Wednesday, June 4, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पालघरचे पालकमंत्री दादाजी भुसेंची राष्ट्रीय महामार्गाच्या पुनर्रचनेची मागणी

February 24, 2021
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
palghar

 मुक्तपीठ टीम

 

       राज्याचे कृषी मंत्री आणि पालघरचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केंद्रीय भुपृष्ठ आणि परिवहन मंत्री नितिन गडकरी यांची भेट घेऊन पालघर राष्ट्रीय महामार्ग  क्रमांक 160 ची नियमानुसार पुनर्रचना व्हावी, अशी मागणी केली.

            श्री. भुसे यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय वाणीज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.

            कृषी मंत्री श्री. भुसे यांनी केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. यावेळी पालघर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160 ची पुनर्रचना व्हावी असा प्रस्ताव सादर केला. मुंबई-नाशिक आणि मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा अतिशय महत्वाचा हा राष्ट्रीय महामार्ग 217 किलो मिटरचा आहे.या महामार्गावर जड वाहनांचे  सतत वहन होत असल्यामुळे या मार्गाची पुनर्रचना होणे गरजेच आहे. यासोबतच या महामार्गाचे त्र्यंबकेश्वर, जव्हार, नाशिक असे थोडे रूंदीकरण व्हावे अशीही श्री भुसे यांनी बैठकीत मागणी केली.   यामुळे या परिसरात  असणा-या तीर्थक्षेत्र आणि पर्यटनाला हा महामार्ग पुरक ठरेल.

      यासह कोथरेडीगज-सतना-मालेगाव-चाळीसगाव हा राज्य महामार्ग क्रमांक 19 हा दुपदरी रस्ता चौपदरी करावा अशी मागणी केली. राज्य महामार्ग 19 मालेगाव ग्रामीणला जोडून असल्यामुळे  गुजरात, राजस्थान आणि दक्ष‍िणेकडे तमिळनाडू आणि कर्नाटकाला जातो. या महामर्गावर जड वाहनांची गर्दी होत असल्यामुळे वाहतुकीवर परिणाम होतो. त्यामुळे या दुपदरी रस्त्याचे चौपदरीकरण हे सीआरएफ  निधीतून करावे अशी मागणी श्री भुसेंनी बैठकीत केली.

                        केंद्रीय संरक्षण विभागातर्फे नाशिकमध्ये सुसज्ज रूग्णालय द्यावे

         भारतीय संरक्षण दलातील  विविध लष्करी तुकड्यांमध्ये सैनिक म्हणून नाशिक जिल्ह्यातील  लोकांचा मोठया प्रमाणात समावेश आहे. याठिकाणी निवृत्त सैनिक, सैनिकांची कुटुंबे आहेत. त्याच्यासाठी अद्यावत असे रूग्णालय नाशिक जिल्ह्यात असावे, अशी मागणी  केंद्रीय संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंग यांच्याकडे झालेल्या बैठकीत श्री भुसे यांनी केली.

         केंद्रीय वाणीज्य आणि उद्योग मंत्रालयाकडून द्राक्षांवरील अनुदानाचे पुर्नविलोकन व्हावे

            केंद्रीय वाणीज्य आणि उद्योग मंत्रालयाकडून  द्राक्षांवरील अनुदानाचे पुर्नविलोकन व्हावे, अशी मागणी श्री भुसे यांनी केंद्रीय वाणीज्य आणि उद्योग  मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन केली. 2018-19 आणि 2019-20 मध्ये 7 टक्के आणि 5 टक्के असे अनुदान दिले होते. परंतु 31 डिसेंबर 2020 पासून अनुदान मिळणे बंद झाले आहे. याचा विपरीत परिणाम द्राक्ष शेतीवर  होत आहे. त्यामुळे शेतक-यांचे नुकसान होत आहे. ही बाब लक्षात घेता यावर्षी अनुदान पुन्हा सुरू करण्यात यावे, अशी मागणी श्री भुसे यांनी यावेळी केली. त्यांनी या संदर्भात निवेदनही दिले.

        नाशिकमध्ये टेक्सटाईल पार्कची मागणी

नाशिक जिल्ह्यात मोठया प्रमाणात हातमागाचे काम होत असून या ठीकाणी टेक्सटाईल पार्क उभारण्यात यावा, अशी मागणी श्री भुसे यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती ईराणी यांना निवेदन देऊन केली.


Tags: Dada BhusehighwayPalgharदादा भुसेपालघरमहामार्ग पुररर्चना
Previous Post

सरकार ‘आरे’च्या सर्व स्टॉल्सचे सर्वेक्षण करणार

Next Post

“कुठे जबाबदार नितीन राऊत आणि कुठे बेजबाबदार ‘ते’!”

Next Post
nitin raut

“कुठे जबाबदार नितीन राऊत आणि कुठे बेजबाबदार ‘ते’!”

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!