मुक्तपीठ टीम
अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवल्यानंतर लोकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झाले आहे. अफगाण नागरिक भीतीने देश सोडून जाण्यासाठी विमानतळावर पोहोचत आहेत. महिला आणि मुलांसह हजारो लोक काबूल विमानतळाच्या बाहेर जमले. कोणतीही आई आपल्या मुलांना अपरिचितांच्या हाती सोपवणार नाही. मात्र अफगाणी माता त्यांच्या अगदी कोवळ्या मुलांनाही अमेरिकन सैनिकांकडे मोठ्या संख्येनं सोपवताना दिसत आहेत. त्या तसं का करतात, त्याचे कारण आता पुढे आले आहे.
महिलांवर आणि लहान मुलांवर अत्याचार किंवा गैरप्रकार होण्याच्या भीतीने अफगानी माता आपल्या बाळांना अमेरिकन सैन्यांना सोपवत आहेत, असं मोघम सारेच बोलतात. पण एक अतिशय विकृत असं कारण आता उघड झाले आहे. तालिबानचे अफगाणिस्तानावर आधीपासूनच वर्चस्व होते. इथे अनेक प्रकारचे गैरप्रकार सुरु होते. यामधील एक म्हणजे बच्चाबाजी. यामध्ये १० वर्षांच्या मुलांना लक्ष्य केले जाते. या विकृतीनुसार लहान मुलांना वखवखलेले पुरुष आधी मुलींच्या कपड्यात नृत्य करायला लावतात आणि नंतर वासनेचं लक्ष्य करतात.
बच्चाबाजीची काळीकुट्ट विकृती
- दहा वर्षांच्या मुलांचे शोषण केले जाते.
- बच्चाबाजी परंपरेत १० वर्षांच्या आसपासच्या मुलांना मुलींचे कपडे घालून नृत्य करायला लावतात.
- पार्टीत नृत्य केल्यानंतर त्यांच्यावर बलात्कारही होतात.
- एकदा कोणताही मुलगा मुलीच्या वेशात गेला की त्याच्यावरील अत्याचारांची मालिकाच सुरु होते.
- तो मेकअप करतो, त्यानंतर दलदलीत अडकत जातो.
- मुलांव्यतिरिक्त स्त्रियांवरही मोठ्या प्रमाणावर अत्याचार होतात.
- म्हणूनच या वाईट प्रथेवर सतत टीका होत आली आहे.
- पण आजपर्यंत ही विकृतीची ही विकृत प्रथा चालू आहे.
- अफगाणिस्तान आणि पाकिस्तानची अनेक मुलेही या वाईट प्रथेच्या दलदलीतून बाहेर पडली आहेत आणि त्यांनी त्यांच्या कथा सर्वांना सांगितल्या आहेत.
मुलांचे बालपण हिरावणारी लौंडेगिरी!
- या मुलांना तेथे लौंडे किंवा बच्चा बेरीश म्हणतात.
- बऱ्याचदा अल्पवयीन मुलांनाच या बच्चाबाजीत ढकलले जाते.
- या प्रथेवर एक लघुपटही बनवण्यात आला आहे, द डान्सिंग बॉइज ऑफ अफगाणिस्तान असे या लघुपटाचे नाव आहे.
- या मुलांना नृत्य आणि लैंगिक अत्याचाराच्या बदल्यात फक्त कपडे आणि दोन वेळेचं जेवण दिले जाते.
- पण बरीच मुलं जगण्यासाठी हे काम करायला तयार असतात.
बच्चाबाजीच्या विकृतीसाठी दाढी-मिशा नसलेल्या मुलांचे अपहरण
- मुलांचे अपहरण केले जाते
- अनेक वेळा लहान मुलांचे अपहरण करून त्यांना विकले जाते.
- ज्यांच्या चेहऱ्यावर दाढी आणि मिशा आल्या नाहीत, ती मुले या कामासाठी योग्य मानली जातात.
- अशा मुलांचे अपहरण करून श्रीमंत विकृतांना विकलं जातं.
- यानंतर श्रीमंत लोक या मुलांना त्यांच्या इच्छेनुसार काम करायला लावतात.
हे ही वाचा:
तालिबान्यांचे ‘शरियत’च्या नावाखाली महिलांवर अत्याचार! सत्तेसाठी शरियत, वागताना क्रुरतेचा अधर्म!