Monday, March 9, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘जादुटोणा विरोधी कायद्याची’ प्रभावी अंमलबजावणी करावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत बैठक

December 8, 2021
in घडलं-बिघडलं
0
Effective implementation of anti-witchcraft laws

मुक्तपीठ टीम

जादुटोणा विरोधी कायदा प्रचार व प्रसार अंमलबजावणी समितीने कामकाजाला गती देवून राज्यात ‘जादुटोणा विरोधी कायद्याची‘ प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

            

मंत्रालयातील उपमुख्यमंत्री यांच्या समिती कक्षात ‘जादुटोणा विरोधी कायदा‘ प्रभावीपणे राबविण्याबाबत बैठक पार पडली.या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे, वित्तीय सुधारणाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, सामाजिक न्याय विभागाच्या अप्पर मुख्य सचिव जयश्री मुखर्जी, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद लिमये, अतिरिक्त पोलीस महासंचालक राजेंद्र सिंग, समाजकल्याण विभागाचे आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, सहसचिव दिनेश डिंगळे, उपसचिव नियोजन भांडारकर, विधी व न्यायच्या उपसचिव सुप्रिया धावरे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (प्रशासन) गणेश रामदासी, जादुटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार व प्रसार समितीचे सहअध्यक्ष श्याम मानव, शशिकांत गमरे,  मधुकर कांबळे यावेळी उपस्थित होते.

Effective implementation of anti-witchcraft laws            

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले,नरबळी आणि इतर अमानुष,अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांनी प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत २०१३ मध्ये हा अधिनियम संमत करणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य आहे.राज्यात‘जादुटोणा विरोधी कायद्याची‘प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.या कायद्याची अंमलबजावणी करणा-या सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी प्रभावीपणे काम करावे. आजही अंधश्रध्देमुळे अनेक गरीब, असहाय्य लोकांची फसवणूक होत असते अशा लोकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे,जादुटोणा विरोधी कायदा प्रचार व प्रसार अंमलबजावणी समितीचे गठन करण्याबाबत सामाजिक न्याय विभागाने कार्यवाही करावी. गृह विभागाने आलेल्या तक्रारींवर योग्य ती कार्यवाही करावी. श्याम मानव यांनी केलेल्या सूचनांबाबत शासन सकारात्मक असून राज्याच्या हिताच्या दृष्टीकोनातून सर्व निर्णय घेण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

जादुटोणा विरोधी कायद्याच्या समित्यांचे पुनर्गठन लवकरच करणार           

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे म्हणाले,जादूटोणा विरोधी कायदा प्रचार व प्रसार अंमलबजावणी समितीचे पुनर्गठन  करण्यात येईल.या कायद्याची माहिती तसेच जनजागृती करणे तसेच जादुटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार व प्रसार समितीचे सहअध्यक्ष प्रा. श्याम मानव यांच्याशी चर्चा करून त्यांनी विभागासंदर्भात मांडलेल्या मुद्यांबाबत कार्यवाही करण्याची ग्वाही यावेळी मंत्री श्री. मुंडे यांनी दिली. या कायद्याच्या प्रचारामुळे वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणारा,मानवता जोपसणारा,समता -बंधुता-स्वातंत्र्य या मुल्यांना स्वीकारणारा समाज निर्माण होण्यास मदत होईल असेही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे म्हणाले.

               

जादुटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार व प्रसार समितीचे सहअध्यक्ष प्रा.श्याम मानव यांनी जादुटोणा विरोधी कायदा प्रचार व प्रसार अंमलबजावणी समितीचे पुर्नगठन,या समितीने पहिल्या टप्प्यात केलेली कामे,समितीच्या कामकाजासाठी शासनाकडून वित्त,गृह,महसूल,सामाजिक न्याय विभाग,विधी व न्याय विभाग,माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या जबाबदा-या या संदर्भात सविस्तर सूचना बैठकीत केल्या.


Tags: ajit pawaranti-witchcraft lawsDhananjay Mundeअजित पवारजादुटोणा विरोधी कायदाधनंजय मुंडे
Previous Post

घरकुलाचे स्वप्नपूर्ण करणार ‘ग्रामविकास’चे महाआवास अभियान

Next Post

नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांवरील निवडणुकांना स्थगिती

Next Post
maharashtra state election commission

नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांवरील निवडणुकांना स्थगिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!