मुक्तपीठ टीम
केरळमध्ये राहणारे सीआरपीएफचे कॉंस्टेबल संतोष कुमार यांनी रिमोट ऑपरेटिव्ह व्हेहिकल तयार केला आहे. हे जमिनीत पेरलेले आयईडी स्फोटकं शोधण्यास मदत करते. अगदी अशी स्फोटके २ फुट खोलवर जमिनीत पेरली असली तरी ती या नव्या तंत्रानं शोधणं शक्य आहे.
शोधक वृत्तीचे संतोष कुमार!
- कॉन्टेबल संतोष कुमार हे देशातील सर्वात मोठ्या निमलष्करी दलातील तांत्रिक उपकरणे विशेषज्ञ आहेत.
- सीआरपीएफवर दंतेवाडा मध्ये २०१० रोजी झालेल्या माओवादी हल्ल्यात त्यांना दुखापतीचा सामना करावा लागला.
- त्यानंतर त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने निर्धार केला केला की, सहकाऱ्यांवर होणाऱ्या या हल्ल्यांवर आता वचक बसवला पाहिजे.
- यासाठी संतोष कुमार हे अनेक पद्धतींवर अभ्यास करत होते.
- या माध्यमातून सीआरपीएफ नक्षली, माओवादी आणि दहशतवादी कारवायांना सडेतोड उत्तर देऊ शकेल.
जमिनीतील स्फोटके कशी शोधणार?
- संतोष कुमार यांनी बनवलेल्या या उपकरणात रिमोट ऑपरेटिव्ह वेहिकल सुद्धा जोडलेले आहे.
- जे २ फूटपर्यंत खोदून जमिनीत दबलेल्या आयईडीला बाहेर काढू शकते.
- या पद्धतीचे आरओव्ही हे फक्त सीआरएफकडे असून या ओरओव्ही चे निर्माते संतोष कुमार हे आहेत.
- संतोष कुमार यांनी बनवलेल्या या तंत्रावर संपूर्ण सीआरएफ गटाचा विश्वास आहे.
- म्हणूनच संतोष कुमार यांना दिल्लीमध्ये हत्यारांना अधुनिक पद्धतीचा आयाम देण्याचे काम सोपवण्यात आले आहे.
- ते अनेक पद्धतीच्या टेक्निक्स् सीआरपीएफसाठी तयार करत आहेत.
आयईडी स्फोटके शोधण्यामागील कल्पना…
- २०१०मध्ये जेव्हा दंतेवाडीमध्ये माओवादी हल्ला झाला तेव्हा त्यांची बटालियन तेथे तैनात करण्यात आली.
- तेव्हा माओवादी आणि नक्षली हल्ले त्यांच्या सहनशीलतेच्या पलिकडे होते.
- ते असे काही हत्यार बनवू पाहत होते की, ज्यामुळे आपण त्यांच्या हल्ल्यांचा सामना आणि सडेतोड उत्तर देऊ शकतो.
- त्यावेळेस त्यांनी मोर्टार पद्धतीने हल्ला करण्यासंदर्भात नवीन पद्धत आजमावली,ज्या पद्धतीचे मोठ्या पातळीवर सुद्धा कौतुक करण्यात आले.
- त्यानंतर त्यांना दिल्लीच्या ठिकाणी बोलवण्यात आले कारण आतंकवादी आणि नक्सलवादी आयईडीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात हल्ले करतात.
- त्यांनी एक असा रिमोट ऑपरेटिव्ह वेहिकल बनवला जे दोन फूटापर्यंत जमिनीत दबल्या गेलेल्या आयईडीला शोधून काढू शकते.