मुक्तपीठ टीम
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयातील समिती सभागृहात राज्यातील आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा बैठक झाली. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना तत्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे, असे आदेश दिले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबई मध्ये पावसाळा सुरू झाला की धोकादायक असलेल्या इमारती कोसळतात.प्रत्येक वॉर्ड मध्ये अशा धोकादायक इमारतींमधील रहिवाश्यांना समजतील अशा भाषेत नोटीस पाठवून या इमारती खाली केल्या पाहिजेत.जे वॉर्ड ऑफीसर ही कार्यवाही करणार नाहीत संबधित अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी.तसेच ज्या भागात वर्षानुवर्षे दरडी कोसळणाऱ्या ठराविक ठिकाणांचे सर्वेक्षण झालेले आहे.गेल्या काही वर्षांचा अनुभव पाहता आपत्तींच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.त्यामुळे नव्याने दरडी कोसळणारी ठिकाणे देखील असू शकतात याचे सर्वेक्षण होणे अत्यंत आवश्यक आहे ते सर्वेक्षण तत्काळ करा असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत दिले.
मदत व पुनर्वसनचे प्रभारी अपर मुख्य सचिव नितीन करीर यांनी प्रास्ताविक केले.