Sunday, June 1, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भ्रष्टाचारमुक्त गरीब कल्याणाच्या योजना हे मोदी सरकारचे वैशिष्ट्य – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

November 16, 2022
in घडलं-बिघडलं
0
DCM devendra Fadnavis

मुक्तपीठ टीम

घर, शौचालय, गॅस, पाणी यासारख्या सुविधा कोणत्याही भ्रष्टाचाराविना गोरगरीबांपर्यंत पोहचविल्या हे मोदी सरकारच्या कार्यपद्धतीचे वैशिष्ट्य आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केले. भाजपा प्रदेश कार्यालयात ‘धन्यवाद मोदीजी’ कार्यक्रमांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्यातील १० लाख लाभार्थ्यांची आभाराची पत्रे पाठवण्याच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सहकारमंत्री अतुल सावे, भाजपा प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, मा.अॅड.माधवी नाईक, अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष एजाज देशमुख, अभियानाच्या संयोजिका श्वेता शालिनी आदी यावेळी उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गरीब कल्याणाच्या कार्यक्रमाबाबत पूर्वीही देशात बोलले जात असे, मात्र हे कार्यक्रम कधी प्रत्यक्षात आले नव्हते. मोदी सरकारने गरीब कल्याण हे एकमेव उद्दिष्ट ठेवून अनेक योजना सुरु केल्या. एक पैशाचाही भ्रष्टाचार न होता या योजनांचे लाभ गोरगरीबांपर्यंत पोहचत आहेत. धर्म, जात, पंथ न पाहता गरीबांपर्यंत कल्याणकारी योजनांचे लाभ पोहचविले जात आहेत. वेगवेगळ्या योजनेच्या लाभार्थ्यांची पत्रे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्याचा प्रदेश भाजपाचा उपक्रम अभिनंदनीय आहे. प्रदेश भाजपाने ठरवलेले अडीच कोटी लाभार्थ्यांची पत्रे पाठवण्याचे उद्दिष्ट निर्धारित मुदतीत साध्य करण्यासाठी कार्यकर्त्यांनी त्वरेने कार्यरत व्हावे असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राज्यातील १३ कोटी जनतेपैकी ५ कोटी ६५ लाख लोकांना मोदी सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ मिळाला आहे. यापैकी अडीच कोटी लाभार्थ्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देणारी पत्रे फेब्रुवारी २०२४ पर्यंत पाठवण्याचा संकल्प पक्षाने केला आहे. हे उद्दिष्ट नक्की साध्य करू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. हे अभियान यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अल्पसंख्याक मोर्चा, महिला मोर्चा आणि युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी अभिनंदन केले.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘फ्रेंड्स ऑफ बीजेपी’ या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. हे अभियान सुरु केल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे अभिनंदन केले.


Tags: DCM Devendra fadnavisModi govtउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसभ्रष्टाचारमुक्त गरीब कल्याण योजनामोदी सरकार
Previous Post

भारत जोडो यात्रेचा वाशिम जिल्ह्यात धुमधडाक्यात प्रवेश

Next Post

महाप्रित आणि कोकण रेल्वे यांच्यात सामंजस्य करार

Next Post
Mahapreit And Kokan Railway

महाप्रित आणि कोकण रेल्वे यांच्यात सामंजस्य करार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!