मुक्तपीठ टीम
सध्या तरूणाईमधील जंक फुडची आवड घटताना दिसत आहे. जंक फूड हे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंतचे आवडीचे खाद्य, परंतु सध्या त्यापासून लोक दूर जाताना दिसत आहेत. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण २०१९-२१ चा डेटा गेल्या महिन्यात प्रसिद्ध झाला आहे त्यात भारतीय त्यांच्या आहाराबाबत अधिक जागरूक होत असल्याचे दिसत आहे. एकीकडे भारतीयांचा नॉनव्हेज खाण्याकडे रस वाढला आहे, तर कोल्ड ड्रिंक्ससारखे पेय पिण्याची सवय कमी होत आहे. भारतीय घरांमध्ये मसूरच्या डाळीचे प्रमाण वाढले आहे तर, फळांचे सेवन कमी झाले आहे.
भारतात मांसाहाराच्या प्रमाणात वाढ
- संपूर्ण भारतात मांसाहारी अन्न जसं की मासे, चिकन किंवा मटण यांचा वापर झपाट्याने वाढला आहे.
- २०१५-१६ मधील ४९% च्या तुलनेत आता किमान ५७% पुरुष असे अन्न खातात.
- यामध्ये गरीब वर्गातील १६ टक्के लोक सर्वात जास्त नॉनव्हेज खाणारे आहेत, तर श्रीमंत वर्गाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्यात फक्त ६ टक्के लोक मांस, मासे, अंडी यासारख्या मांसाहारी पदार्थांचे सेवन करतात.
- या संदर्भात तज्ञांचे म्हणणे आहे की, मांसाहाराकडे लोकांच्या वाढत्या आकर्षणाचे कारण म्हणजे चिकन आणि अंडी यांच्या किंमतीत झालेली घसरण आहे.
जंक फूड आउट हेल्थी फूड इन
- भारतीय पूर्वीपेक्षा कमी तळलेल्या गोष्टी आणि थंड पेये आणि अधिक आरोग्यदायी गोष्टींचे सेवन करत आहेत.
- ताज्या सर्वेक्षणात, १५ ते ४९ वयोगटातील सुमारे २५% पुरुष आणि १६% स्त्रिया आठवड्यातून किमान एकदा थंड पेये घेतात, जे २०१५-१६ मध्ये अनुक्रमे ३२% आणि २४% होते.
- बहुतेक लोक क्वचितच तळलेले अन्न खाणे पसंत करतात, फक्त ७% स्त्रिया आणि ९% पुरुष दररोज अशा पदार्थांचे सेवन करतात.
- याउलट, स्त्रिया आणि पुरुष आता अंडी आणि पालेभाज्या यांसारखे आरोग्यदायी पदार्थ अधिक प्रमाणात खातात.
- अर्ध्याहून अधिक पुरुष आठवड्यातून अंडी खातात. अर्ध्याहून अधिक महिला आता हिरव्या पालेभाज्या खातात.
- तसेच, केवळ १२% लोकांनी सांगितले की ते दररोज फळे खातात.
महिलांमध्ये प्रथिने समस्येत वाढ
- सर्वेक्षणानुसार, १५ ते १९ वयोगटातील ८१% पुरुष आठवड्यातून किमान एकदा दूध किंवा दही खातात, तर केवळ ७०% स्त्रिया असे करतात.
- स्त्रिया मासे, चिकन किंवा मांस कमी खाण्यास प्राधान्य देत असल्याने, त्यांच्यात प्रथिनांचे प्रमाण कमी आहे, जे चिंतेचे कारण असू शकते.
- तसेच, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि तामिळनाडू या तीन दक्षिणेकडील राज्यांमध्ये महिला दूध आणि अंडी दोन्ही मुबलक प्रमाणात खातात.
- पश्चिम बंगाल ८३%, त्रिपुरा ७५%, आणि सिक्कीम ७२% या राज्यांमध्ये महिला अंड्याचे सेवन करतात असे दिसते.
- मध्य भारतीय राज्यांमध्ये दोन्ही प्रकारच्या उत्पादनांचा वापर कमी आहे.
शहरी लोक जंक फूडचे सर्वाधिक सेवन करतात
- उच्च उत्पन्न पातळी असलेल्या शहरांमधील लोक खेड्यांमधील लोकांपेक्षा अधिक वेळा निरोगी आणि अस्वास्थ्यकर दोन्ही अन्न खातात.
- ८६ टक्के शहरी पुरुष आठवड्याला कमीत-कमी दूधाचे सेवन करतात तर, ७७ टक्के ग्रामीण पुरुष असे करतात.
- ६६% शहरी पुरुष वारंवार फळे खातात, परंतु केवळ ५१% ग्रामीण पुरुष फळांचे सेवन करतात.
- कडधान्ये आणि हिरव्या पालेभाज्या ग्रामीण आणि शहरी भारतीयांसाठी समान आहेत. मात्र, तळलेले पदार्थ आणि थंड पेये शहरांमध्ये अधिक प्रमाणात सेवन करतात.