गुन्हे महत्वाचे : 1)औषध आणण्यासाठी मेडिकलला चाललेल्या एका वृद्धेला भर रस्त्यात लुटल्याचा धक्कादायक प्रकार घडला. दोन अनोळखी व्यक्तींनी वृद्धेची दिशाभूल करून तिला बाजूला नेले. तिथे वृद्धेच्या तोंडाला रुमाल बांधून त्यांच्या हातातील चार तोळे वजनाच्या सोन्याच्या पाटल्या बळजबरीने काढून नेल्या. 2) नवी मुंबईमधील बिखी कल्पेश परमार या विवाहितेने सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या छळास कंटाळून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी तिचा नवरा व सासऱ्यास अटक केली आहे. बिखीने तिच्या भावाने केलेल्या तक्रारीवरून एपीएमसी पोलिसांनी तिच्या पतीसह सासरे व दिराविरोधात छळवणुकीसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 3) न्यायालयाने लावलेली हजेरी बंद करून गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी, पाच हजारांची लाच घेणाऱ्या एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यातील दोन लाचखोर हवालदारांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी नारेगाव पोलिस चौकीत रंगेहाथ ताब्यात घेतले. 4)धुतूम येथे हिंदुस्तान कंटेनर यार्ड मधून बायो डिझेलचा टँकर जप्त करून उरण पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. टँकर क्रमांक एम एच ४३ वाय ८१५१ क्रमांकाचा टँकर बायोडिझेल घेऊन धुतूम येथील हिंदुस्थान कंटेनर यार्ड मध्ये बायो डिझेलचा टँकर आढळून आला. हा टँकर कोणाचा आहे आणि ह्या यार्डमध्ये काय करतोय? कंटेनर यार्डचे व्यवस्थापक कोण आहे? यार्डचे मालक कोण आहे? विचारणा केली असता तेथील कर्मचाऱ्यांनी ह्याचे उत्तर दिले नाही.