वीकार्य आहे.
- पक्षकार बनियान घालून आला होता, त्याने सभ्य आणि योग्य कपड्यात न्यायालयात हजर व्हायला हवे होते.
- दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, पक्षकाराला दिल्ली उच्च न्यायालयाच्या विधी सेवा समितीकडे १०,००० रुपये जमा करावे लागतील.
- विशेष म्हणजे, व्हर्च्युअल सुनावणीदरम्यान किमान न्यायालयीन शिष्टाचार पाळले जावेत, असा आग्रह मागेही सर्वोच्च न्यायालयाने धरला होता.
- व्हर्च्युअल सुनावणीदरम्यान बनियान परिधान केलेली व्यक्ती देखील एका प्रकरणात आरोपी आहे.
- खरेतर दंड झालेला पक्षकार याचिकाकर्त्या महिलेने तिच्या पती आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांविरुद्ध दाखल केलेल्या खटल्यातील आरोपी आहे.
- दोन्ही पक्षांमध्ये समझोता होऊन एफआयआर रद्द करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती.
- न्यायालयानेही दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याचे मान्य केले होते.