गुन्हे महत्वाचे : 1)लोकलमधून विनातिकीट प्रवास करताना पकडल्या गेलेल्या एका तरुणाने तिकीट तपासनीस व आरपीएफ जवानांना धक्काबुक्की करून तसेच, धमकावून पलायन केल्याची घटना नेरुळ स्थानकात घडली. वाशी पोलिसांनी त्याच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. 2)अपहरण करीत पंधरावर्षीय मुलीला डांबून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या फेसबुक फ्रेण्डला यशोधरानगर पोलिसांनी अटक केली. त्याला सक्करदरा पोलिसांच्या स्वाधीन केले. 3)वीजबिल थकवल्यानं वीजजोडणी कापून गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला रेल्वे पोलिसाने आणि त्याच्या मुलाने मारहाण केल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी रेल्वे पोलिसाच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल केलाय 4)वेडाच्या भरात एका तरुणाने स्वतःच्या मावशी व आजीचे हातपाय बांधून कुऱ्हाडीने वार करत हत्या केली आहे. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथे घडलेल्या या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून आरोपी तरुणास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रोहिदास चऱ्हाटे असं आरोपीचं नाव आहे. 5)घरात कोणी नसल्याची संधी साधत महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस जिल्हा अतिरिक्त मुख्य न्यायाधीश एस. के. ढेकळे यांनी एक वर्ष सश्रम कारावास व एकत्रित साडेचार हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.