मुक्तपीठ टीम
कोरोनाच्या एकामागोमाग एक लाटा उसळू लागलेल्या असताना आलेली एक बातमी दिलासा देणारी आहे. एका शोध अहवालानुसार कोरोना प्रतिबंधक लसीमुळे चांगलाच फायदा होत आहे. लसीचे दोन डोस घेतलेल्यांमध्ये ९८ टक्के तर एक डोस घेतलेल्यांमध्ये ९२ टक्के मृत्यूचा धोका कमी असतो. पंजाब पोलिसांवर केलेल्या एका संशोधन अहवालाच्या अधारे ही माहिती समोर आली आहे.
कोरोनांच्या प्रकोपामुळे जगभरात निर्माण झालेल्या संसर्ग आणि मृत्यूच्या साखळीला तोडण्यासाठी लसीकरण हाच एक मार्ग सध्या तरी उपलब्ध आहे. तसेच कोरोनाच्या या संकट काळात सर्वत्र तणावाचे वातावरण असताना लसीकरणासंदर्भात एक दिलासादायक बातमी आहे.
नीति आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के पॉल यांनी ही माहिती दिली आहे.
लसीमुळे होतो चांगलाच फायदा
• ४,८६८ पोलिसांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली नव्हती. त्यातील १५ जणांचा कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू झाला.
• लसीकरणाचा पहिला डोस घेतलेले एकूण ३५,८५६ पोलिसांपैकी नऊ जणांचा मृत्यू झाला.
• ही आकडेवारी दर हजारी ०.२५ एवढी आहे.
• लसीचे दोन डोस घेतलेल्या ४२,७२० पोलिसांपैकी केवळ दोन जणांचा मृत्यू झाला.
• ही आकडेवारी दर हजारी ०.०५ एवढी आहे.
कोरोना लस, मृत्यूपासून बचाव!
• पुढे पॉल यांनी म्हटले की, पोलीस सतत कर्तव्यावर तैनात असल्याने त्यांना संसर्गाचा सर्वात जास्त धोका असतो.
• त्यामुळे त्यांचा जास्त जोखमीच्या गटात समावेश होतो.
• त्यामुळे अहवालाच्या आकडेवारी हे सिद्ध होत आहे की, लसीचा एक डोस ९२ टक्के तर दोन डोस ९८ टक्क्यांपर्यंत मृत्यूपासून बचाव करतो.
दरम्यान, समोर आलेल्या संशोधनातून लसीकरणांसदर्भातील गैरसमज दूर होईल, असेही डॉ.पॉल यांनी यावेळी म्हटले आहे.