मुक्तपीठ टीम
गेल्या वर्षी पावसाळ्यात चेंबूरमध्ये भूस्खलनामुळे अनेकांना जीव गमवावा लागला होता. त्या घटनेपासून धडा घेत मुंबई महानगरपालिकेने या वेळी पावसाळ्यापूर्वी अशी ठिकाणे शोधून काढली आहेत, जिथे दरडी कोसळण्याचा धोका आहे आणि तिथे अशा घटना घडू शकतात. मुंबईत ७२ ठिकाणे आहेत जिथे दरडी कोसळू शकतात. त्यात चेंबूर, घाटकोपर, कुर्ला, मलबार हिल, विक्रोळी, जोगेश्वरी, गोरेगाव आणि मालाडसारखे डोंगराळ भाग आहेत. या विभागांमध्ये दरडी कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
मुंबई महानगपालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, भूस्खलनाचा धोका असलेल्या ७२ ठिकाणांपैकी ४७ ठिकाणी सुरक्षा भिंती बांधल्या जात आहेत. त्यानंतर २५ ठिकाणी सुरक्षा भिंतीही बांधण्यात येणार आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, जिल्हाधिकाऱ्यांनी मुंबई शहरातील १५, पूर्व उपनगरातील ५८५ आणि पश्चिम उपनगरातील २७१ क्षेत्रे भूस्खलनासाठी असुरक्षित आहेत. म्हाडाने शहरातील २०, पश्चिम उपनगरात २२९ आणि पूर्व उपनगरात ४४४ ठिकाणे शोधली आहेत. यानंतर या ७२ विभागांची निवड करण्यात आली आहे. जिथे सुरक्षा भिंत बांधल्या जात आहेत.
मुंबई महापालिका रेल्वेसोबत नाले सफाईचा आढावा घेणार
१. मुंबई महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, रेल्वे मार्गाच्या आजूबाजूच्या नाल्या आणि कल्व्हर्टच्या स्वच्छतेचे काम रेल्वेने केले जाईल.
२. त्यामुळे पावसाळ्यात रेल्वे रुळावर पाणी साचण्याचा धोका कमी होईल.
३. रेल्वे परिसरात पडणाऱ्या नाल्या आणि कल्व्हर्टच्या सफाईसाठी बीएमसी दरवर्षी पैसे देते, असे या अधिकाऱ्याने सांगितले.
४. रेल्वेचा परिसर असल्याने तेथे मुंबई महानगपालिकेची टीम स्टॉक घेण्यासाठी जाऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना पत्र पाठवून रेल्वेसोबत स्वच्छतेचा आढावा घेणार आहे.
अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाण्याच्या सूचना दिल्या
१. पावसाळ्यात मुंबईकरांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी मुंबई महानगरपालिकेने कृती आराखडा तयार केला आहे.
२. मुंबई महानगरपालिकेने मान्सूनपूर्व तयारीसाठी थिंक टँक तयार केला आहे. ज्यामध्ये सहायक आयुक्त, मुख्य अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांचा समावेश करण्यात आला आहे.
३. हे अधिकारी दररोज नाले सफाई आणि रस्त्यांच्या कामांचा आढावा घेतील.
४. तसेच झोनल आयुक्त आठवड्यातून एकदा अतिरिक्त आयुक्तांना केलेल्या कामाचा संपूर्ण अहवाल देणार आहेत. ५. महिनाअखेरीस अतिरिक्त आयुक्त कामांचा आढावा घेऊन आवश्यक कार्यवाहीचे निर्देश देतील.