Sunday, March 8, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

टोळधाडीमुळे देशातील १३ हजार तर महाराष्ट्रातील ५०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान

February 14, 2021
in सरकारी बातम्या
0
Locust

मुक्तपीठ टीम

 

नैसर्गिक आपत्ती, कीटकांचा हल्ला, शीतलहरी / दव, रोग इत्यादींच्या पार्श्वभूमीवर पिकांना होणाऱ्या नुकसानीचे सरकारने विशिष्ट राज्ये / ठिकाणी आवश्यकतेनुसार व्यापक प्रमाणात मूल्यांकन केले आहे. त्यानुसार टोळधाडीमुळे गेल्या वर्षभरात देशातील १३ हजार हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले. तर महाराष्ट्रात हाच आकडा ५००हेक्टरचा आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी सरकारने उपाययोजना केल्याची माहिती केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात दिली.

 

राजस्थानमध्ये आणि कीड/कीटकांच्या हल्ल्यामुळे मध्यप्रदेशात आणि राजस्थानमध्ये दुष्काळाच्या(खरीप) पार्श्वभूमीवर झालेल्या पिकांच्या नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी सन 2020-21 मध्ये सरकारने आंतर-मंत्रालयीन केंद्रीय पथकांची स्थापना केली आहे.

त्यांनी आपत्तींना तोंड देण्यासाठी 2020 मध्ये विविध संस्थांच्या सहभागाने आपत्ती व्यवस्थापन योजनेचा आढावा घेतला आहे आणि ती अद्ययावत केली आहे तसेच प्रसारमाध्यम व्यवस्थापन केले आहे.

मागील तीन वर्षात झालेल्या नुकसानीचा तपशील पुढीलप्रमाणेः

  • सन 2020-21 मध्ये टोळधाडीमुळे हरियाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये अनुक्रमे 6520 हेक्टर, 4400 हेक्टर, 806 हेक्टर, 488 हेक्टर, आणि 267 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.
  • 2019-20 दरम्यान टोळधाडीमुळे राजस्थानच्या आठ जिल्ह्यात 1,79,584  हेक्टरवरील आणि गुजरातच्या दोन जिल्ह्यात 19,313 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. राजस्थानात बीकानेर, हनुमानगड आणि श्री गंगानगर क्षेत्र येथे अनुक्रमे 2235, 140 आणि 1027 हेक्टर क्षेत्रावर टोळधाड आली.
  • 2018-19 आणि 2019-20 मध्ये लष्करी अळीच्या हल्ल्यात 5.00 आणि 7.00 लाख हेक्टरचे नुकसान झाले होते. महाराष्ट्रात 2019-20 मध्ये 8.60 लाख हेक्टरवर आणि  कर्नाटकमध्ये 263,000 हेक्टर क्षेत्रावर किडीचा प्रादुर्भाव झाला होता.

पिकांना झालेल्या नुकसानीला तोंड देण्यासाठी व तिचे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारने राबविलेल्या काही प्रमुख योजना खालीलप्रमाणे आहेतः

  1. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या नुकसानाविरूद्ध शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यासाठी प्रधानमंत्री फसल विमा योजना लागू करणे.
  2. प्रतिकूल हवामानाच्या घटनांपासून विमा संरक्षण देण्यासाठी पुनर्रचित हवामान आधारीत पीक विमा योजना आणि कमीतकमी वेळात दाव्यांचा निपटारा करण्याचा फायदा.
  • एक वर्षापर्यंत 3.00 लाख रुपयांपर्यंत अल्प मुदतीच्या पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना व्याज अनुदान योजना.
  1. इतर महत्वाच्या योजनांमध्ये, वनस्पती विलगीकरण सुविधांचे मजबुतीकरण व आधुनिकीकरण, जिल्हा दुष्काळ पुरावा योजना, साप्ताहिक आधारावर केंद्रस्तरीय देखरेख बैठक आणि राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना पीक हवामान पाहणी गट अहवाल आणि भारतीय कृषी संशोधन परिषदद्वारा देखरेख व कीड व्यवस्थापन यांचा समावेश आहे.

प्रधानमंत्री फसल बीमा योजना व पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजनेअंतर्गत देण्यात आलेला निधी:

Plan/ Year Expenditure (Rs. crore)
2018-19 11945.38
2019-20 12638.32
2020-21* 9799.86

* 31.12.2020 रोजी.

 


Tags: Indian farmLocustMaharashtranarendra singh tomarrajsthanटोळधाडनरेंद्रसिंह तोमरराजस्थान
Previous Post

अकरावी प्रवेशासाठी १६ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

Next Post

अपघाती मृत्यू रोखले तर प्रती व्यक्ती ९० लाख रुपयांची बचत!

Next Post
Road Accidents -1 (2)

अपघाती मृत्यू रोखले तर प्रती व्यक्ती ९० लाख रुपयांची बचत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!