मुक्तपीठ टीम
इंडियन प्रीमियर लीगचा पहिला अध्यक्ष म्हणजे ललित मोदी. व्यवसायाने एक व्यापारी असणाऱ्या ललित मोदीला बहुतेक लोक ओळखतात कारण, त्यांने भारतात आयपीएल सुरू केले होते, परंतु वादांशीही त्यांचा खोल संबंध आहे. ललित मोदीने एक ट्विट करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. त्यांने केलेल्या ट्विटमध्ये सांगितले की, तो बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेनला डेट करत आहे. ट्विटरवर सुष्मिता सेनला टॅग करत त्यांनी लिहिले, एक नवीन सुरुवात, एक नवीन जीवन. एक वेळ असे वाटत होते की दोघांनी लग्न केले आहे, परंतु माजी आयपीएल चेअरमन ललित मोदीने स्पष्ट केले की ते सध्या फक्त डेट करत आहेत, परंतु एक दिवस लग्न देखील करतील.
ललित मोदीने १९९१मध्ये, आपल्या आईची मैत्रिण असलेल्या मीनल नावाच्या महिलेशी लग्न केले, जिला तो अमेरिकेमध्ये शिकत असताना भेटला होता. ललित मोदीपेक्षा नऊ वर्षांनी मोठ्या असलेल्या मीनलचा नायजेरियन व्यक्तीपासून घटस्फोट झाला होता. मीनल आणि ललित मोदी यांना मुलगा आणि मुलगीही आहे. डिसेंबर २०१८ मध्ये मीनलचे कर्करोगामुळे निधन झाले.
Just back in london after a whirling global tour #maldives # sardinia with the families – not to mention my #better looking partner @sushmitasen47 – a new beginning a new life finally. Over the moon. 🥰😘😍😍🥰💕💞💖💘💓. In love does not mean marriage YET. BUT ONE THAT For sure pic.twitter.com/WL8Hab3P6V
— Lalit Kumar Modi (@LalitKModi) July 14, 2022
ललित मोदीच्या जीवनाशी संबंधित काही बाबी
- ५९ वर्षीय ललित कुमार मोदी आज कोणाच्या संपर्कात नसला तरी, एक काळ असा होता जेव्हा त्याची व्यावसायिक जगतात विशेषत: भारतीय क्रिकेटमध्ये वेगळीच प्रतिमा होती.
- त्याने या खेळाला देशातील अभूतपूर्व व्यावसायिक उंचीवर नेले.
- इंडियन प्रीमियर लीग ही त्याचीच बुद्धी मानली जाते.
- आयपीएलच्या रूपाने त्यांनी सोन्याची अंडी देणारी कोंबडी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला दिली.
- सध्याच्या घडीला ललित मोदी वडिलांच्या कंपनी केके मोदी एंटरप्रायझेसमध्ये अध्यक्ष आहे.
- त्याचे अधिकृत ट्विटर हँडल, त्याची वेबसाइट LalitModi.com आणि त्यांच्या फेसबुक पेजने देखील मोदी एंटरप्रायझेसचे अध्यक्ष म्हणून स्वतःची ओळख करून दिली आहे.
ललित मोदीचा जन्म २९ नोव्हेंबर १९६३ रोजी कृष्ण कुमार मोदी यांच्या घरी झाला. दिल्लीतील एका प्रभावशाली व्यावसायिक घरात जन्मलेला ललित कुमार मोदी वाचन आणि लेखनात कधीच हुशार नव्हता, खरं तर तो एक हुशार व्यापारी होता. त्याचे आजोबा राज बहादूर गुजरमल मोदी हे गाझियाबादजवळील मोदीनगर या शहराचे संस्थापक होते आणि त्यांनी मोदी एंटरप्रायझेस सुरू केली. एकेकाळी केके एंटरप्रायझेसचे कोट्यवधींचे साम्राज्य होते. ललित मोदींनी शिमल्यातील बिशप कॉटन स्कूल आणि नैनितालच्या बोर्डिंग स्कूलमध्ये सुरुवातीचे शिक्षण घेतले. उच्च शिक्षण घेण्याचा आग्रह धरल्यानंतर त्याने अमेरिकेतील डरहम येथील ड्यूक विद्यापीठात प्रवेश घेतला होता.
ललित मोदी प्रारंभिक आयुष्यातील वाद
- ललित मोदी हे अशाच एका व्यक्तीचे नाव आहे, जो अनेकदा चुकीच्या कारणांमुळे चर्चेत असतो.
- १९८५ मध्ये त्याला विद्यापीठात ड्रग्ज विकल्याबद्दल अटक करण्यात आली तेव्हा वादांशी त्याचा पहिला संबंध जोडला गेला.
- यानंतर त्याला प्राणघातक शस्त्राने हल्ला केल्याप्रकरणी ताब्यातही घेण्यात आले.
- त्याच वर्षी ललित मोदी आणि आणखी एका विद्यार्थ्यावर अपहरणाचा आरोप होता.
- त्याची दोन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा स्थगित करण्यात आली. पुढच्या वर्षी ड्यूक विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर, मोदीने पुन्हा न्यायालयात धाव घेतली आणि आरोग्याच्या कारणास्तव भारतात प्रवास करण्याची परवानगी मागितली. न्यायालयाने त्यांना १९९० पर्यंत २०० तास सामुदायिक सेवा करण्याच्या अटीवर घरी परतण्याची परवानगी दिली.