Tuesday, March 10, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘डायकिन’ची फ्युचर रेडी स्प्लिट रुम एसी रेंज, निर्यातीत डायकिन भारतातून आघाडी घेणार!

February 20, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
daikin ac

मुक्तपीठ टीम

जगातील अग्रणी वातानुकूलन म्हणजेच एसी क्षेत्रातील नामांकित कंपनी डायकिनने स्प्लिट रूम वातानुकूलकांची (एसी) एक नवीन रेंज बाजारात आणली आहे. चोखंदळ भारतीय ग्राहकांसाठी असलेल्या या रेंजची संकल्पना आणि उत्पादन स्वदेशी आहे. या नवीन ‘यू’ सीरीजमध्ये ग्राहकाला वातानुकूलनाच्या गुणवत्तेचे व्यवस्थापन करण्यासाठी सक्षम अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे, अशी माहिती डायकिन इंडियाचे उपाध्यक्ष (चॅनेल बिझनेस) नवनीत शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच उत्पादनवाढीमुळे एचव्हीसी उपकरणांच्या निर्यातीत डायकिन भारतातून आघाडी घेणार असल्याचेही ते म्हणाले.

 

नगर रोडवरील हॉटेल हयातमध्ये या नव्या सीरिजचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रसंगी डायकिन इंडियाचे वेस्ट इंडिया रिजनल हेड नीरज शुक्ला, पुणे ब्रांच ऑपरेशन हेड अखिल खान आदी उपस्थित होते.

 

नवनीत शर्मा म्हणाले, “ग्राहकांचा हवेचा दर्जा आणि आरोग्यावर अधिक भर असतो. त्यामुळे आम्ही पेटंटेड स्टीमर डिस्चार्ज तंत्रज्ञान ४-स्टार सेगमेन्टमध्ये आणले आहे. तसेच वाय-फाय असलेल्या उत्पादनांच्या ऑफर्स अपग्रेड केल्या आहेत. ड्यू क्लीन तंत्रज्ञानासह उत्पादनात आधुनिकीकरण द्वारे शुद्ध हवा देण्याची बांधिलकी आम्ही जपली आहे. हे तंत्रज्ञान इनडोअर युनिट (आडीयू) वातावरणातील पाण्याने स्वंय-स्वच्छता करण्यासाठी सक्षम करून स्वच्छ आणि कार्यक्षम संचालनाची खात्री करते. १५० चौरस फुटांच्या जागेचा विचार करून डायकिन वातानुकूलकांची (एसी) ही नवीन रेंज प्रत्येक सामान्य माणसासाच्या वातानुकूलनाच्या आणि हवेच्या दर्जाचा गरजा पूर्ण करते. गेल्या काही वर्षांमध्ये भारतात व्यापक विद्युतीकरण झाल्यामुळे पर्यावरणपूरक वातानुकूलन (एसी) उपायांचा लाभ घेण्यासाठी, डायकिन एसी ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे.”

 

“डायकिन इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक के. जे. जावा यांच्या नेतृत्वात कंपनी प्रगतीची शिखरे गाठत आहे. येथे प्रत्येक भारतीयाची गरज पुरवणारी ‘मेक इन इंडिया’ उत्पादने तयार करण्याचे आमचे स्वप्न आहे. वातानुकूलित ही आता एक गरज बनल्यामुळे उदयोन्मुख ग्राहकांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी, उत्पादन नवकल्पना आणि गुणवत्ता यांच्यामध्ये एक मूलगामी बदल गरज होती. डायकिन वातानुकूलकांची नवीन श्रेणी अधिक ऊर्जा वापर शुल्काच्या भुर्दंडाशिवाय जुन्यापुराण्या, कालबाह्य तंत्रज्ञानाकडून अद्ययावत करण्यासाठी वाढत्या भारतीय लोकसंख्येला सक्षम करील,” असे नीरज शुक्ला यांनी सांगितले.

 

डायकिनच्या नव्या रेंजची वैशिष्ट्ये 

  • १५% अधिक ऊर्जा कार्यक्षम
  • स्वच्छ आणि कार्यक्षम आयडीयु ऑपरेशन साठी ड्यू क्लीन तंत्रज्ञान
  • हवेच्या गुणवत्तेसाठी स्टीमर डिस्चार्ज तंत्रज्ञान
  • देखरेखीसाठी तीन आयडीयु डिस्प्ले
  • सुलभ हाताळणीसाठी वायफाय संचालन
  • गरम आणि थंड होण्यासाठी कमी खर्चाचा हिट पंप

 

एचव्हीसी उपकरणांच्या निर्यातीत डायकिन भारतातून आघाडी घेणार!

याविषयी डायकिन इंडियाचे उपाध्यक्ष (चॅनेल बिझनेस) नवनीत शर्मा यांनी पुढील माहिती दिली, “डायकिन इंडियाने एसी आणि सुट्या भागांच्या उत्पादनासाठी श्री सिटी, आंध्रप्रदेश येथे १००० कोटींची गुंतवणूक केली आहे. यामुळे उत्पादन क्षमता १२ लाख आरए युनिटवरून २५ लाख युनिटपर्यंत वाढेल. परिणामी, एचव्हीसी उपकरणांच्या निर्यातीत डायकिन भारतातून आघाडी घेईल. आत्मनिर्भर भारताच्या दिशेने टाकलेले हे एक आश्वासक पाऊल आहे. भारतात मोठी गुंतवणूक करणारी डायकिन ही जपानी कंपनी पहिली ठरली आहे. भारतातील मोठ्या संधींचा लाभ घेण्यासाठी मेक इन इंडियाच्या अंतर्गत काम करत आहे.”


Tags: DaikinDaikin India Vice President Navneet SharmaFuture Ready Split Room AC Rangegood newsmuktpeethचांगली बातमीडायकिन इंडिया उपाध्यक्ष नवनीत शर्माडायकिन निर्यातफ्युचर रेडी स्प्लिट रुम एसी रेंजभारतमुक्तपीठ
Previous Post

महिलांच्या तक्रार निवारणासाठी महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी ‘महिला लोकशाही दिन’

Next Post

भारतीय रिझर्व्ह बँकेत सहाय्यक या पदासाठी एकूण ९५० जागांवर संधी

Next Post
rbi

भारतीय रिझर्व्ह बँकेत सहाय्यक या पदासाठी एकूण ९५० जागांवर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!