मुक्तपीठ टीम
प्रजासत्ताक दिनी देशाची राजधानी दिल्लीत झालेल्या हिंसाचारामागे असलेले घातसूत्र कोणते ते शोधणे महत्वाचे असल्याची भूमिका ’मुक्तपीठ’ने मांडली होती. आता शेतकरी आंदोलनाच्या बदनामी करण्यामागे असलेले घातसूत्र उघड होऊ लागले आहे. शेतकरी नेत्यांनी आरोप केला आहे की, पंजाबी अभिनेता दीप सिद्धूने शेतकरी आंदोलकांना चिथवून लाल किल्ल्यावर नेले. शेतकरी आंदोलनात धार्मिक अजेंडा नव्हताच. पण काहींना तसे करायचे होते ते दीप सिद्धूने करून दाखवले. दीप सिद्धू हा भाजप खासदार सनी देओल यांच्या निवडणूक प्रचारात सक्रिय होता. त्याचे सनी देओलप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतची छायाचित्रही व्हायरल होत आहेत. मात्र, सनी देओलने आता दीप सिद्धूशी आपला संबंध नसल्याचा दावा केला आहे. दीप सिद्धूने लाल किल्ल्यावर त्यानेच झेंडा फडकवल्याचे मान्य केले आहे. त्याला एनआयएने नोटीसही बजावली होती. मात्र, पुढे काहीच कारवाई झाली नसल्याबद्दलही आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
दीप सिद्धूच प्रजासत्ताक दिनाचा खलनायक!
२६ जानेवारी रोजी दिल्लीत शेतकरी ट्रॅक्टर मोर्चात लाल किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. झालेल्या हिंसाचाराचा शेतकरी संघटनांनी पंजाबी अभिनेता दीप सिद्धू यांच्यावर आरोप केला आहे. दीप सिद्धूने आंदोलकांना हिंसाचारासाठी चिथावलं आणि त्यांची दिशाभूल केली शेतकरी नेत्यानी केला आहे. भारतीय शेतकरी संघटनेचे नेते गुरनामसिंग यांनी असा आरोप केला आहे की, शेतकरी संघटनांचा लाल किल्ल्याकडे जाण्याचा कोणताही कार्यक्रम नव्हता. दीप सिद्धू यांनी शेतकऱ्यांना भडकवले आणि आउटर रिंग रोडवरुन लाल किल्ल्यावर घेऊन गेला. शेतकरी शांततेत आंदोलन करत राहतील. ही चळवळ ही धार्मिक चळवळ नाही.
दीप सिदधूची लाल किल्ल्यावर झेंडा फडकवल्याची कबुली
दीप सिद्धूने लाल किल्ल्यावर झेंडे फडकवल्याचे मान्य केले आहे. परंतु त्याच्यावर झालेल्या आरोपांकडे त्यांनी दुर्लक्ष केले आहे. आधीच ठरलेल्या मार्गाचे पालन न करण्याविषयी आधीच सांगितले होते, परंतु भारतीय शेतकरी संघटनेने त्याकडे दुर्लक्ष केले.
शेतकरी नेत्यांनी टाळले होते दीप सिद्धूला
दीप सिद्ध यांच्या टोकाच्या वागण्या-बोलण्यामुळे शेतकरी आंदोलन नेत्यांनी दिल्ली सीमेवर बोलण्याची संधी दिली नाही. दीप सिद्धू सोशल मीडियाच्या माध्यमातून या शेतकरी नेत्यांच्या निर्णयावर सातत्यानं टीका करत होता. जेव्हा ते एका पोलिस अधिकाऱ्यासमवेत इंग्रजीमध्ये वाद घालत होते तेव्हा शेतकरी चळवळीच्या वेळी तो चर्चेत आला होता. चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी नंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता.
दीप सिद्धुला एनआयएचीही नोटीस
दीप सिद्धुवर खलिस्तान समर्थक असल्याचा आरोप झाला आहे. दीप सिद्धू सलग दोन महिने शेतकरी आंदोलनात सक्रिय होते. एनआयएने त्याला नोटीस दिल्याचीही चर्चा होती. काही दिवसांपूर्वी दीप सिद्धूला राष्ट्रीय तपास एजन्सीने शिख्स फॉर जस्टिस बरोबरच्या संबंधाबद्दलही नोटीस बजावली होती. गेल्या वर्षी झालेल्या आंदोलनाच्या वेळी दीप सिद्धूने किसान युनियनच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे केले. त्यावेळी त्यांने नवीन शेतकरी संघटना स्थापन केली होती. त्यांच्या मोर्चाला खलिस्तान समर्थक वाहिन्यांनीही पाठिंबा दर्शविला.
पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांसह फोटो व्हायरल
२०१९च्या लोकसभा निवडणुकीत दीप भाजप उमेदवार अभिनेता सनी देओल यांच्यासाठी प्रचार केला होता. दीप सिद्धूची भाजपशी जवळीक असलेल्याचा आरोप करणाऱ्या पोस्ट मोठ्या संख्येने येत आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि खासदार सनी देओल यांच्यासोबतची छायाचित्रं सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. कीर्ती किसान युनियनचे उपाध्यक्ष राजिंदरसिंग दीपसिंहवाला यांच्यासह अनेक शेतकरी नेत्यांनी आरोप केला आहे की, सुरुवातीपासूनच केंद्र सरकारला शेतकरी आंदोलनाला जातीय रंग द्यायचा होता. दीप सिद्धूने त्यांची चांगली सेवा केली आहे.