मुक्तपीठ टीम
नवीन प्रायव्हसीसी धोरणामुळे हल्ला होणाऱ्या व्हॉट्सअॅप संदर्भात आणखी एक वादंग निर्माण झाला आहे. आता व्हॉट्सअॅप वेबवरुन वापरकर्त्यांचे मोबाइल नंबर लीक झाल्याची माहिती समोर येत आहे. यानुसार, गुगल सर्च केल्यावर वापरकर्त्याचे नंबर दिसत आहेत.
सायबर सिक्युरिटी संशोधकांनी व्हॉट्सअॅपचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यांनी गुगल सर्चचे दोन स्क्रीनशॉट्स शेअर केले आहेत, ज्यात युजर्सचे मोबाइल नंबर स्पष्ट दिसत आहेत. त्यांनी लिहिले, “व्हॉट्सअॅप अद्याप त्यांच्या वेबसाइट आणि गुगलकडे का लक्ष देत नाही हे माहित नाही. असे होण्याची ही तिसरी वेळ आहे.”
15 Jan 2021, If you are using @WhatsApp Web, your Mobile Number and Messages are being index by @Google again. Don’t know why WhatsApp is still not monitoring their website and google. This is 3rd time.#Infosec #Privacy #infosecurity #GDPR #Whatsapp #Privacy #Policy #Google pic.twitter.com/D6o1emxDgv
— Rajshekhar Rajaharia (@rajaharia) January 15, 2021
व्हॉट्सअॅप वेबवरून डेटा लीक होत आहे
व्हॉट्सअॅप वेबवरुन वापरकर्त्यांचा डेटा लीक होत आहे. जर एखादा वापरकर्ता ऑफिसच्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर व्हॉट्सअॅप वापरत असेल तर त्याचे मोबाईल नंबर गुगल सर्चवर येत आहेत. हे सर्व नंबर वैयक्तिक वापरकर्त्यांशी संबंधित आहेत. त्यामध्ये व्यवसायीक वापरकर्त्यांचा समावेश नाही.”
गूगलवर व्हॉट्सअॅप ग्रुप चॅट इनव्हिट्सची अनुक्रमित माहिती दिली होती. त्यावेळी शोध परिणामांमध्ये १,५०० हून अधिक ग्रुप इनवाइट लिंक उपस्थित होत्या. गुगलने अनुक्रमित केलेल्या काही लिंक व्हॉट्सअॅप ग्रुपवर पॉर्न शेअरे करणारे ग्रुप होते.
नवीन व्हॉट्सअॅप पॉलिसीविरूद्ध अपील
व्हॉट्सअॅपच्या नवीन डेटा प्रायव्हसी धोरणाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. व्हॉट्सअॅप विरोधात अर्ज दाखल केला आहे. त्यात म्हटले आहे की, “व्हॉट्सअॅपचे नवीन धोरण हे भारतीय लोकांच्या गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन करत आहे. युजर्सचा डेटा सामायिक करणे बेकायदेशीर आहे.”
अर्जामध्ये असे म्हटले आहे की, नवीन पॉलिसी म्हणजे लोकांच्या ऑनलाइन क्रियेवर नेहमी नजर ठेवली जाईल. हे सर्व सरकारच्या निरीक्षणाशिवाय होईल. त्यामुळे व्हॉट्सअॅप पॉलिसी त्वरित थांबवायला हवी.
नवीन व्हॉट्सअॅप पॉलिसीविरूद्ध अपील केल्यानंतर व्हॉट्सअॅपने सध्या ही पॉलिसी स्थगित केली आहे.