मुक्तपीठ टीम
सायकलचं पर्यावरणासाठी असलेलं महत्व, सायकलिंगचे आरोग्यसाठीचे फायदे लोकापर्यंत पोहचावेत यासाठी बदलापूर सायकलिंग क्लब आणि अंबरनाथ सायकलिंग क्लबने सायकल यात्रा आयोजित केली होती. बदलापूर ते गोवा अशी ६३० किलोमीटरची यात्रा काढण्यात आली होती. या सायकल यात्रेचे नेतृत्व डॉ . नंदकिशोर अहिरे यांनी केले. ही यात्रा १३ नोव्हेंबरला सुरु झाली ती १६ नोव्हेंबर गोव्यात पोहोचली. संपूर्ण मार्गावर सायकलवीरांनी सायकल चालवून आपलं कौशल्य दाखवलं. पण निसर्ग आणि आरोग्य संवर्धनाचे महत्वही भेटणाऱ्यांना पटवण्याचा प्रयत्न केला.
सध्याच्या काळात शून्य प्रदूषण करणाऱ्या सायकलचे महत्व वेगळेच. नवी पिढीही सायकलला आपलंसं करत असते. सायकलीचे हे पर्यावऱण आणि आरोग्यसाठीचे महत्व वेगळेच आहे. ते लोकांना पटवून देण्यासाठी बदलापूर, अंबरनाथमधील सायकलवीर एकत्र आले. बदलापूरहून निघालेली ही सायकल सायकल यात्रा मुरुडमध्ये पोहचली तेव्हा मुरुड जंजिरा परिसर पर्यटकांनी फुलून गेला होता. या रॅलीचे नेतृत्व डॉ. नंदकिशोर अहिरे करीत आहेत. महामुंबई परिसरातील दोन शहरांमधील २३ सदस्य सहभागी आहेत.
सायकलवीर
- डॉ. नंदकिशोर अहिरे
- रमाकांत महाडिक
- आकाश पटेल
- प्रकाश पाटील
- सुमीत पांड्ये
- दर्शन
- पंकज
- नितीन
- प्रणीत
- किशोर
- सोहम
- मधुगोपाल
- नवीन
- तुषार
सहाय्यक टीम
- अभिषेक कोयंडे
- हिरू आहुजा
- सागर मेनन
- प्रफुल्ल
- निकितेश
निसर्गातील बदलांचे निरीक्षण, सायकलिंगचे मानवी जीवनातील आरोग्यविषयक महत्त्व, व्यायामाचं महत्व आणि विविध स्तरावर अभ्यास करणे हा मुख्य हेतू असल्याचे डॉ. अहिरे यांनी सांगितले. शनिवारी मुरुडला मुक्काम करून ही रॅली रविवारी रत्नागिरीकडे निघाली.
बदलापूर-मुरुड-करडे-पावस-कुनकेश्वर आणि गोवा या मार्गाने ही सायकल यात्रा पुढे गेली. लोकांनी सायकलिंग करण्यासाठी प्रेरित व्हावे आणि त्याचबरोबर निसर्गसंवर्धन आणि आरोग्य याची काळजी घ्यावी हा उद्देश होता. या सायकल यात्रेत १४ सायकलस्वारांनी भाग घेतला आणि सपोर्ट टीममध्ये ५ लोक, असे १९ लोकं सहभागी झाले होते.