मुक्तपीठ टीम
येवला येथे स्वामी मुक्तांनंद विद्यालयात आजपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरणास सुरुवात झाली आहे. मात्र या लसीकरण प्रसंगी लोकांनी तोबा गर्दी केली असून सामाजिक अंतराचा देखील भान नागरिकांनी राहिले नसल्याचे चित्र बघण्यास मिळाले.
नियोजनाचा अभाव….
लसीकरणा करता नागरिक गेल्या दोन दिवसापासून चकरा मारत असून अनेक ज्येष्ठ नागरिक पहाटेपासूनच लसीकरणा करता नंबर लावत आहे. मात्र लस उपलब्ध नाही ,लस आज तुम्हाला दिली जाणार नाही ,असे कारण सांगून परत ज्येष्ठ नागरिकांना माघारी पाठवण्यात येत आहे. त्यामुळे लस कधी मिळणार याचे नियोजन नसल्याचा आरोप नागरिक करत आहे.
ऑनलाइन नोंदणी प्रमाणे लसीकरण…
आज पासून १८ ते ४४ वयोगटाच्या नागरिकांना लसीकरण करण्यास सुरुवात झाली असून येवला उपजिल्हा रुग्णालय जवळच असलेल्या स्वामी मुक्तानंद विद्यालय हे लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून या ठिकाणी ऑनलाइन नोंदणी केलेल्या नागरिकांनाच लस देण्यात आली.